बॉलीवूड

रिया चक्रवर्तीच्या समर्थनार्थ आल्या बॉलिवूडच्या या अभिनेत्री, केले ट्विट

Leenal Gawade  |  Aug 31, 2020
रिया चक्रवर्तीच्या समर्थनार्थ आल्या बॉलिवूडच्या या अभिनेत्री, केले ट्विट

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये रोज नव्या गोष्टी समोर येताना दिसत आहेत. पण अजूनही यामध्ये प्राथमिक संशयित आरोपी म्हणून रिया चक्रवर्तीचे नाव सातत्याने घेतले जात आहे.34 वर्षीय सुशांतच्या आत्महत्येसाठी रियाच जबाबदार असल्याचा दावा अनेकांनी केल्यामुळे रिया चक्रवर्तीवर CBI ची करडी नजर आहे. तिला अनेक वेळा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. नुकतेच काही न्यूज चॅनेल्सना रियाने इंटरव्ह्यू दिले आहेत. या दरम्यान तिने झालेला सगळा घटनाक्रम आणि आरोपांविषयी सांगितले आहे.त्यानंतर अनेकांनी तिच्यावर बहिष्कार टाकला आहे. पण काहीजण मात्र तिच्या समर्थनार्थ उभी राहिली आहेत. बी टाऊनमधील अनेक बड्या सेलिब्रिटींनी तिला पाठिंबा दिल्याचे आता समोर आले आहे. यामध्ये मिनिषा लांबा, स्वरा भास्कर, लक्ष्मी मांजू, तापसी पन्नू या काही अभिनेत्रींचा समावेश आहे. या अभिनेत्रींनी रियाला नेमका कशाप्रकारे पाठिंबा दिला आहे ते आता जाणून घेऊया.

टेरेन्स लुईसचा हिंदीचा क्लास होतोय व्हायरल, Vlogeshwari मध्ये येतेय मजा

काय आहे या अभिनेत्रींचे म्हणणे

रिया चक्रवर्तीला समजून घेत तिला पाठिंबा देण्याचा अनेक अभिनेत्रींनी विचार केला आहे. सुशांतच्या मृत्यूचे कोडे सगळ्यांनाच सोडवायचे आहे. पण त्यासाठी सोशल मीडियावर रिया चक्रवर्तीच्या विरोधात सुरु असलेली मोहीम या अभिनेत्रींना खटकली आहे. म्हणूनच त्यांनी ट्विट करत रियाची बाजू घेतली आहे. काय म्हणाल्या या अभिनेत्री ते जाणून घेऊया. 

मिनिषा लांबा

Instagram

रियाने दिलेल्या मुलाखतीनंतर अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत. इतक्या महिन्यांमध्ये काय घडले हे तिने यामध्ये सांगितले आहे. कुटुंबासाठी आणि रियासाठी हा मोठा धक्का आहे. तुमच्याप्रमाणे तिला आणि त्याच्या कुटुंबियांना न्यायाची अपेक्षा आहे. पण त्यासाठी थोडं थांबा.

जेव्हा बॉलीवूड कलाकारांनी त्यांच्या को-स्टारमुळे नाकारले हिट चित्रपट

लक्ष्मी मंचू

Instagram

रिया चक्रवर्तीची मुलाखत पाहिल्यानंतर काय बोलावे कळत नव्हते. खूप जण हा इंटरव्हयू ऐकून गप्प आहेत. कारण मीडियाने त्या मुलीला (रिया) राक्षस करुन ठेवले आहे. या घटनेमध्ये खरं काय आहे हे मला देखील माहीत नाही. मलाही खरं काय ते जाणून घ्यायचे आहे. माझा न्यायपालिका आणि पोलीस प्रशासनावर पूर्णपणे विश्वास आहे.ते सुशांतला नक्कीच न्याय मिळवून देतील. पुढे ती म्हणाली, की कुटुंबावर झालेला आघात मी समजू शकते. पण अशावेळी मी यामध्ये असते तर मला कोणीतरी पाठिंबा द्यावा असे मला नक्की वाटले असते. जर पाठिंबा देणे शक्य नसेल तर किमान त्या परिस्थितीत मला विचार करण्यासाठी एकटे सोडून द्यावे अशी अपेक्षा आहे. आताही त्याची गरज आहे. तिला काही काळासाठी एकटे सोडा. पोलिसांवर विश्वास ठेवा. 

स्वरा भास्कर

Instagram

स्वरा भास्कर अनेकदा अशा सोशल कॉन्ट्राव्हर्सीजमध्ये बोलत असते. तिने सुशांतच्या मृत्यूनंतर अनेक वेळा ट्विट केले आहे. पण आता तिने रियाच्या एका चॅटवर रिट्विट करत तिने रियाला फसवले जात आहे का? असा प्रश्न केला आहे. सुशांतची मानसिक स्थिती चांगली नव्हती हे सांगणारे चॅट असून तिने न्यूज चॅनेलच्या एका अँकरला निशाणा साधत आता मोठ्या आवाजात बोलणाऱ्या अँकरने हे पाहिले नाही का? तिने या ट्विटमधून मीडिया ट्रायलवरही आक्षेप घेतला आहे. 

जाणून घ्या, सप्टेंबरमध्ये जन्म झालेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये

तापसी पन्नू

Instagram

मी सुशांत आणि रिया या दोघांनाही व्यक्तिगत ओळखत नाही. पण न्यायपालिका आणि पोलिसांच्यावर जाऊन आपण कोणालाही दोषी ठरवू शकत नाही. न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा आणि मृत सुशांतचे पावित्र्य राखून ठेवा. 

या काही अभिनेत्रींनी ट्विट करत रियाची बाजू समजून घेतली आहे.यामध्ये काही अन्य अभिनेत्रींचाही समावेश आहे. 

 

 

Read More From बॉलीवूड