बऱ्याच कालावधीपासून दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या अंदाज अपना अपना या चित्रपटाच्या रीमेकची चर्चा सुरू आहे. या रीमेकसाठी आधी रणबीर कपूर आणि रणवीर सिंहच्या नावाची चर्चा होती. पण नवीन बातमीनुसार रणबीरचा पत्ता कट झाला असून त्याच्या जागी वरूण धवनची वर्णी लागली आहे. आमीर-सलमानच्या या धम्माल कॉमेडी रीमेकसाठी रणवीर आणि वरूण यांची निवड झाल्याची चर्चा आहे.
‘अंदाज अपना अपना’ ची 25 वर्ष
25 वर्षानंतर पुन्हा एकदा ‘अंदाज अपना अपना’ नव्या रुपात बघणं सगळ्यांच फॅन्ससाठी नक्कीच एक्सायटींग असेल. पण हा नवीन चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार संतोषीच करणार याबाबत मात्र अजून खुलासा झालेला नाही. अशी ही चर्चा आहे की, हा अंदाज अपना अपनाचा रीमेक नसून सीक्वेल असेल आणि या चित्रपटाची कहाणी पूर्णतः वेगळी असेल. ‘अंदाज अपना अपना’च्या ओरिजनल चित्रपटात सलमान खान आणि आमीरने प्रेम आणि अमरची भूमिका केली होती. तसंच या जोडीसोबत चित्रपटात रवीना टंडन, करिश्मा कपूर आणि परेश रावल यांच्याही भूमिका होत्या. या नवीन चित्रपटातही मास्टर गोगो असणार आहे. त्यामुळे अमर-प्रेमच्या जोडीनंतर रवीना आणि करिश्माच्या भूमिकेत तसंच गोगोच्या भूमिकेत कोण दिसणार याचीही उत्सुकता आहे.
‘गली बॉय’ रणवीर साकारणार ‘अमर’
सध्या रणवीर सिंह रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंबाला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर आता गली बॉय च्या प्रमोशनमध्ये व्यस्त दिसत आहे. आलिया भट्ट आणि रणवीरचा हा सिनेमा 1 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. गली बॉय चं ट्रेलर रिलीज होताच त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे आता या चित्रपटाबाबतही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. या चित्रपटात रणवीर रॅपरच्या भूमिकेत दिसणार आहे.
वरूण साकारणार ‘प्रेम’
दुसरीकडे वरूण धवनसुद्धा सध्या कलंक च्या शूटींगमध्ये बिझी आहे. या चित्रपटात माधुरी दीक्षित, संजय दत्त, आदित्य रॉय कपूर, आलिया भट्ट आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसंच दिग्दर्शक रेमो डिसूझाच्या आगामी ‘ABCD3’ मध्येही श्रद्धा कपूर अपोझिट वरूण दिसणार आहे.
नवीन अमर-प्रेमची जोडी
रणवीर आणि वरूण या दोघांबद्दल बोलायचं झालं तर हे दोघंही स्वभावाने मिश्कील आहेतच आणि ऑफ स्क्रीनही चांगले मित्र आहेत. त्यामुळे या चित्रपटात दोघांची केमिस्ट्री पाहायला नक्कीच मजा येईल. आता या नवीन अंदाज अपना अपना ची कथा कशी असेल याबद्दल उत्सुकता असेल.
फोटो सौजन्य – Instagram
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje