Fitness

आंबा आरोग्यासाठी चांगला की वाईट

Aaditi Datar  |  Apr 15, 2019
आंबा आरोग्यासाठी चांगला की वाईट

आंबा आणि उन्हाळा हे घट्ट समीकरण आहे. उन्हाळ्याच्या दिवसात जर काही हवंहवंस वाटत असेल तर तो आहे आंबा. उन्हाळा सुसह्य करण्यात आंब्याचा फार मोठा वाटा आहे. त्यामुळेही काही लोकं उन्हाळ्याची वाट पाहतात. आंबा हे एक असं फळ आहे जे पाहून तोंडाला पाणी सुटलंच पाहिजे. पण आंबा खाताना काहीजणांच्या मनात ही भीती असते की, आंबा खाल्ल्यामुळे त्यांचं वजन तर वाढणार नाही ना. नाहीतर पूर्ण वर्ष केलेल्या वेट कंट्रोलवर उन्हाळ्याच्या दिवसात पाणी फिरायचं. पण आता तुम्हाला आंब्यामुळे आरोग्याला काही अपाय होईल का याबाबत काहीही चिंता करायची गरज नाही. जर तुम्हाला आमच्यावर विश्वास नसेल तर सेलिब्रिटी न्यूट्रीशिनिस्ट ऋजुता दिवेकर यांच्यावर नक्कीच विश्वास असेल ना.  

आंबा आरोग्यासाठी आहे सर्वोत्तम

ऋजुता दिवेकर यांचं म्हणणं आहे की, आपल्या देशात पिकणारं आंबा हे फळ आरोग्यासाठी खूप चांगल आहे. अनेकांना असं वाटतं की, डायबिटीज किंवा वजन जास्त असलेल्या लोकांनी हे फळ अजिबात खाऊ नये. पण याउलट ऋजुता दिवेकर सांगतात की, फक्त डायबिटीसज नाहीतर कॉलेस्ट्रॉल आणि हृदयविकारासाठी आंबा चांगला असतो. याशिवाय आंब्यातील बायोअॅक्टीव्ह कंपाऊंड- मॅग्निफॅरिन अनेक आजारांवर फायदेशीर असतं. एवढंच नाहीतर आंबा अँटी एजिंग आणि मेंदूसाठी चांगला असून फॅट बर्न करण्यातही मदत करतो.

आंब्याच्या बाबतीतलं खरं आणि खोटं

सेलिब्रिटी न्यूट्रीशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी आंब्याबाबतचे गैरसमज दूर करणाऱ्या अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. जसं आंब्यामध्ये खूप साखर आणि कॅलरीज असतात, हे चुकीचं आहे. तसंच हेही चुकीचं आहे की, आंबामध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स खूप जास्त आहे. याबाबत ऋजुता सांगतात की, डायबिटीस आणि जाडेपणाची समस्या असणाऱ्यांनी बिनधास्त आंबा खावा. आंब्याबाबतची काही सत्य समोर आली आहेत.

उन्हाळ्याच्या मौसमात आंब्याची चव उत्तम असते आणि यामध्ये पोषक तत्त्वांचा खजिना आहे.

आंब्याचा ग्लाइसेमिक इंडेक्स खूपच कमी असतो.

आंब्यातील पोषक तत्त्वांमुळे डायबिटीस आणि जाड असणाऱ्यांनीही आंबा खाण्यास काहीच हरकत नाही. याशिवाय आंब्यामध्ये खूप प्रमाणात फायबर, अँटी ऑक्सीडंट्स आणि फाईटोन्यूट्रीएंट्स असतात.

त्यामुळे भरपूर आंबा खा आणि दुसऱ्यांनाही खाऊ द्या.

हेही वाचा –

उष्माघाताची लक्षणे आणि उपाय 

बेली फॅट का वाढतो आणि कमी करण्यासाठी काय करावेत उपाय

रोज दही खाताय? मग तुमच्या शरीराला येऊ शकते ‘सूज’

Read More From Fitness