मालिका म्हणा किंवा चित्रपट एखाद्या अभिनेत्याने साकारलेल्या काही भूमिका या प्रेक्षकांच्या मनात कायम राहतात. एखाद्या मालिकेतील अभिनेत्याचे पत्र जर ‘आदर्श’ या गटात मोडणारे असेल तर त्याची तशीच ओळख निर्माण होते. तर व्हिलन साकारणाऱ्या अभिनेत्याची ओळख ही त्याच्या त्या कामामुळे कायम ग्रे शेडमध्ये राहते. त्याच्या कामामुळे त्याला बऱ्याच शिव्या ही ऐकून घ्याव्या लागतात. पण हेच त्याच्या अभिनयाचे यश असते. आता गुडी गुडी काम करणारे अभिनेतेही काहीतरी नव ट्राय करण्याचा नक्कीच प्रयत्न करतात. आता टीव्हीचा लाडका आदर्श असा जावई म्हणजे शशांक केतकर. एक आदर्श मुलगा, बिझनेसमन आणि लाडका जावई अशा भूमिका करुन प्रेक्षकांच्या मनात राहिला आहे. पण आता तो त्याच्या या इमेजला ब्रेक देत थोड्या वेगळ्या रुपात प्रेक्षकांना दिसणार आहे. शशांकची नवी मालिका ‘पाहिले न मी तुला’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. यामध्ये शशांक व्हिलन रुपात दिसणार आहे.
अग्गंबाई सासूबाई’ चा नवा सीझन, तेजश्री प्रधानच्या जागी येतेय नवी सूनबाई
पहिल्यांदाच इमेज ब्रेक करणारा रोल
प्रत्येक कलाकाराला वेगवेगळ्या छटा असलेले रोल करायचे असतात. त्यामुळेच शशांकने देखील ही भूमिका निवडली असावी. पाहिले न मी तुला या मालिकेचे काही प्रोमो सध्या टीव्हीवर सुरु आहेत. या प्रोमोमध्ये दोन प्रेमवीरांच्यामध्ये सतत लुडबूड करणारा एक श्रीमंत बॉस सतत दिसत आहे. आपल्याच स्टाफपैकी एका मुलीवर त्याच प्रेम आहे. पण ती मुलगी आधीच कोणावर तरी प्रेम करते हे माहीत असूनही तिला आपल्या जवळ ठेवण्यासाठी आणि तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तो वेगवेगळे प्रयत्न करताना या प्रोमोमध्ये दिसत आहे. त्यामुळे या मालिकेचा पहिला प्रोमो आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील यात काही शंका नाही.
शशांकने स्विकारली भूमिका
टीव्ही हे असं माध्यम आहे ज्या माध्यमातून एखाद्या अभिनेत्याला रोज प्रेक्षकांच्या घरी आणि मनात वसता येतं. शशांकने खूप दिवसांनी मालिकेत दिसणार म्हटल्यावर त्याच्या फॅन्सना त्याच्या नव्या प्रोजेक्टची उत्सुकता असणे साहजिक आहे. शशांकने त्याच्या फॅन्ससाठी प्रोमो व्हिडिओ शेअर करत आता शिव्या खाव्या लागणार,अशी कॅप्शन लिहिली आहे. एक अभिनेता म्हणून टीव्हीवर प्रयोग फार कमी वेळा करायला मिळतात. असे म्हणत त्याने मालिकेचे आभार मानले आहेत. त्यामुळे थोडा वेगळा प्रयोग म्हणूनच शशांकने ही भूमिका स्वीकारली असावी असेच दिसतत आहे. शशांकला अशा भूमिकेत पाहून त्याच्या फॅन्सला थोडा धक्का बसला असेल. पण त्याला हा अभिनय खूपच चांगला जमला असे म्हणायला काहीच हरकत नाही. कारण त्याचा या प्रोमोतील अनुभव चिडण्यास भाग पाडतो इतकं नक्की.
आर्चीच्या परशाचा मेकओव्हर पाहून व्हाल थक्क, दिसतोय खूपच हँडसम
1 मार्चपासून मालिका भेटीला
दरम्यान, ही मालिका 1 मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शशांक केतकरसोबत या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे आशय कुलकर्णी ज्याला व्हिलन रोलमध्ये या आधीही प्रेक्षकांनी पाहिले आहे. तर फ्रेश फेस म्हणून या मालिकेमध्ये तन्वी मुंडले दिसणार आहे. तिने या आधी चित्रपटांमधून काम केले असले तरी पहिली लीड मालिका म्हणून ती पहिल्यांदाच प्रेक्षकांना दिसणार आहे.
तुम्हीही शशांकचे फॅन असाल तर त्याच्या उत्तम अभिनयासाठी तुम्ही ही मालिका पाहायला हवी.
अभिनेता धैर्य घोलपची भरारी, हिंदी मालिकेत करतोय प्रमुख भूमिका
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade