मनोरंजन

ड्रीम प्रोजेक्ट ‘महाभारत’बाबत एस. एस. राजमौलीची मोठी घोषणा

Trupti Paradkar  |  Jul 4, 2022
S S Rajamouli makes big announcement reveals plans for making Mahabharat in Marathi

बाहुबली चित्रपटासारखा ब्लॉकबस्टर चित्रपट तयार केल्यावर दिग्दर्शक एस एस राजमौलीकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आरआरआरनंतर आता राजमौलीने आता महापुराणातील महाभारत कथेवर चित्रपट करण्याचा निर्णय घेतला आहे. आजवर असा भव्य दिव्य चित्रपट कुणीच केला नसेल असा चित्रपट करण्याचा राजमौलीचा मानस आहे. ज्यामुळे चाहते देखील महाभारताची कथा पुन्हा नव्या आणि व्यापक स्वरूपात पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. राजमौलीची खासियत आहे की ते कथा अशा पद्धतीने मांडतात की पाहताना लोकांचे डोळे अक्षरशः दिपून जातात. महाभारतसाठीही राजमौलीने मोठ्या स्वरूपात प्लॅनिंगला सुरूवात केली आहे. नुकतीच त्यांनी याबाबत काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. 

‘महाभारत’साठी असं असणार राजमौलीचं प्लॅनिंग

महाभारताची कथा आजवर लोकांनी फक्त टीव्हीवर पाहिली आहे. टेलीव्हिजन माध्यमात महाभारताने आजवर मोठा इतिहास केलेला आहे. पूर्वी टीव्हीवर जेव्हा महाभारत लागत असेल तेव्हा रस्त्यावर एक माणूस दिसत नसे. टीव्हीवर महाभारत पाहण्यासाठी लोक घरोघरी गर्दी करत असत. आजही महाभारतामधील पात्र साकारणाऱ्या कलाकारांना देवाप्रमाणे पूजलं जातं. म्हणूनच हाच इतिहास एस एस राजमौलीला रूपेरी पडद्यावर साकारायचा आहे. ज्यासाठी राजमौली रात्रंदिवस एक करत आहेत. महाभारतावर चित्रपट तयार करण्यासाठी राजमौलीपेक्षा दुसरा प्रतिभावान दिग्दर्शक सापडणं कठीण आहे. त्यामुळे प्रेक्षकांनाही आता राजमौलीच्या महाभारतातून भव्य दिव्यतेची अपेक्षा आहे.

‘महाभारत’ राजमौलीचा ड्रीम प्रोजेक्ट

एस एस राजमौलीसाठी महाभारत हे एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यांच्या मते महाभारताचं शूटिंग सुरू करायला थोडा उशीरच झालेला आहे. कारण हा चित्रपट करणं वाटतं तितकं सोपं नाही. या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये अनेक गंभीर आणि कठीण समस्या आहेत. महाभारत करता करता ते आणखी चार पाच चित्रपट करणार आहेत. शिवाय महाभारताच्या निर्मितीसाठी करोडोंच्या बजेटची गरज लागणार आहे. तेव्हाच हा चित्रपट फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वात महागडा आणि ऐतिहासिक चित्रपट म्हणून लोकप्रिय ठरेल. यासाठी राजमौली खोलवर संशोधन सध्या करत आहेत.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन