आरोग्य

मळमळ, खाण्याची इच्छा होत नाही मग एकदा वाचाच

Leenal Gawade  |  May 24, 2022
जेवणाचा कंटाळा आलाय

कधी कधी अचानक सगळे काही सुरळीत सुरु असताना आपल्याला अचानक काहीही खावेसे वाटत नाही. खूप चांगला पदार्थ समोर वाढून ठेवला असेल तरी त्याचा वासही घेवत नाही.वेगवेगळ्या कारणामुळे असा त्रास सगळ्यांना होऊ शकतो. एखादा आवडीचा पदार्थ पाहिल्यानंतर मळमळणे, त्याचा वास सहन होत नसेल असे काही होत असेल तर तुम्हाला नक्कीच काही त्रास असू शकतो. कोणालाही असा त्रास अगदी सहज होऊ शकतो. मळमळ आणि खाण्याची इच्छा न होण्यामागे काही कारणे असू शकतात. चला जाणून घेऊया ही काही कारणे

पिरेड्स

मासिक पाळीच्या काळात खूप महिलांना काहीही खावेसे वाटत नाही. म्हणजे एखादा अगदी आवडीचा पदार्थ असला तरी देखील तो खाण्याची इच्छा होत नाही. मासिक पाळी येण्याच्या आधी काही काळ असा त्रास खूप महिलांना होतो. काहीही खाण्याची इच्छा होत नाही. कधी कधी या विरुद्धही होऊ शकते. म्हणजे काही जणांना खूप काही खावेसे वाटते. पण असे खाल्ल्यामुळे मळमळायला देखील लागते. तुम्हालाही मासिक पाळीच्या आधी असा त्रास होत असेल तर हा त्रास एकदम सर्वसामान्य आहे. हा त्रास मासिक पाळी आल्यानंतर आपोआप कमी होऊ लागतो.

गाठ कंटाळणे

कधी कधी एकसारखे जेवण जेवून जेवून आपल्याला कंटाळा येतो. रोज रोज जर जेवणात तेच पदार्थ असेल तर अशा पदार्थांचा कंटाळा येणे अत्यंत स्वाभाविक आहे.
उदा. खूप जणांना एखादी डाळ पाहिल्यानंतरही त्रास होऊ लागतो. त्याची चव एकदा डोक्यात बसलेली असली तरी देखील ती चव नकोशी होते. यालाच खूप जण गाठ कंटाळली असे देखील म्हणतात. एक एक प्रकारचे खाऊन तुम्हाला त्रास झाला असेल तर तुम्ही तुमचे जेवण बदलून बघा. त्यामुळे तुम्हाला नक्कीच फरक पडण्यास मदत मिळेल.

लाईफस्टाईल बदलणे

हल्लीचे आयुष्य इतके धकाधकीचे झाले आहे की, खूप जणांच्या जेवणाच्या वेळा या बदललेल्या आहेत. कधी काय खावे याच्या योग्य वेळा नसल्यामुळे जेवण पचण्यासही तितकाच वेळ लागतो. त्यामुळे होते असे की, काही पदार्थ आवडीचे असले तरी देखील ते खावेसे वाटत नाही. ते खाल्ले तरी देखील ते पचत नाही. तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काय बदल झाला ते एकदा जाणून घ्या म्हणजे तुम्हाला जेवणाचे योग्य टाईमटेबल आखता येईल. जेवणाचा कंटाळा देखील येणार नाही.

तेच तेच जेवण

खूप जणांकडे जेवणामध्ये अजिबात व्हरायटी नसते. म्हणजे जेवणाचा प्रकार ठरलेला असतो. सकाळी नाश्त्याला भाकरी, जेवणाला भाजी- वरणभात, पोळी- भाजी असे फिक्स असते. त्यामुळेही कधी कधी कंटाळा येतो. सपक भाज्या आणि तेच तेच पणा तुम्ही करत असाल तर तुम्ही थोडासा बदल करायला हवा. असा बदल केला तर नक्कीच तुम्हाला खाण्याची इच्छा होईल. 

मळमळण्यामागे जर तुमचे आरोग्य हे कारण नसेल तर तेच तेच पणा हे कारण असू शकते. ही चूक होत असेल तर यात आताच बदल करा.  

Read More From आरोग्य