मनोरंजन

कुमकुम भाग्यमध्ये आता आलियाच्या रूपात दिसणार रिहाना पंडित

Trupti Paradkar  |  Jul 8, 2020
कुमकुम भाग्यमध्ये आता आलियाच्या रूपात दिसणार रिहाना पंडित

टेलिव्हिजन मालिका आणि प्रेक्षकांचे नेहमीच एक अतूट नातं असतं. मात्र मागील काही महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे या नात्यात थोडा दूरावा आला होता. अनलॉक 2 चा टप्पा सुरू झाल्यामुळे पुन्हा एकदा आता जनजीवन पूर्ववत होत आहे. त्यामुळे अनेक मालिकांनी पुन्हा आपलं शूटिंग सुरू केलं आहे.  ‘कुमकुम भाग्य’ या लोकप्रिय मालिकेच्याही चित्रीकरणाला सुरूवात केली असून आता या मालिकेत एक मोठा बदल सर्वांना पाहायला मिळणार आहे. लॉकडाऊननंतर या मालिकेतील आलिया बदलण्यात येणार आहे. रिहाना पंडित या मालिकेतील प्रवेशासाठी आलिया या भूमिकेसाठी सज्ज झाली आहे. गेली सहा वर्ष शिखा सिंहने या मालिकेत ‘आलिया’ ही एक खलनायिका भूमिका साकारली होती. मात्र तिची जागा आता पुढील एपिसोडमध्ये रिहाना पंडित घेणार आहे. 

आलिया बदलण्यामुळे शिखा सिंहला धक्का

अभिची (शब्बीर आहलुवालिया) बहीण ‘आलिया’ ही कुमकुम भाग्य या मालिकेतील एक महत्त्वाची भूमिका आहे. या भूमिकेला नकारात्मक छटा असूनही या भूमिकेवर प्रेक्षकांना भरभरून प्रेम केलं आहे. आतापर्यंत शिखा सिंहने या भूमिकेला योग्य न्याय दिला होता. मात्र शिखा सिंह नुकतीच आई झाली आहे. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आई झाल्यामुळे शिखा काही दिवसांसाठी मॅटर्निटी लिव्हवर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिला मालिकेच्या शूटिंगसाठी वेळ देणं शक्य नाही. शिवाय कोरोनाच्या परिस्थितीत तिने तिच्या मुलीला घरी ठेवून शूटिंगसाठी जाणं सुरक्षितदेखील नाही. त्यामुळे या मालिकेतील तिची भूमिका रिहाना पंडितला देण्यात आली आहे. रिहानाला शिखाच्या जागी रिप्लेस केल्यामुळे शिखा सिंहला मात्र नक्कीच धक्का बसला आहे. कारण तिल्या याबाबत अधिकृतरित्या काहीच सांगण्यात आलेलं नाही. तिला न सांगताच तिची भूमिका रिप्लेस केल्यामुळे ती सध्या नक्कीच खुष आहे असं वाटत नाही. मात्र अशा परिस्थितीत निर्मात्यांना कधी कधी कठोर निर्णय घ्यावे लागतात. आलियाला शिखाने योग्य न्याय दिला होता त्यामुळे शो मस्ट गो ऑन म्हणत या भूमिकेसाठी तिच्याप्रमाणेच नकारात्मक भूमिकेसाठी लोकप्रिय असलेल्या रिहानाची निवड करण्यात आली आहे. 

रिहाना पंडित आलियाच्या भूमिकेसाठी सज्ज

रिहाना पंडित आलियाची भूमिका साकारण्यासाठी नक्कीच उत्सुक आहे. तिच्या मते कुमकुम भाग्य ही मालिका टेलिव्हिजनवरील एक टॉप रेटेड मालिकांपैकी एक आहे. ज्यामुळे तिला या मालिकेचा एक हिस्सा बनताना खूप आनंद होत आहे. आलियाची शक्तीशाली भूमिका साकारणं तिच्यासाठी नक्कीच आव्हानात्मक असेल. रिहानच्या मते, “शिखाने ही भूमिका गेली काही वर्षे सक्षमपणे साकारली आणि मला आशा आहे की या शो चे चाहते मलाही तिच्याचप्रमाणे या भूमिकेत स्वीकारतील आणि तितकंच प्रेम देतील. आलियाच्या भूमिकेला अनेक स्तर आणि छटा आहेत. मी चित्रीकरणाला सुरूवात केली असून सेटवर येताना मला नक्कीच खूप आनंद होत आहे. सेटवर आता अनेक बदल घडले असून सुरक्षेची खूप काळजी घेतली जात आहे. पण आता हे नवीन बदल नॉर्मल झाले असून सध्याच्या कठीण परिस्थितीत अगदी गरजेचे आहेत. या शोसाठी मी माझे सर्वोत्तम देईन आणि 13 जुलैपासून या शोमध्ये सर्वांना अनेक नवीन टि्‌वस्ट पाहायला मिळतील.” रिहानाने यापूर्वी इश्कबाज या मालिकेतही नकारात्मक भूमिका साकारलेली आहे. त्यामुळे तिला आलियाच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक असतील. 

Instagram

कुमकुम भाग्यच्या नवीन एपिसोडमध्ये काय असेल

आलियाच्या व्यक्तिरेखेसह या मालिकेत रणबीर (कृष्णा कौल) आणि प्राची (मुग्धा चाफेकर) यांच्या आयुष्यातही नवीन घडामोडी होतील. लॉकडाऊनच्या आधीच्या भागांमध्ये पाहायला मिळाले होते की रणबीरने आपल्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर प्राची त्याच्यापासून लांब राहू लागली आहे, पण खरंतर मनातून तिचेही त्याच्यावर प्रेम आहे. रणबीरचे लग्न मायाशी ठरले आहे. पण मॉलमध्ये रणबीर आणि प्राची यांची केमिस्ट्री त्याची आजी दलजीत आणि आई पल्लवी पाहतात. त्यामुळे आता त्या मायासोबतची त्याची एंगेजमेंट वेळेत थांबवतील का हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

 

Read More From मनोरंजन