एकदा चित्रपटात काम केले की, कलाकार छोट्या पडद्याकडे सहसा वळत नाही असा अनुभव आहे. पण हल्लीच्या कलाकारांना उत्तम सादरीकरण आणि प्रेक्षकांचे प्रेम मिळणे अपेक्षित असते असे दिसते. कारण अनेक जण हल्ली मोठा पडदा किंवा छोटा पडदा असा भेद करताना दिसत नाही. हल्ली अनेक मराठी कलाकार हे मालिका आणि चित्रपट या कोणत्याही माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणे पसंत करतात. आता आपली लाडकी रिंकू राजगुरुचं (Riku Rajguru) घ्या ना! चित्रपट, सीरिज या माध्यमातून ती आलीच आहे. पण आता लवकरच ती छोट्या पडद्यावरही दिसणार आहे. पण ती कोणत्या रुपात दिसणार आहे हे देखील जाणून घेऊया.
बस बाई बस…
रिंकू राजगुरुचा एक प्रोमो सध्या सगळीकडे व्हायरल होताना दिसत आहे. या मध्ये ती आणि अभिनेत्री अलका कुबल या एका बसमध्ये बसल्या असून त्यांच्या आजुबाजूला असणाऱ्या महिला त्यांना मनात असलेले प्रश्न विचारत आहेत. त्यामुळे हा नवा शो ‘बस बाई बस’ असा असून या कार्यक्रमात केवळ महिला अभिनेत्री या भेटायला येणार आहेत. इतकेच नाही तर यामध्ये तुमचे काही प्रश्न तुम्हाला तुमच्या आवडीच्या सेलिब्रिटींना विचारता येणार आहे. आता नावावरुन तरी हा बसमध्येच शूट होईल असा भाग वाटत आहे. एका नव्या फॉर्मेटसह आणि नव्या सूत्रसंचालकासह हा शो लवकरच सुरु होणार आहे. या शोचे सूत्रसंचालन सुबोध भावे करणार असून येत्या 29 जुलैपासून हा शो पाहता येणार आहे. त्यामुळे आता कोणकोणत्या महिला सेलिब्रिटी भेटायला येतील याची उत्सुकता आहे.
रिंकू झाली फेमस
रिंकू राजगुरुला आताच्या घडीला कोण ओळखत नाही. तिने सैराटनंतरही आपली यशोगाथा सुरु ठेवली आहे. रिंकूने चित्रपटानंतर आपला जम वेबसीरिजमध्येही बसवला आहे. साऊथ असू दे की हिंदी तिने आपला चांगलाच दबदबा निर्माण केला आहे. त्यामुळे रिंकू संदर्भात अनेकांना प्रश्न पडणे साहजिक आहे. रिंकूने ज्यावेळी आपल्या करिअरला सुरुवात केली त्यावेळी ती शाळेत होती. त्यामुळे आता ती काय करते असा प्रश्न पडणे साहजिक आहे नाही का? त्यामुळे या शोचा प्रोमो पाहताना पडणारे प्रश्न आपल्या मनातही पडतातच. याच प्रोमोमध्ये आपल्याला दिसत आहेत त्या ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल. त्यांनीही अगदी तरुणपणापासून मराठी चित्रपटात काम करुन आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांना अनेक प्रश्न विचारण्याची खूप जणांना इच्छा आहे. एक तरुण कलाकार आणि ज्येष्ठ कलाकार असा हा भाग रंगणार असून याची अनेकांना प्रतिक्षा आहे.
सुबोध भावे करणार सूत्रसंचालन
हा नवा शो येत्या 29 जुलैपासून सुरु होणार असून या शोच्या फॉर्मेटनुसार यामध्ये केवळ महिला कलाकार येणार आहेत. ही महिला स्पेशल बस असून या बसचा कंडक्टर म्हणजेच सूत्रसंचालन म्हणून सुबोध भावे दिसणार आहे. सुबोध भावेचा अभिनय काळजाला भिडणारा असतोच. पण त्याचे सूत्रसंचालनही तितकेच भावणारे असणार आहे यात काही शंका नाही. आता या एक प्रोमोनंतर पुढचा प्रोमो काय असेल याची उत्सुकता आता अनेकांना आहे.
दरम्यान, रिंकूसोबत तुम्हाला अन्य कोणत्या अभिनेत्रीला या शोमध्ये पाहायला आवडेल? नक्की कळवा.
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade