बॉलीवूड

जॅक स्पॅरोसोबत तुलना केल्यामुळे सैफ अली खान झाला चाहत्यांवर नाराज

Leenal Gawade  |  Oct 14, 2019
जॅक स्पॅरोसोबत तुलना केल्यामुळे सैफ अली खान झाला चाहत्यांवर नाराज

 कलाकारांना त्यांनी साकारलेल्या एखाद्या रोलची स्तुती व्हावे असे नक्कीच वाटते. पण त्यासाठी त्यांची कोणाशीही तुलना झालेली त्यांना अजिबात आवडत नाही. असेच काहीसे नवाब सैफ अली खानसोबत झाले आहे. त्याच्या ‘लाल कप्तान’ या चित्रपटाची सगळीकडे चर्चा होत आहे. याच चित्रपटातील त्याच्या लुकची तुलना त्याच्या चाहत्यांनी आणि सगळ्यांनी जॅक स्पॅरोसोबत केली आहे. पण सैफला हे काही रुचले नाही. कारण त्याने या तुलनेवर नाराजी व्यक्त केली आहे.  या चित्रपटाची प्रेरणा वेगळी असूनही लोक गैरसमज करुन घेत आहे असे तो म्हणाला आहे

मधुबालासारख्या दिसणाऱ्या या मुलीचा टिक टॉक व्हिडिओ होतोय व्हायरल

‘लाल कप्तान’ चा लुक

Instagram

सेक्रेड गेम्सनंतर सैफ अली खान त्याच्या चाहत्यांना चित्रपटाच्या माध्यमातून भेटीला येणार आहे. लाल कप्तान हा त्याचा हा चित्रपट असून या चित्रपटात तो प्रमुख भूमिका साकारत आहे. त्याच्या चित्रपटातीलच हा लुक असून यामध्ये त्याचे केस लांब असून त्याने डोक्याला कपडा गुंडाळला आहे. त्याने डोळ्यात काजळ भरले असून अंगात जाड जकेट घातले आहे. त्यामुळेच हा त्याच्या या लुकची तुलना लोकांनी थेट पायराईड्स ऑफ कॅरेबियनच्या जॅक स्पॅरोशी केली आहे.

प्रेक्षकांचा कौल मिळतोय ऐतिहासिक मालिकांना

ही तर भारताची देण

सैफ अली खानला त्याच्या या लुकबाबत विचारल्यानंतर त्याने त्याची तुलना हॉलीवूडपटातील जॅक स्पॅरोशी केली जात आहे याची खंत व्यक्त केली तो म्हणला की, हा चित्रपट नागासाधूंवर आधारीत आहे. नागा साधू त्यांचे राहणीमान तुम्हाला आता जॅक स्पॅरोसारखे वाटत असले तरी ही भारताच्या ईस्ट इंडिया कंपनीची देण आहे असे असताना लोकांनी त्याची तुलना इतर कशाशी ही करणे मला  पटलेले नाही.

चित्रपट लवकरच येतोय भेटीला

Instagram

लाल कप्तान हा चित्रपट येत्या 18 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. डायरेक्टर नवदीप सिंह यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून या चित्रपटात सैफ अली खानसोबत मानव विज, झोया हुसेन आणि दिपक डोबरियाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

या भूमिकेसाठी घेतली विशेष मेहनत

सैफ अली खान पहिल्यांदाच अशा प्रकारची भूमिका करत असून त्याने या भूमिकेसाठी विशेष मेहनत घेतली आहे. त्याला या लुकमध्ये बदलण्यासाठी  मेकअप आर्टिस्टनी विशेष मेहनत घेतली असून त्याच्या या लुकसाठी त्याला तासनतास मेकअप रुममध्ये बसावे लागले आहे. 

वेबसीरिजमध्येही आवडला होता सैफ

सैफ अली खान मध्यंतरी चित्रपटांपासून तसा लांबच होता. त्यानंतर अचानक त्याने वेबसीरिजमध्ये पदार्पण केले.नवाझुद्दीन सिद्दकी आणि त्याची भूमिका यामध्ये चांगलीच गाजली. भारतातील सर्वोत्तम वेबसिरीजचा मान त्याला मिळाला. त्यामुळेच सैफ अली खान पुन्हा एकदा लोकांच्या नजरेत आला. 

आता ही अशी वेगळी भूमिका साकारणारा सैफ प्रेक्षकांना पसंद पडतो का? ते 18 ऑक्टोबरला कळेल.

 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From बॉलीवूड