OTT प्लॅटफॉर्मचा आधार घेत आता अनेक चित्रपट रिलीज होत आहेत. दोन दिवसांपूर्वी ‘गुंजन सक्सेना’ हा चित्रपट रिलीज झाला. तर आता अनेक चित्रपट रिलीज होण्याच्या मार्गावर आहेत. ‘सडक2’ हा मोस्ट अवेटेड चित्रपटही याच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला. पण अवघ्या काही तासातच या चित्रपटाच्या ट्रेलरला अनेकांची नापसंती मिळाली. युट्युबवर या ट्रेलरला लाईक्सपेक्षा जास्त डिस्लाईक्स मिळाल्याचे दिसले आहे.त्यामुळे हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर नेमके काय होणार हा चि६पट किती कमाई करणार असा प्रश्नच निर्माण झाला आहे. का मिळतेय या ट्रेलरला नक्की का मिळतेय नापसंती ते जाणून घेऊया
राकेश बापट घेणार ऑनलाईन क्लास स्वतःच बनवा ‘बाप्पाची मुर्ती’
सडक2 ला म्हणून मिळतेय प्रेक्षकांची नापसंती
सडक 2 या चित्रपटात आलिया भट, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त आणि पूजा भट हे प्रमुख भूमिकेत असणार आहे. 1991 साली आलेल्या ‘सडक’ या चित्रपटाचा हा रिमेक आहे. त्यामुळे आता या नव्या चित्रपटात नेमके काय असणार अशी प्रतिक्षा सगळ्यांनाच होती. पण आता या चित्रपटाचा ट्रेलर आल्यानंतर त्याला चांगलाच प्रतिसाद मिळेल असे वाटले होते. पण प्रत्यक्षात हा ट्रेलर आल्यानंतर या ट्रेलरला प्रेक्षकांची नापसंती मिळत आहे. या नापसंतीचे कारण या चित्रपटाचा ट्रेलर नाही तर ‘नेपोटिझम’आहे. चित्रपटाच्या ट्रेलरखाली नेपोटिझमबद्दल अनेकांनी कमेंट केल्या आहेत.हा चित्रपट म्हणजे नेपोटिझमचा एक उत्तम नमुना आहे असे म्हणत अनेकांनी सुशांतसिंह राहपूतच्या आत्महत्येसाठी अशीच लोक कारणीभूत असल्याचे अनेकांनी कमेंटमध्ये म्हटले आहे. त्यामुळेच अनेकांनी या चित्रपटाला नापसंती दर्शवली आहे.
नेपोटिझमवर मोठी चर्चा
गुरुवारी हा ट्रेलर रिलीज करण्यात आला. अवघ्या काहीच तासात यावर अनेक कमेंट येऊ लागल्या. नेपोटिझमशी निगडीत या सगळ्या कमेंट असल्यामुळे यावर एक प्रकारची चर्चाच सुरु झाली. सध्या सगळीकडे नेपोटिझमला जोरदार विरोध केला जात आहे. अनेक कलाकार चांगले असूनही या क्षेत्राशी निगडीत त्यांच्याकडे कोणताही गॉड फादर नसल्यामुळे त्यांना काम मिळत नाहीत. तर दुसरीकडे ज्यांच्याकडे अभिनयाची कलाही नाही त्यांना मोठमोठ्या चित्रपटांमध्ये काम दिले जाते असा वाद या कमेंटच्या माध्यमातून होताना दिसत आहे.
youtube
युट्युबच्या सर्वात नावडत्या यादीमध्ये समावेश
सडक2 या चित्रपटाचा ट्रेलरचा समावेश युट्युबच्या सर्वात नावडत्या चित्रपटांच्या यादीमध्ये झाला आहे. हा व्हिडिओ 7 व्या क्रमांकावर आहे. सध्या सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये रिया चक्रवर्ती, महेश भट्ट आणि सातत्याने नेपोटिझम याचा उल्लेख होत आहे. त्यामुळेच या व्हिडिओला इतक्या पटीने डिस्लाईक मिळाले असावे, असे दिसत आहे.
पतीच्या आत्महत्येनंतर मयुरी देशमुखने केली भावनिक पोस्ट
साऊथ चित्रपटांच्या बाबतीतही होत आहे असे
हि चर्चा केवळ सडक2 या चित्रपटाबाबत घडली असे नाही. तर साऊथमध्येही अशा प्रकारची चर्चा होऊ लागली आहे. तिथे चालणाऱ्या नेपोटिझमबद्दलही अनेक जण बोलत आहेत. तेथील काही ट्रेलरवरही जोरदार कमेंटस केल्या जात आहे. त्यामुळे नेपोटिझमहा मुद्दा फारच मोठा होताना दिसत आहे.
त्यामुळे आता हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांच्या पसंतीस किती उतरतो ते पाहावे लागेल.
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade