मनोरंजन

काय काका मुलगी पाहिली नाही का,राखीने विचारला प्रश्न

Leenal Gawade  |  Jun 6, 2021
काय काका मुलगी पाहिली नाही का,राखीने विचारला प्रश्न

राखी सावंत कधी काय करेल याचा काही नेम नाही. ती कधी कोणाला काय बोलेल? सांगता येत नाही. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यापासून आता सगळीकडे तिचीच चर्चा असते. ती जिकडे जाते तिकडे तिला पापाराझी कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी टपूनच बसलेले असतात. आता पुन्हा एकदा राखी सावंत चर्चेत आली आहे ते या नव्या व्हिडिओमुळे तिच्याकडे टकमक बघणाऱ्या एका काकांना राखीने चक्क अंकल आपले लडकी देखी नही क्या असा सवाल केला आहे. आता तिच्या या नव्या व्हिडिओचे मीम व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे राखी पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आहे असेच म्हणायला हवे. नेमकं काय झालं ते जाणून घेऊया.

कृष्णा अभिषेकला आली चीची मामाची आठवण, शेअर केला गोविंदासोबत फोटो

तिच्याकडे बघणाऱ्याला विचारला प्रश्न

राखी सावंत रोज आपल्या घरातून बाहेर पडत कॉफी विकत घेण्यासाठी जवळच्या CCD मध्ये जाते. ती ज्यावेळी तिथे जाते. त्यावेळी आजुबाजूला लोकांचा गराडा असतो. तिच्या मागे पापाराझींना लागलेले पाहून अनेक जण कोणं आहे हे पाहण्यासाठी पुढे जातात. त्यापैकीच एक कोणीतरी राखी सावंतला पाहण्यासाठी पुढे आले असावे. तो माणूस राखीला इतका टकमक नजरेने पाहात होता की, राखीने त्याला लगेचच हटकले. तिने विचारले, तुम्ही कधी मुलगी पाहिली नाही का?, त्यानंतर ती फोटोग्राफर्सना सांगते की, ते माझ्या कपड्यांकडे बघतात. हे चांगलं आहे का? आता तिचा हा नवा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे. 

राखी आणि मिकाची भेट

 त्यातल्या त्यात राखी आणि मिकाची स्टोरी तर आता सगळ्यांनाच माहीत आहे. एका पार्टीदरम्यान मिकाने राखीची जबरदस्ती घेतलेली किस चांगलीच गाजली होती. पण काही दिवसांरपूर्वी याच कॉफी शॉपमध्ये जात असलाना आणि पापाराझींनी बोलत असताना राखीची भेट मिकाशी झाली. मिका खास त्याच्या गाडीतून उतरुन राखीला भेटायला आला. त्याने राखीला मिठी मारत घरी येण्यासाठी आमंत्रणसुद्धा दिले. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही वर्षांपूर्वी जे झाले होते ते खरे होते की आता जे होतय ते खरं आहे यावर विश्वास बसणे थोडे कठीणच आहे. पण मिकाचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खूप जणांना नक्कीच धक्का बसला असेल. 

राखी सावंत आणि चर्चा

राखी सावंत कदाचित फक्त विनोदी व्हिडिओ करते किंवा इन्स्टाग्रामवर नको त्या गोष्टी करते याच कारणासाठी सतत चर्चेत असायची कारण मध्यंतरी ती दिपक कलालशी लग्न करणार या कारणासाठी प्रसिद्धीत आली होती. त्यावेळी लोकांनी तिला नक्कीच शिव्या घातल्या होत्या. तिचा विनोदाचा दर्जा हा अत्यंत व्हायात आहे असे देखील म्हटले होते. पण बिग बॉस 15 च्या सीझनमध्ये आल्यानंतर ती काय आहे ते तिने दाखवून दिले. खरी राखी सावंत ही भोळी आहे आणि एटंरटेन्मेंटचा तडका आहे हे देखील दाखवून दिले होते. त्यामुळे या सीझननंतर इतर स्पर्धकांच्या तुलनेत तिलाच अधिक प्रसिद्धी मिळाली. याचाच परिणाम की काय आता पापाराझी सतत तिच्या मागे असतात. ती काय करते हे जाणून घेण्यासाठी ते सतत तिच्या मागे पुढे असतात. सध्या राखी सावंतच्या हाती काही मोठे प्रोजेक्टस लागलेले नाहीत. पण तरीदेखील ती कायम चर्चेत असते. 

‘रसभरी’ वेबसिरीज वर्षपूर्तीच्या निमित्ताने रश्मी अगाडकरने आठवले क्षण

राखी सावंतला सलमानची मदत

राखी सावंतच्या आईचे नुकतेच कॅन्सरचे ऑपरेशन झाले त्याचा व्हिडिओही तिने पोस्ट केला होता. तिला या काळात सलमान खानने मदत केली त्यासाठी तिने सलमानचे आभारही मानले होते. तिला या रिअॅलिटी शोमध्ये बोलावून त्याने एक कामाची संधीही दिली होती. 

आता राखीचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की बघा आणि कमेंट करायला विसरु नका.

तेजश्री- आशुतोषच्या त्या फोटोमुळे होतेय प्रेमाची चर्चा, लवकरच करणार का घोषणा

Read More From मनोरंजन