मनोरंजन

किस्सा ‘किस’ का… बानी आणि सपना झाल्या ट्रोल

Leenal Gawade  |  Nov 21, 2019
किस्सा ‘किस’ का… बानी आणि सपना झाल्या ट्रोल

सेलिब्रिटी रिलेशनशीप स्टोरीमध्ये नाही म्हटलं तरी सगळ्यांनाच थोडाफार इंटरेस्ट असतो. अभिनेता- अभिनेत्री यांच्यामध्ये चाललेल्या रिलेशनशीप व्यतिरिक्त मुलगा- मुलगा आणि मुलगी-मुलगी असं काही रिलेशनशीप असेल तर सध्या त्याची जास्त चर्चा होते. लेस्बियन रिलेशनशीपला आपल्या देशात मान्यता मिळाल्यानंतर देशभरातील अनेक प्रसिद्ध जोडपी प्रकाशझोतात आली आणि आता आणखी एका जोडीची भर पडणार असे वाटत आहे. कारण विजे बानी आणि सेलिब्रिटी हेअरस्टाईलिस्ट सपना भववानी यांचा लिपलॉकचा फोटो सध्या व्हायरल झाला आहे. त्यामुळेच ही चर्चा आता सुरु झाली आहे.

शिवाजी नाही छत्रपती शिवाजी… सोशल मीडियावर शरदची वाहवा

बानी आणि सपना वेकेशनवर

Instagram

झालं असं की, सपना आणि बानी सध्या बाहेर आहेत. सपनाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती.  त्यामध्ये सपना आणि बानी एका बीचवर उभे आहेत. ते एकमेकांना किस करत असल्याचा हा फोटो आहे. त्यांचा हा फोटो पाहिल्यानंतर नेटीझन्सनी त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली.  अनेकांनी खालच्या पातळीवर जाऊन कमेंट केल्यानंतर सपनाने तो फोटो काढून न टाकता आणखी एक फोटो टाकला. ज्यामध्ये दोन मुली एकमेकांच्या फारच जवळ उभ्या आहेत. त्यामुळे सपनाने ट्रोलर्सला या पोस्टमधून चांगलेच उत्तर दिले आहे. 

हा अधिकार आम्ही मिळवला आहे

देशात LGBTQ चा मोठा लढा झाला. त्यानंतर या नात्याला विरोध करणारे 377 कलम देशाच्या संविधनानेच काढून टाकले. त्यामुळे आता आम्हाला आमच्याप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. असे खरमरीत उत्तर देत तिने अशा प्रकारच्या नात्यांना विरोध करणाऱ्यांना चांगलीच चपराक दिली आहेत. 

नखरे नाही तर ‘या’मुळे कृतिनं सोडला अमिताभ-इमरानचा ‘चेहरे’ सिनेमा

सपना आणि बानी बिग बॉसच्या स्पर्धक

Instagram

सपना आणि बानी या बिग बॉसमध्ये होत्या. दोघांनी त्यांचा बिग बॉस सीझन चांगलाच गाजवला होता. सपनाची भांडणं तर त्यावेळीही प्रसिद्धी होती. हेअरस्टाईलिस्ट असल्यामुळे केसांना रंगवण्याचे वेगवेगळे प्रकार आणि हेअरस्टाईल तिने या सीझनमध्ये केल्या असतील.

फोर मोअर शॉट्समध्येही होती अशीच भूमिका

Instagram

बानी जे या आधी ‘फोर मोअर शॉट्स’ या वेबसीरिजमध्ये दिसली होती. यामध्ये तिने साकारलेली भूमिका ही लेस्बियन होती. शरीरात होणारे बदल तिला कळतात. पण तिच्या बदलाकडे तिचे कुटुंब लक्ष देत नाहीत. तर तिच्या लग्नाचा घाट घालत राहतात. तिचे एका सेलिब्रिटीसोबतही अफेअर सुरु होते. त्या अभिनेत्रीसोबतचे फोटोही व्हायरल होतात. पण समाजाने अजूनही या नात्याला दुजोरा दिलेला नाही.त्यामुळे ती अभिनेत्री या सगळ्यापासून दूर जाते. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From मनोरंजन