श्रिया पिळगावकर हे नाव अर्थातच मनोरंजन जगतामध्ये नवं नाही. सचिन आणि सुप्रियाची मुलगी ही ओळख सोडून श्रियाने आपली स्वतःची ओळखही निर्माण केली आहे. हे नवं वर्ष श्रियासाठी खास असणार आहे. वर्षाच्या सुरुवातीला श्रियाला तेलुगू सुपरस्टार राणा दुगूबत्तीबरोबर ‘हाथी मेरे साथी’ हा चित्रपट मिळाला आहे. कल्की कोचलीन आधी या चित्रपटाची लीड अभिनेत्री म्हणून काम करणार होती. पण आता कल्कीने हा चित्रपट सोडल्यानंतर श्रियाची वर्णी या चित्रपटामध्ये लागली आहे. प्रभू सोलोमन या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने श्रिया दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही झळकणार आहे. याआधी ‘फॅन’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये श्रियाने पाऊल ठेवलं. आता ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही श्रिया दिसणार आहे. ‘हाथी मेरे साथी’ हा हिंदी, तेलुगू आणि तामिळ या तीन भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. याशिवाय या चित्रपटामध्ये राणाबरोबर पुलकित सम्राटदेखील प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहे.
राजेश खन्ना यांना श्रद्धांजली
बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांचा 1971 मध्ये आलेला ‘हाथी मेरे साथी’ हा चित्रपट खूप गाजला होता. त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी हा चित्रपट बनवण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं आहे. वास्तविक या चित्रपटाची कथा एकदम वेगळी आहे. पण यामध्येदेखील हत्ती आणि अन्य वन्य प्राण्यांविषयी प्रेम दाखवण्यात येणार आहे. यासाठी श्रिया आणि राणाने केरळमध्ये कामाला सुरुवात केल्याची माहिती आहे. या चित्रपटामध्ये श्रिया एका पत्रकाराची भूमिका साकारणार आहे. यादरम्यान केरळमध्ये चित्रीकरणात व्यस्त असणाऱ्या राणाने मध्यंतरी एक ट्विटही केले होतं. ज्यामध्ये ‘केरळच्या जंगलात चित्रपटाचं चित्रीकरण’ असं कॅप्शन त्याने दिलं होतं. या चित्रपटाचं संगीत शंतनू मोईत्राने दिलं असून साऊंड ऑस्कर विजेता साऊंड इंजिनिअर रेसुल पुकुटीने दिला आहे.
नववर्ष श्रियासाठी खास
श्रियाने काही महिन्यांपूर्वीच ‘मिर्झापूर’मधून आपल्या अभिनयाची झलक प्रेक्षकांना दाखवून दिली आहे. तिच्या अभिनयाची खूपच प्रशंसा झाली. त्यानंतर आता लवकरच यावर्षी श्रियाचा अनुभव सिन्हाबरोबर ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’ येत असून गुरविंदर चढ्ढासह ब्रिटीश पिरियड ड्रामा ‘बीचम हाऊस’ येणार आहे. श्रिया नव्या वर्षात येणाऱ्या या चित्रपटांमुळे खूपच आनंदी आहे. शिवाय एकाच वेळी तीन भाषांमध्ये येणाऱ्या चित्रपटांमुळेही श्रियासाठी हे नववर्ष अगदी खास ठरलं आहे. या चित्रपटामध्ये श्रियाबरोबर विष्णू विशाल आणि झोया हुसैनदेखील दिसणार आहेत. श्रियाने आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. शिवाय तिने आपली एक वेगळी ओळखही निर्माण केली आहे. केवळ सचिन आणि सुप्रियाची मुलगी न राहता वेगवेगळ्या आणि प्रेक्षकांच्या लक्षात राहणाऱ्या भूमिका श्रिया निवडत असल्याचं प्रकर्षानं दिसून येत आहे. त्यामुळे आता या चित्रपटामध्ये श्रियाचं काम कसं असणार याची नक्कीच तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे. दरम्यान कल्कीने हा चित्रपट सोडला असला तरीही तिचा रणवीर सिंगबरोबरचा ‘गल्ली बॉय’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. यामध्ये तिच्याबरोबर प्रमुख भूमिकेत आलिया भटदेखील असणार आहे.
फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade