मनोरंजन

अभिनेत्री ऋतुजा बागवे आणि विशाल फाले थिरकणार ‘जीव रंगलया’ गाण्यावर

Dipali Naphade  |  Dec 8, 2021
rutuja-bagwe

लग्नाआधीच्या बऱ्याच लव्हस्टोऱ्या आपण प्रत्यक्षात पहिल्या आहेत, काहींनी तर अनुभवल्या देखील आहेत. मात्र लग्नानंतरची पती पत्नी यांच्यातील लव्हस्टोरी नेमकी कशी असेल बरं? याचं साजेसं उत्तर घेऊन ‘एव्हरेस्ट एंटरटेनमेंट’ प्रस्तुत ‘सेवन सिझ मोशन पिक्चर’ निर्मित ‘जीव रंगलया’ (Jeev Ranglaya) हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट नेहमीच वेगवेगळे चित्रपट आणि गाणी प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतात, यातच भर घालत ते लग्नानंतरची लव्हस्टोरी म्हणजे ‘जीव रंगलया’ हे गाणे घेऊन येत आहेत. या गाण्यात अभिनेत्री ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) आणि विशाल फाले मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर विशाल फाले (Vishal Phale) ‘प्रिन्स ऑफ मुळशी’ या नावाने खूपच प्रसिद्ध आहे. 1 मिलियनहून अधिक फॉलोअर्स असलेला विशाल नावाप्रमाणेच सोशल मीडियावर विशाल आहे. त्यांच्या या गाण्याचे पोस्टर रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आले असून यांत ऋतुजा आणि विशाल रोमँटिक माहोल मध्ये पाहायला मिळत आहेत. या गाण्याच्या टिझरला ही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला असून या टिझरने सोशल मीडियावर चर्चा रंगवली आहे.

अधिक वाचा – Bigg Boss15: अखेर तेजस्वी आणि करणने व्यक्त केले प्रेम

जीव रंगलयामध्ये तुफान केमिस्ट्री

‘जीव रंगलया’ गाण्याच्या पोस्टरमध्ये या दोघांची जोडी अगदी खुलून दिसत असून बहरत जाणाऱ्या प्रेमाची गोडी त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होत आहे. या गाण्यात पती पत्नीच्या लग्नानंतरचा रोमान्स, त्यांची जवळीक यांचे खूप सुंदर वर्णन पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक ओंकार माने (Onkar Mane) दिग्दर्शित हे गाणे असून गाण्याचे बोल आणि गाण्याच्या निर्मितीत समीर परब यांचा खारीचा वाटा आहे. ओंकारने आजपर्यंत 20 दिग्दर्शित केलेल्या गाण्यांचा पल्ला गाठला आहे. या रोमँटिक गाण्याला संगीत प्रितेश कामत यांनी दिले असून गायक भूषण गोसावी यांनी हे गाणं आपल्या सुमधुर आवाजात स्वरबद्ध केले आहे. या गाण्याच्या छायाचित्रणाची जबाबदारी शशिकांत सिंग यांनी उत्तमरीत्या पेलवली. प्रेमाची लव्हेबल केमिस्ट्री घेऊन ‘जीव रंगलया’ हे रोमँटिक गाणे रसिक प्रेक्षकांच्या दिलावर राज्य करण्यास तयार झाले. गाण्याच्या पोस्टरने गाण्याची उत्सुकता आणखीनच वाढवून ठेवली आहे. शिवाय या गाण्यात एका नव्या अंदाजात ऋतुजा आणि विशालला पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

अधिक वाचा – अमृता सिंहला सारा अली खानसोबत नाही करायचं काम, कारण ऐकून व्हाल हैराण

ऋतुजाचा आहे जबरदस्त फॅन फॉलोईंग 

ऋतुजा बागवेचा खूप फॅन फॉलोईंग आहे. मराठी मालिकांमधून ऋतुजाने प्रेक्षकांच्या मनात आपली एक जागा निर्माण केली आहे. तर मालिकांनंतर तिने नाटकांमधूनही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना जिंकून घेतले आहे. आता गाण्यामधून ऋतुजा प्रेक्षकांसमोर आली आहे. तर विशालबरोबर तिची केमिस्ट्री तुफान गाजते आहे. हे गाणे प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा विश्वासही संपूर्ण टीमला आहे. तर मराठीतून असं रोमँटिक गाणं प्रेक्षकांसमोर आलं आहे. लग्न आणि लग्नानंतरचा रोमान्स हा या गाण्यातून समोर येत आहे. तर गाण्यातील शब्दातून प्रेमाच्या भावनाही तितक्याच सुंदर गुंंफण्यात आल्या आहेत. ऋतुजा आणि विशालच्या अभिनयाने या गाण्याला चार चांद लागले आहेत असंच म्हणावं लागेल. टिझरला भरघोस प्रतिसाद मिळाला असून आता या गाण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 

अधिक वाचा – कशासाठी मराठी अभिनेत्री करतायत #BanLipstick

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन