हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध, दिग्गज व आदरणीय कलाकार सुनील दत्त हे आजही त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी चाहत्यांच्या स्मरणात आहेत. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये अविस्मरणीय भूमिका केलेल्या सुनील दत्त यांचा 6 जून रोजी जन्मदिवस असतो. या दिग्गज अभिनेत्याच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चाहत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. या खास प्रसंगी अभिनेता संजय दत्तनेही आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आदरांजली वाहिली. वडिलांच्या आठवणी जागवताना संजयने सोशल मीडियावर त्याचा व सुनील दत्त यांचा एक सुंदर फोटोही शेअर केला आहे.
संजय दत्त झाला भावुक
स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवर आपल्या वडिलांसोबतचा एक फोटो शेअर करत संजयने एक भावनिक संदेश देखील लिहिला. त्याने शेअर केलेला हा फोटो त्याच्या मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटातील आहे, ज्यामध्ये संजयसोबत त्याचे वडील सुनील दत्त यांचीही महत्वाची भूमिका होती. हा फोटो शेअर करताना संजय दत्तने वडिलांना आपला हिरो असे म्हटले आहे. त्याने लिहिले की, तुमचा विश्वास आणि प्रेमामुळे मी आज जो आहे तसा होण्यास मदत केली. तुम्ही माझे हिरो होतात, आहात आणि कायम राहाल. वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा.”
हा फोटो मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटातील शेवटच्या सीनचा आहे ज्यामध्ये संजय त्याचे वडील सुनील दत्त यांना जादू की झप्पी मारताना दिसत आहे. विशेष म्हणजे मुन्ना भाई एमबीबीएस हा सुनील दत्त यांचा शेवटचा चित्रपट होता. या चित्रपटानंतर, त्यांचे मे 2005 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मुन्नाभाई एमबीबीएस हा एक अजरामर चित्रपट आहे. या चित्रपटाने संजय दत्तच्या बुडत्या करियरला मोठा मदतीचा हात दिला होता. हा एक कॉमेडी-ड्रामा चित्रपट होता, ज्यामध्ये सुनील दत्त यांनी मुन्ना म्हणजेच संजय दत्तच्या ऑनस्क्रीन वडिलांची हरिप्रसाद शर्मा यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील एका भावनिक दृश्यात, मुरली उर्फ मुन्ना आपल्या वडिलांना मिठी मारतो, ज्याचा तो ‘जादू की झप्पी’ असा उल्लेख करतो. कमेंट सेक्शनमध्ये चाहत्यांनी देखील सुनील दत्त यांना श्रद्धांजली वाहिली. संजयची पत्नी मान्यता दत्तने संजयच्या पोस्टवर रेड हार्ट इमोजी कमेंट केली.
संजय दत्तच्या बहिणीने देखील वडिलांना वाहिली आदरांजली
संजय दत्त व्यतिरिक्त सुनील दत्त यांना त्यांची मुलगी प्रिया दत्त हिनेही वाढदिवसानिमित्त आदरांजली वाहिली.तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर सुनील दत्त यांचा एक फोटो शेअर करत तिने वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. फोटो शेअर करताना तिने लिहिले की, “सर्वात सुंदर, प्रेमळ, उत्साही व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि मी अभिमानाने सांगते की माझे वडील माझे हिरो आहेत. बाबा आम्ही तुमच्यावर प्रेम करतो आणि आमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा आधारस्तंभ असल्याबद्दल धन्यवाद.”
करियर बाबतीत बोलायचे झाले तर नुकताच प्रदर्शित झालेल्या सम्राट पृथ्वीराज या चित्रपटात संजय दत्त दिसला होता. गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात संजयशिवाय अक्षय कुमार, मानुषी छिल्लर, सोनू निगम आदी कलाकार दिसले होते. याशिवाय तो KGF Chapter 2 या चित्रपटातही महत्त्वाची भूमिका साकारताना दिसला होता. संजय दत्त आता लवकरच रणबीर कपूर आणि वाणी कपूरसोबत शमशेरा या चित्रपटात दिसणार आहे. यासोबतच रवीना टंडनसोबत तो ‘घुडचडी’ या चित्रपटात दिसणार आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje