DIY लाईफ हॅक्स

Safety Slogan In Marathi | जाणून घ्या सुरक्षा घोषवाक्य मराठी

Trupti Paradkar  |  Jan 21, 2022
Safety Slogan In Marathi

आयुष्य खूप सुंदर आणि चांगल्या चांगल्या गोष्टींनी भरलेले आहे. म्हणूनच आयुष्यात प्रत्येकाला त्याचे जीवन सुखाने आणि सुरक्षितपणे जगण्याचा आधिकार आहे. स्वतःची, कुटुंबाची आणि समाजाची सुरक्षा राहण्यासाठी प्रत्येकाने सावध राहायला हवं. कारण बदललेली जीवनशैली आणि आधूनिक युगात वाढत असलेला तंत्रज्ञानाचा वापर जितका फायद्याचा आहे तितकाच नुकसान करणारादेखील आहे. यासाठीच दैनंदिन जीवनात साधं वाहन चालवताना, वीजेची उपकरणे वापरताना, आगीचा वापर करताना सावध असणं  फार गरजेचं आहे. तुमचे थोडे दुर्लक्ष अथवा बेफिकीरपणा तुमचे आणि कुटुंबाचे नुकसान करू शकते. यासाठीच अपघात टाळण्यासाठी प्रत्येकाने सदैव सावध असायला हवे. सावधपणा आणि सुरक्षा राखली तर तुमचेच नाही तर देशाचेही संरक्षण होऊ शकते. यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने सुरक्षेसाठी जनजागृती करायला हवी. आजकालच्या कोरोना महामारीच्या काळात स्वतःची आणि इतरांची सुरक्षा राखून आपण सर्वांच्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो. यासाठीच जाणून घ्या काही सुरक्षा घोषवाक्य मराठीतून (Safety Slogan In Marathi)

Best Safety Slogan In Marathi | सर्वोत्तम सुरक्षा घोषवाक्य मराठीतून

Safety Slogan In Marathi

सुरक्षा राखणं म्हणजे सतत सावध राहणं, मग तुम्ही कोणतीही गोष्ट करा स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि समाजातील प्रत्येकाची त्यातून सुरक्षा राखली जाईल याची नक्की काळजी घ्या. यासाठी या सुरक्षा घोषवाक्यांनी (Safety Slogans In Marathi) करा जनजागृती 

1.आपली सुरक्षा हीच कुटुंबाची सुरक्षा.

2.सुरक्षा नियमांकडे लक्ष द्या, स्वतःसोबत इतरांचेही आरोग्य वाचवा.

3.सुरक्षेमध्येच आपली भलाई, हीच आहे जीवनाची कमाई.

4. तुमची सुरक्षा तुमच्या हातात.

5. सुरक्षित काम करा आणि जीवनाचा खरा आनंद द्या.

6.सुरक्षित जीवन, आनंदी जीवन.

7. आवर वेगाला, सावर जीवाला.

8. प्रत्येक क्षणी सावध राहा, जीवनभर सुरक्षित राहा.

9. तुमचं संरक्षण म्हणजे तुमच्या कुटुंबाचे रक्षण.

10. सुरक्षेचे महत्व समजावूया, एकमेकांना सहकार्य करूया.

Classic Slogan For Safety In Marathi | क्लासिक सुरक्षा घोषवाक्य मराठीतून

Slogan For Safety In Marathi

समाजाचे एक जबाबदार नागरिक म्हणून नेहमी सुरक्षेचे नियम पाळणे प्रत्येकासाठी बंधनकारक आहे. कारण तुम्ही सावध राहाल तेव्हाच तुमचे, कुटुंबाचे आणि समाजाचे रक्षण होईल. यासाठी वाचा काही सुरक्षा घोषवाक्य मराठीतून (Slogan For Safety In Marathi)

1.सुरक्षित वाहन चालवा आणि वेळेत घरी जा.

2. वेग सांभाळा, अपघात टाळा.

3. मद्यपान करून वाहन चालवू नका, नाहक जीव गमवू नका.

4. स्वतःची जबाबदारी पाळा, सुरक्षित राहा आणि अपघात टाळा.

5. सुरक्षित काम म्हणजे खरा आराम.

6. सुरक्षेचे नियम पाळा, अपघाताला निर्बंध घाला.

7.कामात दक्षता, जीवनात सुरक्षा.

8. सुरक्षेकडून समृद्धिकडे.

9. द्या नेहमी सुरक्षेला प्राधान्य, कुटुंबाला तुमच्या नको अन्य.

10. एक पाऊल सुरक्षेच्या दिशेने.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त घोषवाक्य (Save Environment Slogan In Marathi)

Short Safety Slogans In Marathi | लहान सुरक्षा घोषवाक्य मराठीतून

Safety Slogans In Marathi

लहान लहान सुरक्षा घोषवाक्य एखाद्याच्या जीवनात मोठी क्रांती घडवून आणू शकतात. वाहन चालवताना, रस्त्यावरून प्रवास करताना, काम करताना नेहमीच अशी छोटी पण परिणाम कारक घोषवाक्य तुमचं लक्ष वेधून घेतात.

1.वेग कमी, जीवनाची हमी.

2. जो चुकला नियमाला, तो मुकला जीवनाला.

3.संयम पाळा, अपघात टाळा.

4.नाही नियंत्रण वेगावर, विश्वास नाही जीवनावर.

5.आपला प्रवास, सुखाचा प्रवास.

6. अती घाई, संकटात नेई.

7.सतर्क राहा, सुरक्षित राहा.

8.सदा सावध, सदा सुखी.

9. घाबरू नका, सावध राहा.

10. अक्षर कळे, संकट टळे.

पाणी वाचवा घोषवाक्य (Save Water Slogans In Marathi)

Industrial Safety Slogan In Marathi | औद्योगिक सुरक्षा घोषवाक्य मराठीतून

Industrial Safety Slogan In Marathi

जगण्यासाठी प्रत्येकाला नोकरी अथवा उद्योग करावाच लागतो. मात्र काम करत असताना तुमच्या औद्योगिक क्षेत्रात सुरक्षा पाळणं हे कंपनीच्या मालक आणि कामगार असं दोघांचे कर्तव्य आहे. यासाठीच वाचा या काही औद्योगिक सुरक्षा घोषवाक्य मराठीतून

1.कामात ठेवा सुरक्षा, देव करेल तुमची रक्षा. 

2. सुरक्षित काम, सुरक्षित जीवन.

3. सुरक्षा हे जीवनाचे कवच आहे.

4. काम करा पण सुरक्षित राहा.

5. सुरक्षाच जीवनाचा खरा अर्थ आहे, कारण सुरक्षेशिवाय सारं व्यर्थ आहे.

6.जेव्हा देश सुरक्षित राहिल तेव्हाच सर्व सुरक्षित राहतील.

7. काम करताना मारू नका गप्पा, नाहीतर जीवनाचा असेल हा शेवटचा टप्पा.

8. काम करताना करू नका घाई, दुर्घटनेपेक्षा थोडी दिरंगाई बरी.

9. जीवनाचे महत्त्व तोच जाणतो, जो काम करताना सुरक्षा पाळतो.

10. सुरक्षा नियमांचा करा सन्मान, मगच मिळेल समाजात मान.

Road Safety Slogans In Marathi | रस्ता सुरक्षा घोषवाक्य मराठीतून

Road Safety Slogans In Marathi

जगात एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी वाहतूक व्यवस्था महत्त्वाची आहे. मात्र प्रवास करताना वाहतुकीचे सुरक्षेबाबत असलेले नियम प्रत्येकाने पाळायला हवेत. ज्यामुळे अपघात होण्याचा धोका टाळता येतो. यासाठी वाचा रस्ता सुरक्षा घोषवाक्य मराठीतून (Road Safety Slogans In Marathi)

1.वेगात वाहने चालवू नका,मृत्यूला आमंत्रण देऊ नका.

2. प्रवाशांना सुरक्षित घरी पोहचवा, स्वतःचे आणि इतरांचे प्राण वाचवा.

3. गाडी चालवताना मद्यपान नका, इतरांचे जीवन धोक्यात टाकू नका.

4.दुचाकीवर हेल्मेटचा वापरस सुरक्षित जीवन आणि सुरक्षित सफर.

5. वाहन आहे चालवण्यासाठी, नाही अपघात करण्यासाठी.

6. वाहन चालवताना करू नका घाई, माणसाचा जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही.

