मनोरंजन

वर्षाच्या शेवटी बाहुबली प्रभास अडकणार लग्नाच्या बेडीत, चर्चांना उधाण

Leenal Gawade  |  Mar 8, 2022
प्रभास अडकणार लग्नबेडीत

 बाहुबलीच्या रुपात आलेला प्रभास सगळ्या फॅन्सच्या मनात बसलेला आहे. त्याचा कोणताही चित्रपट येण्यापूर्वी सगळीकडे त्याच्या चित्रपटाचा दबदबा असतो. आताही त्याचा राधे-श्याम चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. पण या चित्रपटासोबत त्याच्या खासगी आयुष्याविषयी देखील चर्चांना सुरुवात होते. बाहुबलीच्या काळात तो को-स्टार अनुष्का शेट्टीसोबत लग्न करणार आहे अशा चर्चांना उधाण आले होते. पण काही काळानंतर ही चर्चा केवळ चर्चाच राहिली. पण आता पुन्हा एकदा प्रभासच्या लग्नाची चर्चा होऊ लागली आहे. तो या वर्षाच्या शेवटी लग्न बंधनात अडकणार असल्याचे देखील सांगितले जात आहे.

लग्नाविषयी दिले हे मत

अनेक ठिकाणी प्रभासला त्याच्या लग्नाबद्दल विचारले जाते. आधीच लाजाळू आणि हल्ली हल्ली सोशल मीडियावर आलेला हा स्टार आपल्या खासगी गोष्टी सगळ्यांसमोर न सांगणेच योग्य समजतो. पण लग्नाच्या प्रश्नावर तो आता आता बोलू लागला आहे. एका मुलाखती दरम्यान ज्यावेळी त्याला लग्नाविषयी विचारण्यात आले त्यावेळी तो म्हणाला,’ बाहुबलीनंतर मी लग्न करेन असे मी माझ्या आईला सांगितले होते. पण त्याला आता बराच काळ लोटला आहे. आता मला लग्न करण्यावाचून गत्यंतर राहणार नाही. आता मला लग्न करावे लागेल असे त्याने सांगितले आहे. आता त्याच्या या उत्तरामुळे तो या वर्षभरात लग्न करेल असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला आहे. पण यावर प्रभासने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

अनुष्कासोबत जोडले नाव

प्रभास आणि अनुष्काने अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. त्यामुळे त्यांच्यामधील बाँडिंग ऑनस्क्रिनदेखील चांगली दिसून येते. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर हे दोघे एक उत्तम कपल होऊ शकतात असे वाटते. बाहुबलीच्या प्रचंड यशानंतर प्रभास आणि बाहुबली यांचे नाव चांगलेच जोडले गेले होते. अनेकांना हे दोघे प्रेमात आहेत असे वाटत होते. पण अनुष्काचे नाव दुसऱ्या व्यक्तीशी जोडल्यामुळे अनेकांनी या चर्चांना फुलस्टॉप दिला.

येतोय एक नवा चित्रपट

प्रभासचा प्रत्येक चित्रपट येण्याआधी त्याच्याबद्दल अनेक वेगवेगळ्या गोष्टी चर्चेत येत असतात. आता त्याचा मोस्ट अवेटेड राधेश्याम हा चित्रपट येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर देखील आला आहे. नुकतेच त्याचे एक गाणे देखील रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटात तो पूजा हेगडेसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. आता राधे श्याम या चित्रपटाबद्दल सांगायचे झाले तर हा चित्रपट एक लव्हस्टोरी आहे पण असे असले तरी देखील त्यामध्ये एक वेगळेपणा आहे. या चित्रपटाचा हिरो अर्थात प्रभास हा खास आहे. त्याच्यामध्ये भविष्य जाणून घेण्याची ताकद आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर त्यामध्ये ॲक्शनचा धमाका देखील दिसून येतो. जो पाहून हा चित्रपट पाहण्याची इच्छा नक्कीच होते. हा चित्रपट येत्या 18 मार्चला रिलीज होणार आहे. या चित्रपटानंतर लगेचच प्रभास आणि एका मोठ्या चित्रपटात दिसणार आहे. त्याने त्याच्या अपकमिंग सगर या चित्रपटाचे प्रमोशन करायला देखील सुरुवात केली आहे. 

आता प्रभासच्या लग्नाची खात्री नाही पण तो नक्कीच या वर्षभरात दमदार चित्रपट करणार आहेत हे नक्की!

Read More From मनोरंजन