गेल्यावर्षी डिसेंबरचा महिना कितीतरी हॅपनिंग होता. कारण या दरम्यान अनेक मोठ्या सेलिब्रिटींचे लग्नसोहळे होते. त्यापैकीच एक होती ती म्हणजे ‘मकडी’ फेम श्वेता बासू प्रसाद. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात तिने फिल्ममेकर रोहित मित्तलसोबत लग्न केले. पण लग्नाला एक वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच तिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही केवळ चर्चा नाही तर तिने एक पोस्ट लिहीत तिने ही माहिती तिच्या फॅन्सला दिली आहे. अगदी दोनच दिवसांवर त्यांची #anniversary होती पण त्या आधीच हे दोघं वेगळे होणार आहेत.
सुव्रत जोशी साकारणार एक आगळी वेगळी भूमिका
श्वेता बसूने लिहिली पोस्ट
श्वेता बसूच्या घटस्फोटाची बातमी ऐकल्यानंतर ही खरी की खोटी असा प्रश्न पडला होता. पण तिचे इन्स्टा अकाऊंट तपासल्यानंतर ही गोष्ट खरी असल्याचे कळले आहे. स्वत: श्वेता बसूने ही पोस्ट लिहिली असून तिने सामंजस्याने आम्ही वेगळे होत आहोत असे म्हटले आहे. तिने रोहित मित्तल असा नवऱ्याच्या नावाचा उल्लेख करत ही पोस्ट लिहिली आहे. यामध्ये तिने कोणताही राग मनाशी न ठेवता रोहितने आपल्याला चांगल्या आठवणी दिल्या असून त्या माझ्याकडे कायम असतील. पण आता एकत्र राहणे शक्य नाही. त्यामुळेच आम्ही वेगळे होत आहोत. गेल्यावर्षी 13 डिसेंबरला त्यांनी लग्न केले होते.
कोण आहे रोहित मित्तल?
श्वेता बसू प्रसाद अनेकांना माहीत असली तरी देखील रोहित मित्तल कोण ? असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. तर रोहित मित्तल हा फिल्ममेकर आहे. Autohead नावाची फिल्म त्याने डिरेक्ट केली होती.ती नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त त्याच्या कामाची कोणतीही नोंद गुगलकडे नाही. त्यामुळेच त्याच्या नुसत्या इन्स्टा अकाऊंटवरुन फार काही सांगता येणं फारचं अशक्य आहे.
रितेशने धर्मेंद्रजींना दिल्या वाढदिवसाच्या अशा शुभेच्छा
सेक्स स्कँडलमध्ये अडकली होती श्वेता
बालकलाकार म्हणून ‘मकडी’ आणि ‘इक्बाल’ या चित्रपटातून तिने कामाला सुरुवात केली. पण तिला काम मिळायची बंद झाली होती. आता कोणत्याही चित्रपटात काम नाही म्हटल्यावर लोकांना तिचा विसर पडणे साहजिक आहे. पण ती अचानक समोर आली ते सेक्स स्कँडलमध्ये सापडल्यानंतर… एक नॅशनल अवार्ड विजेती अभिनेत्री इथे काय करत आहे असा प्रश्न अनेकांना पडला. पण ते खोटं नव्हतं. श्वेता प्रसादने तो मार्ग स्वत:च स्विकारला होता आणि ते तिने मान्य केले होते. त्यामुळे श्वेताला थेट सुधारगृहात पाठवण्यात आले.
तो एक निर्णय मला महागात पडला
सुधारगृहात दोन महिने घालवल्यानंतर जेव्हा श्वेता परतली. त्यावेळी तिने मीडियाला मुलाखत देत झालेल्या सगळ्या घटनेचा खुलासा केला होता. ती म्हणाली, ‘ मी माझ्या करिअरच्या बाबतीत अनेक चुकीचे निर्णय घेतले. माझ्याकडे कामं नव्हती.मला माझ्या कुटुंबाला पोसायचे होते. देहविक्री करुन पटकन पैसे मिळवता येतील असा मार्ग दिला कोणीतरी दाखवला आणि मी कसलाही विचार न करता ते करायचे ठरवले. या वाममार्गाला जात असताना कधी असे घडेल असे मला वाटले नव्हते. पण अनेकांच्या आयुष्यात असा दिवस आला असेल कदाचित त्यांनी माझ्या इतका वाईट निर्णय नाही पण वाईट निर्णय घेतला नसेल.
आता तिने रोहितपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्यानंतर ती तिचे आयुष्यात योग्य निर्णय घ्यावे ही अपेक्षा
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje