बॉलीवूड

रोहीत शेट्टी लागला ‘सिंघम 3’ च्या तयारीला, सूर्यवंशीमध्ये दिली होती हिंट

Trupti Paradkar  |  Nov 11, 2021
रोहीत शेट्टी लागला ‘सिंघम 3’ च्या तयारीला, सूर्यवंशीमध्ये दिली होती हिंट

रोहीत शेट्टी दिग्दर्शित सूर्यवंशी चित्रपट सध्या सगळीकडे धुमाकूळ घालत आहे. दोन वर्ष रखडल्यानंतरही सिनेमागृहात हा चित्रपट सध्या तुफान चालला आहे. सूर्यवंशीच्या यशानंतर आता रोहीत शेट्टीने त्याच्या आगामी चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे नेहमीप्रमाणेत त्याने याही चित्रपटात त्याच्या आगामी चित्रपटाची हिंट दिली होती. सूर्यवंशी चित्रपटात शेवटच्या सीनमध्ये अजय देवगणची एन्ट्री होते आणि त्यातच त्याच्या आगामी चित्रपट सिंघम 3 च्या कथानकाची उकल होते. ज्यांनी रोहीत शेट्टीचे चित्रपट आवडतात त्यांना त्याची ही स्टाईल देखील नक्कीच आवडते. आता लवकरच रोहीत शेट्टी सिंघम, सिंघम रिटर्न्स नंतर त्याचा पुढील सीक्वल अजय देवगणसोबत घेऊन येत आहे. 

Bigg Boss Marathi: स्नेहा वाघने विकासवर केले गंभीर आरोप, प्रेक्षक नाराज

‘सिंघम 3’ चे काय आहे कथानक 

रोहीत शेट्टीने सूर्यवंशीनंतर त्याचा मोर्चा सिंघम 3 च्या शूटिंगकडे वळवला आहे. लवकरच या चित्रपटाबद्दल सर्व माहिती सविस्तर जाहीर केली जाणार आहे. सध्या या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे. मात्र कथानक ठरलेले असल्यामुळे त्याची उकल त्याने सूर्यवंशीमध्ये केलेली आहे. हा चित्रपट अंटि नॅशनल एलिमेंटशी असलेला लढा दाखवणारा असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाचे कथानक जम्मू काश्मिरमधून आर्टिकल 370 दूर करण्याबाबत असेल.  जसं सिम्बामध्ये रोहीतने सूर्यवंशी चित्रपटाची घोषणा केली होती. तशीच घोषणा रोहीत शेट्टीने सूर्यवंशीमध्ये सिंघम 3 ची केली होती. कारण सूर्यवंशीमध्ये एक सीन आहे ज्यात  कसं आर्टिकल 370 मुळे काश्मिर आणि दहशतवाद्यांमध्ये समस्या निर्माण झाल्या आहेत हे दाखवण्यात आलं होतं. याच सूत्राचा आधार घेत रोहीत त्याचा आगामी चित्रपट सिंघम 3 सर्वांसमोर आणण्यास सज्ज झाला आहे.  

सलमान खानने कतरिना-विकीच्या लग्नासाठी पुढे ढकललं का ‘टायगर 3’ चं शूटिंग

कधी सुरू होणार ‘सिंघम 3’ चे शूटिंग

सिंघम 3 सत्य घटनेवर आधारित असेल. ज्यात सरकारच्या या निर्णयामुळे दहशतवादी संगठणांवर काय परिणाम झाला हे दाखवण्यात येणार आहे. रोहीत शेट्टी अजय देवगणसोबत हा चित्रपट काश्मिरमधील काही लोकेशन्सवर शूट करणार आहे. यासाठी त्याने गोवा, दिल्ली, काश्मिरमधील लोकेशन फिक्स केले आहेत. स्क्रिप्ट तयार होताच चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली जाणार आहे. नेहमीप्रमाणेच याही चित्रपटात मोठ मोठे एक्शन सीन्स दाखवले जाणार आहेत. सिंघममध्ये मुख्य व्हिलन जॅकी श्रॉफच असणार आहे. कारण सूर्यवंशीमध्ये जॅकी श्रॉफ दहशतवादी संघठनेचा मुख्य दाखवण्यात आलेला आहे. सूर्यवंशी चित्रपटात फक्त त्यालाच जिंवत ठेवण्यात आलं आहे. याचा अर्थ पुढील चित्रपट यालाच लिंक असणार आहे. कारण शेवटच्या सीनमध्ये सिंघम त्याला म्हणतो की तुझा शेवट माझ्या हातून आहे. लवकरच याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार अशी चर्चा सुरू आहे.

जेव्हा नागराज मंजुळे म्हणतात, “जयंती झालीच पाहिजे!”

Read More From बॉलीवूड