बॉलीवूड क्लासिक चित्रपट ‘मिस्टर इंडिया’ चा रिमेक बनणार असल्याची चर्चा गेले कित्येक महिन्यांपासून चालू आहे. बोनी कपूरने या चित्रपटाचा सिक्वल बनवणार नाही असं सांगितलं असलं तरीही ‘टायगर जिंदा है’ चा दिग्दर्शक अली अब्बासने मात्र मिस्टर इंडियाच्या सिक्वलची जोरदार तयारी चालू केली आहे असं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा अलीचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या चित्रपटात अली अब्बास जाफर रणवीर सिंहला मिस्टर इंडियाच्या भूमिकेत घेण्यासाठी प्रयत्नात असल्याचंही समजत आहे. हे एक स्पिन ऑफ असल्याचं सांगितलं जात आहे. तसंच हा चित्रपट मोठ्या बजेटनुसार बनवण्यात येणार असल्याचेही म्हटले जात आहे. हा चित्रपट प्रि – प्रॉडक्शनच्या स्टेजवर असल्याचंही सांगण्यात येत आहे. अली अब्बास जाफरने स्क्रिप्टचा पहिला ड्राफ्टदेखील तयार केला आहे.
स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेला निरोप देताना कलाकार झाले भावूक
2022 मध्ये चित्रपट होणार प्रदर्शित
रिपोर्टनुसार अली अब्बास जाफर या चित्रपटासाठी खूपच मेहनत घेत आहे. त्याशिवाय कोणत्याही प्रकारची जोखीम या चित्रपटासाठी त्याला घ्यायची नसून अतिशय काळजीपूर्वक पाऊल टाकायचे असल्याचेही समजत आहे. या चित्रपटातील मोगँबोच्या भूमिकेसाठी सध्या कलाकाराचा शोध चालू आहे. या भूमिकेसाठी अली अब्बास जफरच्या डोक्यात असलेल्या कलाकारालाच त्याला कास्ट करायचं असल्याचं सांगण्यात आलं आहे. हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित करण्यात येणार असल्याचंही म्हटलं जात आहे. त्याशिवाय अली अब्बास जाफरला एक फिमेल सुपरहिरो चित्रपटही करायचा आहे ज्यामध्ये त्याला त्याची आवडती अभिनेत्री आणि जवळची मैत्रीण कतरिना कैफला कास्ट करायचं आहे.
सिद्धार्थ शुक्लाचे जिंकणे आधीच होते निश्चित,कलर्सच्या कर्मचाऱ्याने केला खुलासा
बोनी कपूरला करायचा होता सिक्वेल
बोनी कपूरदेखील मिस्टर इंडियाच्या सिक्वेलवर काम करत होते. या चित्रपटात पुन्हा एकदा श्रीदेवी आणि अनिल कपूर ही जोडी एकत्र आणण्याचा बोनी कपूरची इच्छा होती. पण श्रीदेवीच्या मृत्यूनंतर बोनी कपूरने या चित्रपटाचा आपण सिक्वल करत नसल्याचं सांगितलं आहे. बोनी कपूरचं श्रीदेवीवर प्रचंड प्रेम असल्यामुळे तिच्या जागी कोणत्याही दुसऱ्या अभिनेत्रीचा विचार आपण करू शकत नाही असंही त्यांनी म्हटलं होतं. मिस्टर इंडिया या चित्रपटाला 32 वर्ष पूर्ण झाल्यानंतर बोनी कपूरने म्हटलं होतं की, या चित्रपटानंतर श्रीदेवीकडे प्रेक्षकांचा पाहण्याचा दृष्टीकोन बदलला होता आणि याच चित्रपटानंतर श्रीदेवी एक उत्तम अभिनेत्री आणि कलाकार म्हणून गणण्यात आली होती. तर अनिल कपूरला या चित्रपटामुळे जबरदस्त लाईमलाईट मिळाला होता.
‘तान्हाजी’मध्ये सोयराबाईंची भूमिका साकारणाऱ्या इलाक्षी गुप्ताच्या सौंदर्याचं गुपित
अनिल कपूरची भूमिका पेलणार रणवीर सिंह
रणवीर सिंह एक तगडा कलाकार असून मिस्टर इंडियामधील अनिल कपूरची भूमिका त्याला विचारण्यात आली आहे. पण अजूनही यावर कोणत्याही प्रकारचे अधिकृत स्टेटमेंट रणवीर सिंहकडून आलेले नाही. सध्या रणवीर सिंह ‘83’ या आपल्या चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनमध्ये व्यस्त आहे. त्याशिवाय ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटाचं चित्रीकरणही सुरू आहे. पण या भूमिकेसाठी रणवीर सिंह योग्य आहे असं दिग्दर्शकाचं मत असून रणवीरने या चित्रपटाला होकार दिला की नाही याची मात्र कोणतीही माहिती नाही. मिस्टर इंडिया हा आयकॉनिक चित्रपट असून त्याला योग्य न्याय रणवीर सिंह देऊ शकेल अशी त्याच्या चाहत्यांमध्येही चर्चा आहे. त्याशिवाय या चित्रपटात श्रीदेवीची भूमिका कोण साकारणार याचीही उत्सुकता आता चाहत्यांना नक्कीच लागून राहिली आहे.
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje