निगेटिव्ह एनर्जी, नकारात्मक विचार याची सुरुवात खरंतरं आपणच करत असतो. आपल्यामुळेच या गोष्टी वाढत असतात आणि कमी होत असतात. पण प्रत्येकाचं मन तितकं खंबीर नसतं की, आपल्या चुका जाणून घेऊन त्यातून बाहेर पडणं हे सोपं असलं तरी देखील अनेक जण ते करायला पाहात नाहीत. अशावेळी असे काही उपाय करावे लागतात ज्यामुळे तुमचे नकारात्मक विचार, निगेटिव्ह एनर्जी (Negative Energy) कमी होण्यास नक्कीच मदत मिळते. आज आम्ही जो उपाय सांगणार आहोत त्यामध्ये आपण रोज जेवणात वापरत असलेल्या मिठाचा समावेश आहे. फेंगशुई आणि इतरही काही शास्त्रांमध्ये मिठाचा उपयोग करुन निगेटिव्हिटी घालवता येते असे सांगितले आहे. पण मिठाचा उपयोग नेमका कसा करायचा घेऊया जाणून
मीठ शोषते नकारात्मकता
अनेक शास्त्रात असे सांगितले आहे की, मीठ हे शुद्ध आहे. त्याचा रंग हा शुभ्र पांढरा आहे. त्यामुळे तुमच्या आजुबाजूला असणारी नकारात्मक उर्जा शोषून घेण्याचे काम मीठ अगदी चांगल्या पद्धतीने करते. मिठामुळे नकारात्मकता खेचली जाते आणि त्यामुळे चांगले विचार येण्यास मदत मिळते.. नजर काढतानाही मीठ- मोहरी अशी नजर काढली जाते कारण मीठ नकारात्मक उर्जा काढून घेते असा समज आहे. पण हा देखील एक मानसिक मुद्दा आहे असे म्हणायला हवे. याचे कारण असे की, या गोष्टी कितीही खऱ्या असल्या तरी देखील या अनेकांना पटणार नाहीयात काहीही शंका नाही. पण एकदा तुम्ही हा उपाय नक्की करुन बघा
सी सॉल्ट बाथ
एका मोठ्या भांड्यात थोडे कोमट पाणी घेऊन त्यामध्ये सी सॉल्ट अर्थात खडे मीठ टाका. ते नसल्यास घरी असलेले कोणतेही मीठ घेतले तरी देखील चालेल. आता त्या पाण्यात तुम्ही पाय बुडवून बसा. मीठामुळे तुमच्या पायाची घाण निघून तर जाते शिवाय तुम्हाला काही काळ आपल्या विचारांपासून मुक्तही होता येते. पेडिक्युअर ही अशीच एक थेरपी आहे ज्यावेळी तुमचे सगळे विचार हे थांबलेले असतात आणि तुम्हाला थोडी मन:शांती मिळालेली असते.
मिठाने पुसा लादी
कामाच्या ठिकाणी किंवा तुम्ही जिथे राहता तिथे तुम्हाला सतत निगेटिव्ह किंवा कोणीतरी नजर लावत आहे असे वाटत असेल तर तुम्ही अशावेळी पाण्यात मीठ घालून मिठाने लादी पुसायला हवी. मिठाने लादी पुसल्यामुळे असे म्हणतात की, नकारात्मक उर्जा निघून जाण्यास मदत मिळते. यासाठी तुम्हाला सी सॉल्ट घेऊन ते पाण्यात मिसळून घ्या. असे पाणी लादी पुसण्यासाठी वापरा. त्यामुळे नकारात्मक उर्जा निघून जाते.
या शिवाय घरात जर खूप भांडण होत असतील तरी देखील तुम्ही एका भांड्यात मीठ घेऊन ते एका कोपऱ्यात ठेवा. त्यामुळे तुमच्या बेडरुममध्ये किंवा घरात येणारी नकारात्मक उर्जा ही कमी होण्यास मदत मिळते.