बॉलीवूड

अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट उधळला, संशयिताला अटक

Dipali Naphade  |  Aug 18, 2020
अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट उधळला, संशयिताला अटक

अभिनेता सलमान खान कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतो. सलमान खानला जितके मित्र आहेत तितकेच त्याचे छुपे शत्रूही असल्याचं समजण्यात येतं. नुकताच अभिनेता सलमान खान याच्या हत्येचा कट उधळण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. एसजीएम नगरमध्ये सरकारी रेशन डेपो चालविणाऱ्या प्रवीणच्या हत्येमध्ये उत्तराखंडमधून उचलबांगडी करण्यात आलेल्या मास्टरमाईंड राहुलला पोलिसांनी अटक केली आहे. सलमान खानच्या राहत्या घराची रेकी जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात राहुलने केली होती अशी माहितीही आता समोर आली आहे. सलमान खान कोणत्या वेळी घरातून निघतो आणि कुठे कुठे जातो याची रेकी त्याने केली होती. यासंदर्भातील माहिती मंगळवारी डीसीपी मुख्यालय राजेश दुग्गल यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात पत्रकारांना दिली आहे. 

गुंजन सक्सेना’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, वायूसेनेला बदनाम करण्याचा आरोप

कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगचा शार्ट शूटर आहे राहुल

डीसीपी दुग्गल यांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल हा कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगचा शार्ट शूटर आहे. लॉरेन्स बिश्नोई सध्या जोधपूर राजस्थान येथील कारागृहात बंद आहे. मात्र राहुलने लॉरेन्स बिश्नोईपर्यंत सलमानची इत्यंभूत माहिती पोहचवली होती असंही डीसीपी दुग्गल यांनी सांगितले.  लॉरेन्श बिश्नोई सलमान खानवर गेले कित्येक वर्ष डुख धरून आहे. 2018 मध्ये जोधपूरमध्ये हरिण शिकार प्रकरणात सलमान खान सुटल्यामुळे लॉरेन्स बिश्नोईला धक्का बसला होता. तेव्हाच त्याने सलमान खानला मारण्याचीही धमकी दिली होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार लॉरेन्स सध्या सलमान खानच्या हत्येचा कट करत असून त्यानेच राहुलकडून सलमान खानची रेकी करून घेतली होती. राहुलला पोलिसांनी फरिदाबाद इथून अटक केली असून केवळ फरिदाबादच नाही तर झज्जर, पंजाब, भिवानीमध्ये खून आणि खंडणीच्या प्रकरणात त्याच्यावर गुन्हे दाखल आहे. तसंच मागच्या महिन्यात त्याने चार खून केल्याचेही समोर आले आहे. 

पार्थ समथानने घेतला ‘कसौटी जिंदगी की’ सोडण्याचा निर्णय

पोलिसांनी पिस्तुल केलं हस्तगत

पोलिसांनी राहुलकडून पिस्तुलही हस्तगत केलं आहे. आता राहुलला न्यायालयात नेण्यात येणार असून रिमांड घेण्यात येणार आहे. 24 जूनला राहुल ऊर्फ सन्नीने रेशन दुकानमालक प्रवीणची गोळी घालून हत्या केली होती. त्यानंतर उत्तराखंड पोलिसांनी त्याला अटक केले. प्रवीणने 2018 मध्ये राहुलला पोलिसांकडे सुपूर्द केले होते. त्यामुळेच राहुलने प्रवीणची हत्या केली होती. आतापर्यंत राहुलने अनेक खून केले असून त्याच्यावर अनेक गुन्हेही दाखल आहेत. त्यामुळे अशा कुख्यात गुन्हेगाराला अटक करून पोलिसांनी सलमान खानच्या हत्येचा कट तूर्तास उधळून लावला आहे. मात्र अजूनही लॉरेन्स बिश्नोई सलमान खानवर डूख धरून असल्याने सलमानच्या जीवाला धोका टळलेला नाही. 

लवकरच प्रकाशित होणार प्रियांका चोप्राचे आत्मचरित्र, शेअर केली झलक

सलमान खानला दिली होती धमकी

सलमान खानवर गेले कित्येक वर्ष जोधपूरमध्ये हरणाची शिकार केल्याप्रकरणी  केस चालू होती. ज्यामध्ये 2018 मध्ये त्याला न्यायालायने हिरवा कंदील दिला. मात्र न्यायालयाच्या या निर्णयावर मात्र बिश्नोई समाज नाराज असून लॉरेन्स बिश्नोई याने त्यावेळीच सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतरही त्याने सलमानला मारण्याचे प्रयत्न केले मात्र लॉरेन्स त्यामध्ये  यश मिळवू शकला नाही. आता राहुलला अटक झाल्यामुळे अजूनही लॉरेन्स सलमानच्या मागे हात धुऊन लागला आहे हे स्पष्ट झाले आहे. 

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा  

Read More From बॉलीवूड