मनोरंजन

अभिनेता शाहीर शेखच्या पत्नीचे झाले बेबीशॉवर, सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल

Trupti Paradkar  |  Aug 24, 2021
अभिनेता शाहीर शेखच्या पत्नीचे झाले बेबीशॉवर, सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल

अभिनेता शाहीर शेख टेलिव्हिजन माध्यमामध्ये खूपच लोकप्रिय आहे. अनेक मालिकांमध्ये निरनिराळ्या भूमिका साकारत त्याने चाहत्यांची मने जिंकून घेतली आहेत. चाहत्यांमध्ये हॅंडसम हंक म्हणून ओळख असलेला शाहीर सध्या त्याची पत्नी रूचिका कपूरच्या गरोदरपणाबाबत चर्चेत आहे. नुकतंच शाहीरने रूचिकाचे बेबी शॉवर साजरे केलं. घरात अगदी साधेपणाने त्याने काही जवळच्या लोकांच्या उपस्थितीत बेबी शॉवरचा कार्यक्रम साजरा केला. सोशल मीडियावर सध्या बेबी शॉवरचे फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोजमध्ये शाहीर आणि रुचिका दोघंही खूपच आनंदात दिसत आहेत.

महाएपिसोडनंतर प्रेक्षकांचा संताप, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ बंद करण्याची मागणी

रुचिका कपूरचे बेबी शॉवर

शाहीर शेख आणि रूचिका कपूर यांनी मागच्या वर्षी जूनमध्ये लग्न केलं होतं. लॉकडाऊनमुळे या दोघांनी कोर्ट मॅरेजचा निर्णय घेतला होता. आता ते त्यांच्या पहिल्या बाळाच्या आगमनाची तयारी करत आहेत. शाहीर आणि रूचिका लवकरच आईबाबा होणार असून नुकतंच रूचिकाचे बेबी शॉवर साजरे करण्यात आले. रुचिकाने बेबी शॉवरसाठी खास लव्हेंडर जांभळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तर शाहीर मात्र नेहमीप्रमाणे त्याच्या साध्या पेहरावातच वावरत होता. बेबी शॉवरसाठी घराची सजावट मात्र पेस्टल रंगाच्या सुंदर बलून्सने केली होती. घरात येणाऱ्या नव्या पाहुण्यासाठी खास तयारी करण्यात आली होती. घराच्या टेरेसवर यासाठी सुंदर सजावट करण्यात आली होती. या सेरेमनीमधील शाहीर आणि रूचिकाचे रोमॅंटिक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

अफगाणी क्रिकेटपटूशी अर्शी खान करणार होती लग्न, पण…

शाहीर टेलिव्हिजनवरील हॅंडसम हंक

शाहीर शेखने कमी वेळात टेलिव्हिजन माध्यमात स्वतःचे स्वतंत्र अस्तित्त्व निर्माण केले. कुछ रंग प्यार के 3 आणि सिलीगुडी या मालिकांमध्ये तो सध्या झळकत आहे. पवित्र रिश्ताच्या दुसऱ्या सीझनमध्ये तो मानवची भूमिका साकारत आहे. याआधी महाभारत, कुछ रंग  प्यार के चे दोन सीझन, झांसी की रानी, नव्या… नये धडकन नये सवाल या मालिकांमधून त्याने काम केलेले आहे. शाहीर खान वीरे दी वेडिंग या चित्रपटातही झळकला होता. शाहीरची पत्नी रूचिका बालाजी मोशन पिक्चर्सची क्रिएटिव्ह प्रोड्यूसर आणि व्हाईस प्रेसिडंट आहे. आता दोघंही आयुष्यातील एक नव्या भूमिकेसाठी म्हणजेच आईबाबा होण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे त्यांना यासाठी खूप शुभेच्छा 

तालिबानींच्या भीतीमुळे या अभिनेत्रीने सोडले होते अफगाणिस्तान, व्यक्त केली चिंता

Read More From मनोरंजन