बॉलीवूड
IIFA पुरस्कार सोहळ्यात सई ताम्हणकरचा गौरव, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित
बॉलीवूडमध्ये मानाचा मानला जाणारा आयफा पुरस्कार IIFA AWARD म्हणजेच इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकडेमीचा पुरस्कार नुकताच मराठमोळ्या सई ताम्हणकरला देण्यात आलाय. बॉलीवूडमधील मिमी चित्रपटातील शमाच्या भूमिकेसाठी तिला हा पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटात तिने साकारलेल्या शमासाठी तिला यंदाचा आयफाच्या सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. ही गोष्ट मराठी चित्रपटसृष्टीसाठी नक्कीच गौरवास्पद आहे.
सईची यशस्वी घौडदौड सुरूच…
मराठी चित्रपटसृष्टीत सई ताम्हणकर ही सध्या एक आघाडीची अभिनेत्री आहे. मात्र तिचा हा यशस्वी प्रवास सहज सोपा कधीच नव्हता. मराठी मालिका आणि चित्रपटात अनेक लहान सहान भूमिका साकारत सईने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. पुढे तिने अनेक चित्रपटात मुख्य भूमिका साकारत अभिनयातील तिचं नाणं किती खणखणीत आहे हे जगाला दाखवून दिलं. सईने काही हिंदी चित्रपटांमध्येही भूमिका केल्या आहेत. सोशल मीडियावर सई नेहमीच अॅक्टिव्ह असते. त्यामुळे सईचा सोशल मीडियावर खास चाहता वर्ग आहे. बॉलीवूडमध्ये मिमी चित्रपटात तिने साकारलेल्या शमाच्या भूमिकेसाठी तिला यंदाचा आयफा पुरस्कार मिळाला आहे. सईने तिच्या इन्स्टावरून ही महत्त्वाची गोष्ट चाहत्यांसाठी शेअर केली आहे. पहिलं नेहमीच खास असतं या शब्दात तिने हा आनंद व्यक्त केला आहे.
आयफा पुरस्कार सोहळा 2022
यावर्षीचा आयफा पुरस्कार दुबईतील अबूधामीमध्ये पार पडला. या सोहळ्यासाठी बॉलीवूडचे अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. शनिवारी रात्री या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. ज्यामध्ये मराठमोळ्या सई ताम्हणकरला मिमी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. सई पुरस्कार सोहळ्यासाठी खास डिझाईन केलेल्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या वर्क केलेल्या ड्रेसमध्ये तिचे अनेक फोटोज तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या पुरस्कारसोहळ्यासाठी तयार होतानाही तिने एक खास व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा ड्रेस तिच्यासाठी डिझायनर सायशा शिंदेने तयार केला होता. मिमी चित्रपटाचा विषय इतर मसाला चित्रपटांपेक्षा हटके होता. 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या सरोगेट आई या विषयावर आधारित या चित्रपटात सई ताम्हणकरने शमा ही भूमिका साकारली होती. मुख्य भूमिका क्रिती सेननने साकारली होती. जिच्या जीवलग मैत्रीण शमाची भूमिका सईने साकारली होती. याव्यतिरिक्त या चित्रपटात पंकड त्रिपाठीदेखील मुख्य भूमिकेत होते.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje