मनोरंजन

स्वत:वर बनलेल्या मीम्सवर चिडले सौरभ शुक्ला, थेट गाठलं पोलीस स्टेशन

Leenal Gawade  |  Apr 21, 2020
स्वत:वर बनलेल्या मीम्सवर चिडले सौरभ शुक्ला, थेट गाठलं पोलीस स्टेशन

कॉमेडीसाठी प्रसिद्ध असलेले सौरभ शुक्ला त्यांच्या अभिनयामुळे आज घराघरात जाऊन पोहोचले आहेत. पण अचानक या विनोदवीराचा राग अनावर झाला आहे आणि त्याने थेट पोलीस स्टेशन गाठलं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की,कोणत्या कारणामुळे सौरभ शुक्ला नेमकं एवढे चिडले असतील? खरंतरं सौरभ शुक्ला एका मीममुळे फारच वैतागले आहेत. हे मीम त्यांच्यावर करण्यात आले आहेत. या मीमवर हसायचे सोडून त्यांनी यावर भलताच राग काढला आहे. आता नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया.

रश्मी देसाईच्या खात्यातून अरहान खानने घेतले 15 लाख, चाहत्याने केली पोलखोल

म्हणून चिडले सौरभ शुक्ला

Instagram

सोशल मीडियावर सध्या एक मीम फिरत आहे. त्यामध्ये एका पाटीशेजारी सौरभ शुक्ला उभे आहेत. या पाटीवर इंग्रजीमध्ये एक मेसेज लिहिण्यात आला आहे. या मेसेजनुसार ‘आता जर कोणी घराबाहेर पडत असेल तर त्यांना मारण्यापेक्षा कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये जाऊन टाका. कारण त्यांना कोरोना व्हायरस काहीही करु शकणार नाही. कारण त्यांना या व्हायरसची भीती नाही.’ हे मीम्स इतरांप्रमाणे त्यांनीही पाहिले आणि त्यांचा राग इतका अनावर झाला की विचारायला नको. त्यांनी हे मीम पाहिल्यानंतर थेट पोलिसांनीच गाठले. त्यांनी या विरोधात थेट पोलिसांनाच तक्रार केली आहे. 

आता तुम्ही म्हणाले यात काय आहे चुकीचे

आता लोकांमध्ये कोरोना संदर्भात भीती निर्माण करण्यासाठी हे मीम काय चुकले असे तुम्हाला वाटत असेल तर यावर सौरभ शुक्लाने एक ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, हा एक शुद्ध वेडेपणा आहे आणि अत्यंत बेजबाबदारपणाचे मीम्स आहे. माझ्या फोटोचा उपयोग करुन अशा पद्धतीने चुकीचा मेसेज जाणे अजिबात चांगले नाही. त्यामुळे याकडे पोलिसांनी अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. असे त्यांनी यामध्ये म्हटले आहे.

अभिनेता रोनित रॉयने घरीच टी-शर्टपासून तयार केला मास्क

पोलिसांनी दिली हमी

आता घराबाहेर पडून पोलिसांकडे जाऊन तक्रार करणे शक्य नाही. पण ट्विटच्या माध्यमातून त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी या ट्विटमध्ये पोलिसांना टॅग केले आहे. पोलिसांनीही या ट्विटला लगेचच रिप्लाय दिला आहे. त्यांनी या सगळ्या प्रकरणाकडे लक्ष देण्याची हमी दिली आहे. त्यामुळे आता पोलिसांनी यामध्ये लक्ष घालायला सुरुवात केली आहे. 

लॉकडाऊनमध्ये टायगर आणि दिशा पटानी लिव्ह-इनमध्ये रहात असल्याची चर्चा

मीम्स करा जपून

मुख्यमंत्री यांनी नुकतेच येऊन सोशल मीडियावर याबद्दल अधिक माहिती दिली होती. त्यांनी सांगितले होते की, सोशल मीडियावर चुकीचे मेसेज पसरवणाऱ्या लोकांवर ते नजर ठेवणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे तुम्ही जर अशापद्धतीने जर मीम्स शेअर करत असाल तर तुम्हाला मीम्स करताना फार जपून राहायला हवे. कारण तुमच्यावर सगळ्यांच्या नजरा आहेत. 

कोरोना या विषाणूबद्दल जर तुम्ही उगाचच काही पसरवत असाल तर तुम्ही सावध राहणे फारच गरजेचे आहे.

Read More From मनोरंजन