बॉलीवूड

पहिल्या पत्नीच्या अफेअरबद्दल बोलणे नाही रुचले शिल्पाला, दिली ही प्रतिक्रिया

Leenal Gawade  |  Jun 13, 2021
पहिल्या पत्नीच्या अफेअरबद्दल बोलणे नाही रुचले शिल्पाला, दिली ही प्रतिक्रिया

काही गोष्टी झाकलेल्या असतात तेच बरं असतं.त्या उगाचचं समोर आल्या की, वर्तमानकाळ खराब होतो. असं काहीसं आता शिल्पा शेट्टीच्या बाबतीत झालं आहे. पती राज कुंद्रा याने लग्नाच्या इतक्या वर्षानंतर त्याच्या पहिल्या लग्नाबद्दल असे काही वक्तव्य केले की, त्यामुळे अभिनेत्री शिल्पा शेट्टी नाराज झाली आहे. पती राज कुंद्राने असे करायला नको होते. पहिल्या पत्नीबद्दल असे काहीही सांगायला नको होते. अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे. पहिल्या पत्नीच्या अफेअरबद्दल पती राज कुंद्रा नेमकं काय म्हणाला ते जाणून घेऊया.

सुशांत सिंह राजपूतवरील बायोपिकला हिरवा कंदील, कोर्टाने फेटाळली याचिका

का झाली शिल्पा नाराज

शिल्पाने बिझनेसमन राज कुंद्रा याच्याशी लग्न केले तेव्हा चर्चांना उधाण आले होते. राज कुंद्राची शिल्पा ही दुसरी पत्नी आहे. शिल्पाने ज्यावेळी राज कुंद्राशी लग्न केले त्यावेळी त्याचे लग्न मोडण्यासाठी शिल्पा कारणीभूत असल्याच्या चर्चा होत होत्या. पण शिल्पाने यावर कधीही कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. पण आता राजने नको तो भूतकाळ आता पुन्हा एकदा समोर आणल्यामुळे शिल्पा शेट्टी नाराज असल्याचे म्हटले जात आहे. शिल्पावर सतत होणाऱ्या आरोपांवर पहिल्यांदा पती राज कुंद्रा हा बोलला आहे. त्याने त्याचे लग्न मोडण्यासाठी शिल्पा शेट्टी नाही तर बायकोचे अफेअर असणे कारणीभूत मानले आहे. त्याबद्दल त्याने एका मुलाखतीत माहिती दिल्यामुळेच शिल्पाने या गोष्टी सांगणे गरजेच्या नव्हत्या असे म्हटले आहे.

काय म्हणाला राज कुंद्रा

राज कुंद्रा याने नुकतीच एका खासगी चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखती दरम्यान त्याची पहिली पत्नी कविताचा उल्लेख झाला. कारण कविताने दिलेल्या एका जुन्या मुलाखतीमध्ये लग्न मोडण्यासाठी शिल्पा शेट्टी कारणीभूत असल्याचे म्हटले होते. शिल्पाच्या वाढदिवसाच्या दिवशीच काही जुने व्हिडिओ आणि जुन्या बातम्या या व्हायरल होऊ लागल्या. राजने या सगळ्या बातम्या शिल्पाला देखील दाखवल्या त्यामुळे शिल्पाची देखील चिडचिड झाली होती. पण शिल्पाची कोणतीही चुकी नसताना शिल्पा या सगळ्या गोष्टी सहन करत आहे. मला कधीतरी हे सत्य सगळ्यांसमोर आणायचे होते. पत्नीच्या अफेअरची कोठेही चर्चा होऊ नये अशी शिल्पाची इच्छा होती. पण आता मला जगासमोर सत्य आणणे गरजेचे आहे. 

समीरा रेड्डीने पुन्हा शेअर केल्या बॉडी पॉझिटिव्हिटीबाबत खास टिप्स

राजने दिली धक्कादायक माहिती

राज कुंद्राने त्याच्या पहिल्या पत्नीचे सगळे आरोप फेटाळले आहे. त्याने मुलाखतीत सांगितले की, इंग्लडला राहात असताना मी माझ्या आई-वडीलांसोबत राहायचो. त्यावेळी माझी बहीण आणि तिचा नवरा हे देखील आमच्यासोबत राहात होते. कारण त्यांना इंग्लडला स्थायिक व्हायचे होते.माझी पत्नी आणि माझा मेहुणा हा अधिक काळ एकमेंकासोबत घालवत होते. याबद्दल मला सतत माहिती मिळत होती. पण मी याकडे मुळीच लक्ष दिले नाही. पण नंतर मला माझ्या ड्रायव्हरने देखील ही गोष्ट सांगितली. पण तरीही मी तिच्यावर संशय घेतला नाही. यामध्ये शिल्पाची काहीच चुकी नव्हती. असे त्याने सांगितले. लग्नाच्या इतक्या वर्षानंतर राजने ही माहिती दिल्यामुळे अनेकांना धक्का तर बसलाच. पण इतकेच नाही. इतकी वर्ष शिल्पाला ज्या कारणासाठी दोषी मानले जात होते. त्यावरुनही राजने पडदा उठवला. 

देवमाणूस’ मालिकेला येणार नवं वळण, नव्या चेहऱ्याची एंट्री

सगळीकडे होतेय याची चर्चा

शिल्पा- राज हे कपल सगळ्यांसाठीच आयडियल असे कपल झाले आहे. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात. ते सतत एकत्र असतात याचे व्हिडिओ अनेकांनी त्यांच्या सोशल मीडियावर आतापर्यंत पाहिले असतील पण आता  राज कुंद्राच्या या नव्या व्हिडिओमुळे नको त्या गोष्टींना उधाण येऊ लागले आहेत. सध्या सगळ्या सोशल मीडियावर या गोष्टीची चर्चा होऊ लागली आहे. 


राज कुंद्राने चांगल्या कारणासाठी जरी या गोष्टीवरुन पडदा उठवला असला तरी देखील शिल्पा शेट्टी या गोष्टीमुळे नक्कीच त्रास झाला आहे. 

Read More From बॉलीवूड