7.होईल फक्त दोन मिनीटांचा उशीर, पण जीवन तुमचे कायम राहील सुरक्षित.

8. गाडी चालवण्याची करू नका घाई, घरी तुमची वाट पाहतेय आई.

9. मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक.

10. पाळूया नियम रहदारीचा, करू या प्रवास सुखाचा.

Health Care Safety Slogans In Marathi | आरोग्य सुरक्षा घोषवाक्य मराठीतून

Health Care Safety Slogans In Marathi

आजकाल कोरोनाच्या काळात आरोग्य हिच खरी संपत्ती हे घोषवाक्य प्रत्येकाला नक्कीच पटले असेल यासाठीच स्वतःचे आणि कुटुंबाचे आरोग्य जपण्यासाठी या आरोग्य सुरक्षा घोषवाक्यांचा ( (Health Care Safety Slogans In Marathi) प्रचार जरूर करा. 

1. आरोग्याला द्या तुम्ही पहिला क्रमांक, आजारपणासाठी नाही लावावी लागणार रांग.

2. ठेवू या सुरक्षित अंतर, कोरोना होईल छुमंतर.

3. उत्तम आरोग्य हिच खरी संपत्ती.

4. पोषक आहार घ्या मुखी, आरोग्य ठेवा सुखी.

5. स्वच्छ आणि सुंदर परिसर, आरोग्य नांदेल निरंतर.

6. पपई, गाजर खाऊ स्वस्त, डोळ्यांचे आरोग्य ठेवू मस्त.

7. दररोज एक सफरचंद खा, डॉक्टरांपासून दूर राहा.

8. ठेवा साफसफाई घरात, हेच औषध सर्व रोगात.

9. साबणाने हात धुवा, जीवनातून रोग मिटवा.

10. प्रथिने, जीवनसत्त्व आणि क्षार योग्य आहाराचे महत्त्व आहे फार.

Fire Safety Slogan In Marathi | अग्निसुरक्षा घोषवाक्य मराठीतून

Fire Safety Slogan In Marathi

आगीचा वापर अनेक ठिकाणी केला जातो. मात्र स्वयंपाक करताना, औद्योगिक क्षेत्रात जेव्हा तुम्ही आगीच्या संपर्कात येता तेव्हा अपघात टाळण्यासाठी सावध राहणं गरजेचं आहे. यासाठीच खास काही अग्निसुरक्षा घोषवाक्य मराठीतून (Fire Safety Slogan In Marathi)

1. आपला जीव सांभाळा, दुर्घटना टाळा.

2. करू नका आगीशी खेळ, जगण्याची निघून जाईल वेळ.

3. सुरक्षेकडे कराल कानाडोळा, आगीच्या निघतील ज्वाळा.

4. भडका नको असेल आगीचा तर सुरक्षेचे नियम वाचा. 

5. जो सतत सावध राहिल, तोच आगीपासून सुरक्षित राहिल.

Electrical Safety Slogan In Marathi | वीजसुरक्षा घोषवाक्य मराठीतून

Electrical Safety Slogan In Marathi

वीजेचा वापर घरगुती वापरासाठी, औद्योगिक प्रगतीसाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र वीजेचा वापर तुम्ही कसा करता यावर तिचा परिणाम ठरत असतो. कळत नकळत जर वीजेचा वापर चुकीच्या पद्धतीने केला तर एखाद्याला त्यामुळे शॉक देखील बसू शकतो. यासाठीच वाचा वीजसुरक्षा घोषवाक्य मराठीतून (Electrical Safety Slogan In Marathi)

1. वीजेच्या तारांपासून पाणी दूर ठेवा, दुर्घटनेचा धोका स्वतः कमी करा.

2. होऊ द्या दोन मिनीटांचा उशीर, पण आयुष्य मिळेल खात्रीशीर.

3. वीजेच्या तारांशी खेळ करू नका, आयुष्य धोक्यात टाकू नका.

4. वीजेच्या उपकरणाची वेळीच काळजी घ्या, कुटुंबाला धोक्यापासून टाळा.

5. सुरक्षित अंतर वीजेपासून, आयुष्य जगा समरसून.

पाण्याची बचत करण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स (How To Save Water In Marathi)

Read More From DIY लाईफ हॅक्स