प्लास्टिक शरीरासाठी कितीही घातक आहे असं म्हटलं तरी आपल्या दैनंदिन आयुष्यात प्लास्टिकचा वापर केल्यावाचून आपण राहात नाही. हॉटेलमधून आलेला एखादा प्लास्टिकचा डबा किंवा पाण्याची बाटली म्हणजे अनेकांसाठी जिव्हाळाचा विषय असतो. घरातील एक तरी महिला हे डब्बे आणि पाण्याच्या बाटल्या ठेवते. कारण बाहेर जाताना किंवा कोणालातरी द्यायला या बॉटल आणि डब्बे बरे पडतात. तर काही जण महागडे डबे किंवा बाटल्या हरवण्याच्या भीतीने या बाटल्या वापरतात. कोल्ड्रींक, पॅकेज पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या जर तुम्ही वारंवार वापर असाल तर मग तुम्हाला आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.. का? ते वाचा
नोव्हेंबर महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती असतात प्रभावशाली, जाणून घ्या
पाण्याची बाटली किती वेळा वापरायला हवी
shutterstock
आता अनेकांना हा प्रश्न पडतो की, प्लास्टिकची पाण्याची बाटली किती वेळा वापरायला हवी. जर तुम्ही पाण्याची वाटली नीट निरखून पाहिली असेल तर त्या बॉटल खाली काही चिन्हं असतात. त्या खाली एक त्रिकोण असतो. त्या त्रिकोणात आकडे आणि काही इंग्रजी अक्षरं लिहिलेली असतात. त्यावर त्याचा वापर अवलंबून असतो. म्हणजे जर तुमच्या बॉटलच्या बुडाशी असलेल्या त्रिकोणावर PET किंवा PETE असे लिहिले असेल तर ती बॉटल एकदाच वापरण्यासाठी असते. सगळ्या पॅकेज ड्रिकींक बॉटल आणि कोल्ड्रींक या एकाच वापरासाठी असतात.
हे होतील त्रास
आता जर एकदाच वापरण्याची वस्तू तुम्ही सतत वापरत असाल तर तुम्हाला त्याचा त्रास होणारच ना. या बॉटलची क्षमता सतत वापरण्याची नसल्यामुळेच एका वापरानंतर या प्लास्टिकच्या बॉटलमधून विषारी द्रव्य सोडली जातात. सूर्य, उष्णता, ऑक्सिजन यांच्या संपर्कात येताच हे बदल घडत असतात. कारण ज्यावेळी पाणी किंवा कोल्ड्रींक हवाबंद केले जाते. त्यावेळी एक प्रक्रिया केली जाते. त्यामुळे त्याचा बाहेरच्या कोणत्याच गोष्टीशी संपर्क येत नाही. आता एकदा संपर्कात आल्यानंतर त्यामध्ये विषारी घटक सोडली जातात. त्याचा त्रास तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. यातील पॉलिथीन 2 आणि 4 तर पॉलिप्रॉपलीन 5 या प्लास्टिकने बनलेल्या बाटल्या या तुम्ही कितीही कालावधीसाठी वापरु शकता.पण त्या तुम्ही सतत निर्जंतुक केल्या तरच त्याचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाही.
shutterstock
गरम पाणी किंवा पदार्थ तर अजिबात नको
आता जर तुम्ही या अशा बाटल्यांमध्ये गरम पाणी किंवा गरम पदार्थ भरुन नेत असाल तर ते आताच थांबवा. एकदा वापरायच्या बॉटलमध्ये तर तुम्ही हे अजिबात करु नका. कारण उष्णतेच्या संपर्कात आल्यानंतर तर यामधील द्रव्यांमध्ये अनेक विषारी घटक मिसळतात. म्हणूनच तुम्ही याचा असा वापर अजिबात करु नका. आता जर तुम्ही तुमची बॉटल नीट निरखून पाहिली तर तुम्हाला त्याच्या बुडाशी असलेली माहिती वाचा आणि मगच तुम्ही त्याचा वापर करा.
Healthy Fitness साठी नक्की ट्राय करा महत्त्वाचे नियम
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.