फ्रेब्रुवारी महिन्यात सर्वत्र प्रेमाचं गुलाबी वातावरण असतं. कारण या महिन्यात प्रेम व्यक्त करण्यासाठी तुमच्याजवळ असतो एक संपूर्ण आठवडा… रोझ डे पासून व्हॅलेंटाईन्स डे पर्यंत प्रेमयुगूलांसाठी सेलिब्रेशनची पर्वणीच असते. सात फेब्रुवारीला रोझ डेने या आठवड्याची मस्त सुरुवात झाली आहे. हा आठवडा आणि येणारा प्रेमदिन कसा साजरा करायचा यावर प्रत्येक कपल्सचं वेगवेगळं प्लॅनिंग नक्कीच सुरू असेल. मात्र प्रेमाची परिभाषा माणसाला खऱ्या अर्थाने शिकवली ती चित्रपटसृष्टीने आणि सध्याचा जमाना आहे वेबसिरिजचा. म्हणूनच यंदाचा प्रेमदिन साजरा करण्यासाठी जोडीदारासोबत पाहा या रोमॅंटिक वेबसिरिज आणि एकमेकांना द्या अशा शुभेच्छा Valentines Day Quotes In Marathi | व्हॅलेंटाइन्स डे कोट्स आणि संदेश
लिटिल थिंग्ज-
लिटिल थिंग्जचे आतापर्यंत चार सीझन प्रदर्षित झालेले आहेत. यातील ध्रुव आणि काव्याची लव्हस्टोरी अतिशय साझी पण स्पेशल आहे. लिटिल थिंग्जचे चारही सीझन हिट ठरले आहेत. प्रेमात पडलेल्या कपल्सची भांडणे, दैनंदिन समस्या, नात्यातील तणाव आणि या सर्वांवर मात करत एकमेकांवरील निस्वार्थ प्रेम या वेबसिरीजमधून प्रेक्षकांसमोर येतं. यात ध्रुव सेहगल आणि मराठमोळ्या मिथिला पारकरने मुख्य भूमिका साकारलेल्या आहेत. या प्रेमदिनाला तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत ही वेबसिरिज नक्कीच पाहू शकता. तुमच्या नात्याची परिभाषा या दोघांना पाहता पाहता नक्कीच उलगडत जाईल. या खास दिवशी तुमच्या प्रेयसीला द्या ‘हे’ स्पेशल गिफ्ट (Valentines Day Gift Ideas In Marathi)
मिस मॅच्ड-
आयुष्यात प्रत्येकाचा जोडीदार हा तुमच्यापेक्षा वेगळाच असतो. तेव्हाच तर तुमची जोडी नेहमी परफेक्ट आणि हटके होते. दोन वेगळ्या विचारांची, स्वभावाची आणि व्यक्तिमत्त्वाची माणसं एकत्र येतात तेव्हा एक परफेक्ट जोडी बनू शकते. मिचमॅचमध्ये नावाप्रमाणेच हे प्रेमी जोडपं एकमेकांपासून वेगळं असं दाखवलं आहे. पण जर प्रेमात तुमचं वेगळेपण जपत तुम्हाला एकमेकांचा आदर करता आला नाही तर मात्र जगणं त्रासदायक होतं. अशा दोन वेगवेगळ्या स्वभावांच्या पात्रांची कहाणी पाहायची असेल तर तुम्ही ही वेबसिरिज नक्की पाहू शकता. यासोबतच Valentines Day: व्हॅलेंटाईन डेला तुमच्या प्रियकराला द्या ‘हे’ स्पेशल गिफ्ट (Valentines Gift For Boyfriend In Marathi)
परमनंट रूममेट्स –
प्रेमदिन साजरा करताना तुम्ही जोडीदारासोबत क्वालिटी टाईम घालवण्याचा विचार करत आहात तर फक्त रोमान्सच नाही तर मनोरंजनासाठी थोडा कॉमेडीचा तडकाही असायलाच हवा. यासाठी तुम्ही परमनंट रूममेट्स ही वेबसिरिज नक्कीच पाहू शकता. सुमिता व्यास आणि निधी सिंहने यात मुख्य भूमिका साकारलेल्या आहेत. याच्या दोन सिरिज तुम्हाला पाहता येतील.
कर ले तू भी मोहब्बत-
तुम्हाला फार बोल्ड सिरिज बघायला आवडत नसतील तर तुम्ही ही एक साधी प्रेमकथा नक्कीच पाहू शकता. ही कहाणी थोडी जुन्या स्टाईलची असली तरी तुमचं निखळ मनोरंजन करू शकते. वयाचा एक टप्पा पार केल्यानंतर आधी भांडण आणि नंतर प्रेमात पडलेल्या एका कपलची ही कहाणी आहे. या सिरिजचे तीन सीझन तुम्ही पाहू शकता. राम कपूर आणि साक्षी तन्वरची यात मुख्य भूमिका आहे.
आणि काय हवं –
तुम्हाला मराठी वेब सिरिज पाहण्यात रस असेल तर जुई आणि साकेतची प्रेमकथा व्हॅलेंटाईन्स डेला पाहायलाच हवी. यात प्रिया बापट आणि उमेश कामतने लव्ह कपलची भूमिका साकारली आहे. या वेबसिरिजचे तिनही सीझन अगदी बेस्ट आहे. प्रेम, लग्न, नवीन घर , नवीन गाडी, स्वयंपाक, फिटनेस, छंद अशा हलक्या फुलक्या विषयातून या दोघांच्या प्रेमाची कथा यात फुलताना दाखवण्यात आली आहे. ही वेबसिरिज पाहताना ती तुमच्या घरात घरातीलच आहे असं नक्कीच वाटू शकतं.
वन्स अ एअर –
तुम्हाला आणखी एखादी रोमॅंटिक कॉमेडी पाहायची असेल तर तुम्ही वन्स अ एअर नक्कीच पाहू शकता. यात निपूण धर्माधिकारी आणि मृण्मयी गोडबोलेने मुख्य भूमिका साकारली आहे. यात दोन भिन्न स्वभावाचे दोघं एकत्र येतात, त्यांच्यात मैत्री होते आणि प्रेम निर्माण होतं. पुढे हे नातं कसं दृढ होचं हे यात दाखवलं आहे. मात्र यातील संवाद इतके बेस्ट आहेत की ते तुमचं निखळ मनोरंजन करू शकतात.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje