श्वेता तिवारी- अभिनव कोहलीमधील वाद दिवसेंदिवस विकोपाला जात चालला आहे. त्यांच्या नात्यात आलेला दुरावा आता जगजाहीर झाला आहे. त्यांच्या आयुष्यात रोज नवे काय घडत आहे. हे लोकांना त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन कळतेच. कारण ते नेहमी एकमेकांना उत्तर देणारे काहीना काही पोस्ट लिहीत असतात. अभिनव कोहलीला श्वेता तिवारीने घरातून बाहेर काढल्यानंतर त्याचे त्याच्या मुलाशी(रेयांश) भेटणे कठीण होऊन गेले आाहे. श्वेता, अभिनव आणि रेयांशची भेट घालून देण्यासाठी मुळीच तयार नाही. पण अखेर अभिनव कोहलीला त्याच्या मुलाचे दर्शन झाले आहे. तब्बल 3 महिन्यानंतर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तो मुलाला पाहू शकला आहे.
Good News: अभिनेत्री पूजा बॅनर्जी होणार आई, लॉकडाऊनमध्येच केलं लग्न
शेअर केली भावनिक पोस्ट
अभिनव कोहली गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची आपबीती सांगत आहे. त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप हे खोटे असल्याचे त्याने अनेक पुरावे सादर केले आहे. पण या लॉकडाऊनच्या काळात त्याला त्याच्या मुलाला पाहताही आले नाही. श्वेताने अभिनवला रेयांशशी भेट घडवून दिली नाही. पण अखेर 84 दिवसांनी अभिनव कोहली याला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्याच्या मुलाला पाहता आले आहे. त्याला पाहिल्यानंतर त्याने भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्याला या काळात साथ देणाऱ्या सगळ्यांचे त्याने आभार मानले आहे.
चित्रपटात किन्नरची भूमिका साकारुन या कलाकारांनी मिळवली अफलातून प्रसिद्धी
कौटुंबिक वादातून झाले दूर
लॉकडाऊन आधीपासूनच श्वेता आणि अभिनव यांच्यामध्ये काहीना काही वाद सुरु होते. त्यांच्यात काही आलबेल नाही हे कळत नव्हतं. पण नंतर श्वेता तिवारीने पोलीस स्टेशन गाठून अभिनव कोहलीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर प्रकरण फारच गंभीर असल्याचे कळले. श्वेता तिवारी हिच्या पहिल्या लग्नातून झालेली मुलगी पलक तिवारी हिच्यासोबत असभ्य वर्तन केल्याचा आरोप श्वेता तिवारीने केला होता. मुलीसोबतच्या असभ्य वर्तनाला कंटाळून तिने त्याला सोडण्याचा निर्णय घेतला होता. या आरोपानंतर बिथरलेल्या अभिनव कोहलीने सोशल मीडियाचा आधार घेत पलकबद्दल त्याच्या मनात मुलीशिवाय कोणत्याही भावना नसल्याचे पुरावे दाखल केले. पलक तिवारीचा खोटेपणा त्याने अनेकदा सगळ्यांना दाखवून दिला. त्यानंतर अनेकांना अभिनव कोहलीची बाजू समजू लागली. त्याच्या अनेक चाहत्यांनी त्याला या काळात पाठिंबाही दिला.
अखेर बॉलीवूडच्या या सेलिब्रिटी जोडीने घेतला घटस्फोट, मुलाला दोघंही सांभाळणार
श्वेता -लग्न- वाद
श्वेता तिवारी हिचे पहिले लग्न अभिनेता राजा चौधरीसोबत झाले होते. पण राजा चौधरीच्या अर्वाच्च वागण्यामुळे आणि सततच्या त्रासामुळे तिने त्याच्यापासून विभक्त होण्याचे ठरवले. त्यावेळी तिला पलक नावाची मुलगी होती. तिने मुलीची कस्टडी आपल्याकडे ठेवली आणि राजाला मुलीला तिला भेटण्यापासून दूर केले. पहिल्या लग्नात ती जवळजवळ 14 वर्ष होती. 2012 साली तिने राजापासून घटस्फोट घेतला आणि 2013 साली तिने अभिनेता अभिनव कोहलीसोबत लग्न केले. लग्नाच्या काही दिवसांपर्यंत त्यांचे सगळे चांगले होते. पलकला एक चांगला बाप मिळाल्याचेही तिने म्हटले होते. पण आता सगळे काही बदलून गेले आहे. पलकनेच अभिनव आरोप केल्यामुळे श्वेताने त्याची रितसर तक्रार करुन त्याला घरातून काढून टाकले आहे.
आता या दोघांच्या नात्याचे पुढे काय होणार हा प्रश्न त्यांच्या फॅन्सना पडला आहे.
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade