बॉलीवूड

पापाराझींवर का भडकला सलमान खान, व्हिडिओ झाला व्हायरल

Trupti Paradkar  |  Feb 28, 2022
पापाराझींवर का भडकला सलमान खान, व्हिडिओ झाला व्हायरल

सलमान खान दुबईतील द बॅंग टूर ( Da Bangg tour) वरून नुकताच मुंबईत परतला आहे. सोहेल खानने दिग्दर्शित केलेली ही एक भव्य दिव्य कॉन्सर्ट आहे. सलमानच्या या कार्यक्रमाचे अनेक ठिकाणी आयोजन केलं जातं. मात्र या कार्यक्रमासाठी दुबईला गेलेला सलमान मुंबई विमानतळावर पोहचताच असं काही घडलं की त्याचा राग अनावर झाला. विमानतळावर येणाऱ्या सेलिब्रेटीजचे फोटो घेण्यासाठी पापाराझींची नेहमीच गर्दी असते. सलमान विमानतळावर अथवा सार्वजनिक ठिकाणी भेटणाऱ्या चाहत्यांसोबत आणि पापाराझींसोबत नेहमीच नम्रपणे वागताना दिसतो. मात्र आज त्याचा मूड काहिसा ठीक नव्हता. ज्यामुळे मास्कमधूनही त्याचा राग चाहत्यांना स्पष्ट जाणवत होता. एकदा, दोनदा सांगूनही पापाराझींनी फोटो घेणं न थांबवल्यामुळे सलमानचा राग अक्षरशः अनावर झाला.

सं काय घडलं विमानतळावर

सलमान खान दुबईहून मुंबई विमानतळावर पोहचला. त्याच्यासोबत त्याचे बॉडीगार्डसही होते. विमानतळावरून बाहेर येताना नेहमीप्रमाणे त्याला पापाराझींनी गराडा घातला. मात्र यावेळी सलमान त्यांच्यासोबत नेहमीप्रमाणे वागला नाही. शांतपणे पापाराझींना फोटो देणारा भाईजान आधीच उखडलेला होता. त्यामुळे त्याने फोटो न घेण्याची वॉर्निंग पापाराझींना दिली. तरीपण काही पापाराझींना फोटो घेण्याचा मोह आवरता आला नाही. त्यामुळे शेवटी सलमानने रागा रागाने पाहात “हो गया ना अभी” असा सज्जड दमच पापाराझींना दिला.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सलमान नेहमी मुंबई विमानतळावरील गेट नंबर बीने बाहेर पडतो. कारण या गेटपासून पार्किंगपर्यंत येण्याचे अंतर कमी आहे. मात्र यावेळी सलमानला या गेटने बाहेर पडू देण्यात आलं नाही. त्यामुळे त्याला गेट नंबर ए ने विमानतळाबाहेर यावं लागलं. सहाजिकच त्याला विमानतळावर खूप वेळ चालावं लागलं.  आधीच टूरवरून थकून आलेला असल्यामुळे सलमान खान चांगलाच उखडलेला होता. त्यामध्ये पापाराझींनी त्याचं न ऐकल्यामुळे त्याचा राग अनावर झाला.

दी बॅंग टूरमध्ये सलमानने दिला परफॉर्मेन्स

सलमान खान दुबईत दी बॅंग टूरमध्ये सहभागी झाला होता. ज्यामध्ये त्याने पूजा हेगडे, दिशा पटानी यांच्यासोबत डान्स परफॉर्मेन्स दिला. या टूरमध्ये सोनाक्षी सिन्हा, आयुष शर्मा, मनीश पॉल, सई मांजरेकर आणि गुरू रंधावापण सहभागी झाले होते. सलमान खानचा ‘टायगर 3’ लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. ज्यामध्ये त्याच्यासोबच कतरिना कैफ पुन्हा एकदा झळकणार आहे. यासोबत तो कभी ईद कभी दिवाली, किक 2, दंबग 4 , बजरंगी भाईजान 2 अशा अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. शाहरुखच्या ‘पठाण’मध्ये सलमानचा कॅमियो असेल तर ‘टायगर 3’ मध्ये शाहरूखचा कॅमियो असेल. 

Read More From बॉलीवूड