आरोग्य

हे फायदे हवे असतील तर दररोज खा मखाणा

Trupti Paradkar  |  Dec 19, 2019
हे फायदे हवे असतील तर दररोज खा मखाणा

मखाणा हा एक आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त पदार्थ आहे. नास्ता असो वा स्नॅक्स पार्टी तुम्ही कधीही मखाणा खाऊ शकता. नमकीन कॅटेगरीत मोडणारा हा स्नॅक्सचा प्रकार तुम्ही अगदी उपवासाच्या दिवशीदेखील खाऊ शकता. कमळाच्या बीयांपासून तयार केलेले मखाणा  केवळ हेल्दीच नाही तर पोषकही असतात. आजकाल अनेकांना मखाणामधील पोषकतत्त्वांविषयी माहिती आहे. त्यामुळे अनेक रेसिपीजमध्ये मखाणाचा वापर केला जातो. एवढंच नाही तर मखाणा खाण्यामुळे तुमच्या शरीरावर अनेक आरोग्यदायी फायदे होतात. मखाण्याला सुपरफूड असं म्हणण्यास काहीच हरकत नाही.त्यामुळे दिवसभरात कधीही तुम्ही मखाणा खाऊ शकतात.  

मखाणामधील पोषक घटक –

मखाणामध्ये कोलेस्ट्ऱॉल, सॅच्युरेटेड फॅट्स, सोडीयम फार कमी प्रमाणात असतात. ज्यामुळे ते ह्रदयासाठी अतिशय उत्तम असतात. मखाणामध्ये कॅलरीज आणि फॅट्स कमी प्रमाणात असतात. ज्यामुळे तुम्हाला वेटलॉस करण्यासाठी मखाणा फायदेशीर ठरतात. मखाणामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशिअम, प्रोटिन्स, फॉफ्सरस, लोह, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात. सहाजिकच तुमच्या  हाडांच्या वाढ आणि विकासासाठी मखाणा उपयुक्त आहे. मखाणा खाण्यामुळे तुमचे हिमोग्लोबिन संतुलित राहते, रक्तदाब नियंत्रणात राहतो, टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते. ज्यामुळे तुमच्या संपूर्ण आरोग्यावर याचा चांगला परिणाम होतो. 

मखाणा खाण्यामुळे होतात हे आश्चर्यकारक फायदे

मखाणा तुमच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त पदार्थ आहे. ज्याचे तुमच्या संपूर्ण आरोग्यावर अनेक फायदे होतात. 

वजन कमी करण्यासाठी –

मखाणामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर्स असतात. ज्यामुळे तुम्हाला दिवसभर पोट भरल्यासारखे वाटतं. तळलेल्या आणि चटपटीत पदार्थांचा मोह टाळायचा असेल तर मखाणा आहारात जरूर घ्या. दोन जेवणाच्या मध्ये लागणारी भुक भागवण्यासाठी तुम्ही मखाणा खाऊ शकता. कोलेस्ट्रॉल, फॅट, सोडीयमचे प्रमाण कमी असल्यामुळे मखाणा खाण्यामुळे तुमचे वजन वाढत नाही. एवढंच नाही तर मखाणा ग्लुटेन फ्री असल्यामुळे आणि त्यात भरपूर प्रोटिन्स, कार्बोहायड्रेट्स असल्यामुळे तुमचे योग्य पोषणही होते. सहाजिकच मखाणामुळे तुम्ही अपथ्यकारक पदार्थ कमी प्रमाणात खाता आणि तुमचे वजन नियंत्रणात राहते. 

ह्रदयाचे आरोग्य सुधारते –

मखाणामध्ये मोठ्या प्रमाणावर मॅग्नेशियम असते. ज्यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि ह्रदयाला पुरेसे ऑक्सिजन मिळते. रक्तप्रवाह सुधारल्यामुळे तुमच्या शरीराला पोषकतत्त्व व्यवस्थित मिळतात. म्हणूनच जर तुम्हाला ह्रदयाच्या समस्या असतील तर तुमचे ह्रदय निरोगी राखण्यासाठी मखाणा  खा. 

Shutterstock

शरीराचा दाह कमी होतो –

काही गोष्टींमुळे तुमच्या शरीरातील उष्णता वाढते आणि शरीराला दाह, जळजळ जाणवते. हा दाह दाखवत असतो की, तुमच्या शरीराला थंडाव्याची अथवा दाहशमन करण्याची गरज आहे. हा दाह कमी वेळासाठी असू शकतो अथवा फार काळ जाणवू शकतो. शिवाय यामुळे तुम्हाला विविध प्रकारचे आजार आणि आरोग्य समस्या होऊ शकतात. मधुमेह, आर्थ्राटिस यामागे हा दाह कारणीभूत ठरू शकतो. मात्र मखाणामध्ये अॅंटिबॅक्टेरिअल घटक असतात. ज्यामुळे तुमच्या शरीराला होणारा दाह कमी होतो आणि विविध आरोग्य समस्यांपासून तुमचा बचाव होतो. 

टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात –

शरीर स्वच्छ न झाल्यामुळे अनेक टॉक्सिन्स शरीरात अडकून राहतात. ज्यामुळे अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. मात्र मखाणा तुमच्या शरीराला डिटॉक्स करण्यासाठी फायदेशीर ठरतं. ज्यामुळे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात. 

मखाणामध्ये आहेत औषधी गुणधर्म –

प्राचीन काळात चायनामध्ये मखाणा औषधाप्रमाणे वापरला जात असे. डायरिया, आर्थ्राटिस, मधुमेह अशा अनेक आरोग्य समस्यांवरील औषधात मखाणा वापरला जात असे. त्यातील अॅंटिऑक्सिडंट घटकांमुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होते. शिवाय मखाणा खाण्याचा तुमच्या पचनसंस्था आणि श्वसनसंस्थेवर चांगला परिणाम होतो.

Shutterstock

मखाणामुळे तुम्ही राहू शकता चिरतरूण –

मखाणामध्ये अॅंटिएजिंग घटक असतात. ज्यामुळे तुम्ही चिरतरूण दिसता. मखाणामुळे तुमची एजिंग प्रक्रिया मंदावते. चेहऱ्यावर सुरकुत्या कमी करण्यासाठी तुम्ही दररोज मखाणा नक्कीच खाऊ शकता. 

फोटोसौजन्य – इन्साग्राम

हे ही वाचा –

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा –

सुपरफूड अवकॅडोचे आरोग्यदायी फायदे

शेंगदाणे खाण्याचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का

दररोज अक्रोड खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे

 

Read More From आरोग्य