बॉलीवूड

सारा अली खानचं ‘साडीप्रेम’ आलं उफाळून, फोटो पोस्ट करत म्हणाली…

Trupti Paradkar  |  Sep 28, 2021
Sara Ali Khan looks pyaari in a saree

अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan )ने खूप कमी वेळात प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. साराचे आईवडील सैफ अली खान आणि अमृता सिंह दोघंही सेलिब्रेटी असले तरी साराने तिच्या लुक्स आणि अभिनयाच्या जोरावर तिने हे स्वतःचं अस्तित्त्व निर्माण केलं आहे. साराने आजवर केलेल्या प्रत्येक चित्रपटातील अभिनयासाठी तिचं कौतुकच होताना दिसतं. शिवाय तिचा लुकही प्रेक्षकांना नेहमीच भावतो. सारा सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव्ह आहे. त्यामुळे तिचा सोशल मीडियावर एक खास चाहता वर्ग आहे. तिच्या मनोरंजक व्हिडिओजची चाहते आवर्जून वाट पाहतात. यासोबतच सारा सतत तिचे फोटो आणि अपडेट सोशल मीडियावरून देत असते. नुकताच साराचा देसी लुक चाहत्यांना खूप आवडला आहे. विशेष म्हणजे या लुकसोबत साराचं साडीप्रेमही उफाळून आलं आहे. पाहा सारा नेमकं काय म्हणाली या लुकबद्दल

वेडिंग डेस्टिनेशन ठरवण्यासाठी रणबीर आणि आलिया जोधपूरमध्ये, लग्नाच्या चर्चेला उधाण

साराच्या अदांनी चाहते घायाळ

सारा अली खानने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ती शुद्ध देसी लुक म्हणजे एका मस्टीकलर साडीमध्ये दिसत आहे. साराने एका कार्यक्रमासाठी हा पारंपरिक लुक केला होता. मात्र या पोस्टसोबत साराने दिलेली कॅप्शन चाहत्यांना भुरळ घालत आहे. साराने शेअर केलं होतं, ” साडीमध्ये प्रत्येक स्त्री नेहमीच ‘प्यारी’ दिसते” याचा मराठी अर्थ लावला तर साराच्या मते प्रत्येक स्त्री साडीत लयभारी दिसते असा होऊ शकतो. साराच्या या लुकसोबत तिचं हे साडीप्रेमही चाहत्यांना खूप भावलं आहे. ज्यामुळे पाहता पाहता साराचा हा लुक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एवढंच नाही चाहत्यांनी या लुक्सवर सारासाठी लाईक्स आणि कंमेट्सचा पाऊसच पाडला आहे. साडी हा भारतीय आणि पांरपरिक असल्यामुळे त्यातून साराचा संस्कारी लुक पाहायला मिळत आहे. या लुकसाठी साराने गुलाबी रंगाची आणि मल्टीकलर डिझाईनची साडी नेसली आहे. या साडीची खासियत ही की या साडीच्या पदरावर ‘मेरे पास मॉं है’ असं लिहीलं आहे. ज्यातून साराचं साडी आणि आई दोघीवरचं प्रेम दिसून येतं. साराने या साडीसोबत चांदीचे मोठे झुमके, नाकात चमकी, हातभर मॅचिंग बांगड्या आणि छोटी टिकली असा लुक केला आहे. ज्या लुकमुळे चाहते इतके घायाळ झालेत की एकतर साराच्या पोस्टमुळे स्क्रिन स्क्रोल करणं विसरला आहे अशी कंमेट दिली आहे. 

हिना खानचा दिलखेचक अंदाज, अंगद बेदीसोबत दिले बोल्ड सीन्स

साराचे आगामी चित्रपट

सारा सध्या अक्षय कुमार आणि धनुषसोबत ‘अतरंगी रे’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. साराने केदारनाथ चित्रपटातून तिच्या करिअरला सुरूवात केली. त्यानंतर सिंबा, लव्ह आज कल 2 आणि कुली नं 1 मधून तिला प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करता आली. फक्त चार चित्रपटात झळकूनही साराला एखाद्या सुपरस्टारसारखी लोकप्रियता मिळाली आहे. त्यामुळे तिचे आगामी चित्रपट पाहण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक आहेत. शिवाय अतरंगी रे मध्ये तिच्यासोबत अक्षय आणि धनुषची हटके जोडीही यावेळी प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

‘पैंजण तुझं’ रोमँटिक कोळीगीतामध्ये दिसणार DID फेम दीपक हुलसुरे

Read More From बॉलीवूड