मनोरंजन

शेर शिवाजी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज,या कारणामुळे प्रेक्षक नाराज

Leenal Gawade  |  Apr 12, 2022
शेर शिवाजी चित्रपट

 पावनखिंडच्या यशानंतर आता शेर शिवाजी हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची घोषणा काही दिवसांपूर्वी झाली होती. आता या चित्रपटाचा ट्रेलर देखील आला आहे. याला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला आहे. पण एका कारणामुळे या चित्रपटावर प्रेक्षक नाराज असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर अनेक गोष्टी जैसे थे तैसे आहे. म्हणजे काही पात्र ही जशीच्या तशी पुन्हा या चित्रपटात दिसत आहे. त्यामुळे या चित्रपटाशी प्रेक्षक अधिक जोडला जातो. पण या चित्रपटातील एक बदल हा काही प्रेक्षकांना पटलेला दिसत नाही. जाणून घेऊया हा बदल आहे तरी काय?

बर्हिजी नाईक बदलले?

या चित्रपटावर नाराज असण्याचे कारण बदलेला बर्हिजी नाईक यांचा चेहरा आहे. पावनखिंड या चित्रपटात बर्हिजी नाईक यांची भूमिका हरिश दुधाडे या अभिनेत्याने साकारली होती. पण आता या नव्या पोस्टरनुसार नव्या चित्रपटात बर्हिजी नाईक यांची भूमिका अभिनेता दिग्पाल लांजेकर साकारणार आहे. नवा अभिनेता ही भूमिका साकारणार म्हटल्यावर अनेकांना हा नवा बदल नकोसा झाला आहे. अनेकांनी या पोस्टरखाली कमेंट करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना हा नवा बदल अजिबात रुचलेला नाही असे सर्वाथाने यामध्ये दिसत आहे. आता या नव्या बदलामुळे चित्रपटाला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिग्पाल दिसतो शोभून

बर्हिजी नाईक यांच्या भूमिकेत दिग्पाल शोभून दिसतोय. त्याची पर्सनॅलिटी या रोलला मॅच झालेली आहे. या चित्रपटात शिवबा हे गाणं देखील त्याच्यावर शूट झाले आहे. त्याची निवड ही चित्रपटाच्या दृष्टिकोनातून एकदम परफेक्ट होती. पण प्रेक्षकांचे नाते एखाद्या पात्राशी जुळली की, मात्र त्यांना ते पात्र बदलावे असे वाटत नाही. त्यामुळेच दिग्पालवर नाहीतर जुन्या पात्राशी नाळ जोडली गेल्यामुळे खूप जणांना ते पात्र बदललेले रुचले नसावे. पण दिग्पाल या भूमिकेत खरंच सुंदर दिसतो यात काहीही शंका नाही.

माझा राजा रंं… माझा शिवबा रं

आता या वेळी पुन्हा एकदा आपल्याला एक वेगळा लढा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हे या चित्रपटाच्या सीरिजमधील चौथे पुष्प आहे. अफझलखानची भूमिका मुकेश रिशी यांनी साकारली आहे. ही भूमिका त्यांना खूपच जास्त शोभलेली दिसत आहे. कारण त्याला या रुपात पाहिल्यानंतर अनेकांना राग यावा असे ते स्क्रिनवर दिसत आहे. शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असलेला अभिनेता चिन्मय मांडलेकर हा देखील दिसायला एकदम हटके दिसत आहे. त्याला या आधीही या भूमिकेत पाहिल्यामुळे प्रेक्षकांना नक्कीच एक वेगळं स्फुरण चढणार आहे. 

सध्या या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून 22 एप्रिल रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. 

Read More From मनोरंजन