आता पुढचे 21 दिवस तुम्हाला घरातून बाहेर पडता येणार नाही. आधीच जीम बंद म्हणून तुम्ही उद्विग्न झाला असाल किंवा तुम्ही आता जीमला जाणारच होता अशा विचारात होता. तर आता तुमच्यासाठी एक चांगली वेळ आलेली आहे. सुडौल फिगरच स्वप्न तुम्ही पाहिलं असेल तर पुढचे 21 दिवस घरी राहून मस्त रुटीन सेट करा या 21 दिवसात घरी राहूनच तुम्हाला काय काय करता येईल ते बघुया. 21 दिवसांनंतर तुम्हाला हमखास तुमच्या फिगरमध्ये फरक झालेला नक्की जाणवेल.
संध्याकाळी कधीही खाऊ नका हे पदार्थ नाहीतर वाढेल वजन
अशी करा पूर्वतयारी
आता इतर डाएटप्रमाणे याची खास अशी पूर्वतयारी नाही. म्हणजे तुम्हाला जे घरी आहे तेच खायचं आहे. (इतर वेळी तुम्हाला घरचं खाण्याचा कंटाळा असतो. पण आता घरचं खाण्यावाचून काहीच पर्याय नाही.) त्यामुळे घरी जे बनत तेच तुम्हाला खायचं आहे. आता 24 तासात कामांव्यतिरिक्त तुम्हाला फार असं काही करायचं नाही. चला आपण तुमचा सगळा दिवस कामात जातो असं मानू.पण कामावर जाताना जो वेळ तुम्ही प्रवासात घालवत होता. तेवढा वेळ तरी तुम्ही तुमच्यासाठी काढा. पुरेशी आहेत.
असे करा तीन आठवड्यांचे नियोजन
आता एक चार्ट मी तुमच्यासाठी बनवला आहे. यानुसार आणि तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या खाद्यपदार्थांनुसार तुम्हाला यामध्ये बदल केले तरी चालणार आहेत. फरक इतकाच आहे की, एका बशीच्या वर आवडते पदार्थ खायला जाऊ नका इतकचं.
सकाळचा नाश्ता (सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत)
- कोमट पाणी आणि लिंबू / ग्रीन टी / ब्लॅक कॉफी
- 2 उकडलेली अंडी / कॉर्नफ्लेक्स / पोहे / उपमा / साबुदाणा खिचडी / दोन इडली / 2 डोसे (नाश्त्याला काहीही असेल ते तुम्ही खाऊ शकता. पण ते प्रमाणात असू द्या)
दुपारचे जेवण (दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत)
डाळ, भात, भाजी, पोळी, भाकरी, कोशिंबीर असा परिपूर्ण आहार असू द्या. थोडे तेलकट पदार्थ टाळा.
संध्याकाळचा नाश्ता (संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत)
चणे- शेंगदाणे, कुरमुऱ्याची भेळ, मोड आलेल्या कडधान्यांची भेळ असे काहीतरी परिपूर्ण असू द्या.
रात्रीचे जेवण ( रात्री 9 वाजण्याच्या पूर्वी)
एखादी पोळी किंवा भाकरी आणि भाजी, भरपूर सॅलेड
चिकन मिळणार असेल तर चिकन सलाद करुन खा.
वजन नियंत्रणात ठेवणाऱ्या या सोप्या सूप रेसिपीज, नक्की करुन पाहा
व्यायाम
आता तुम्हाला व्यायामाचा कंटाळा असेल तर नका करु व्यायाम तुम्हाला नाचायला तरी आवडेल का? मस्त युट्युबवर जाऊन 30 मिनिटांचा झुंबा दिवसातून दोनदा करा. सकाळी 30 मिनिटं आणि संध्याकाळी 30 मिनिटं. आता तुम्ही रोज एकच व्हिडिओ पाहून झुंबा करु नका. युट्युबवर असंख्य व्हिडिओ आहेत. हे व्हिडिओ खूप चांगले आहेत. तुम्हाला अगदी 5 मिनिटात तुमचे शरीर घामाने डबडबलेले जाणवेल. त्यामुळे मस्त दिवसातून दोनदा मनमोकळेपणाने नाचा. तुमच्या मनावरील घरी असण्याचा कुठेही जाऊ न शकण्याचा ताण निघून जाईल.तुम्हाला फ्रेश वाटेल.
21 दिवस नेटाने हे करा तुम्हाला अपेक्षित असलेली फिगर या दिवसात तुम्हाला नक्की मिळेल.
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.