मनोरंजन

‘रॉकेट बॉईज’ आधुनिक भारत घडवणाऱ्या शास्त्रज्ञांना मानवंदना – सिद्धार्थ रॉय कपूर

Vaidehi Raje  |  Feb 14, 2022
Rocket Boys

चित्रपट निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर यांच्या रॉय कपूर फिल्म्सने OTT प्लॅटफॉर्मवर लोकांना नेमके काय आवडते याचा कोड क्रॅक केला आहे. 2 महिन्यांपेक्षा कमी कालावधीतच त्यांनी दोन यशस्वी कलाकृती निर्माण केल्या आहेत. त्यांच्या या कलाकृतींना प्रेक्षकांनीही डोक्यावर घेतले आहे. त्यातील एक म्हणजे ‘आरण्यक’ ही मालिका Netflix वर प्रदर्शित झाली आहे. आणि रॉकेट बॉईज ही मालिका  Sony Liv वर सध्या गाजते आहे.

या दोन्ही मालिकांचे विषय पूर्णपणे वेगवेगळे आहेत. तरीही या दोन्ही मालिकांनी जबरदस्त प्रेक्षकसंख्या आणि समीक्षकांची प्रशंसा मिळवली आहे. निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर यांनी हे यश मिळाल्यावर भावना व्यक्त करताना म्हटले की ,”‘रॉकेट बॉईज’ ही मालिका आधुनिक भारत घडवणाऱ्या शास्त्रज्ञांना मानवंदना आहे.” 

अधिक वाचा 25 फेब्रुवारीपासून घडणार ‘पाँडीचेरी’ची सैर

लोकांना देशाच्या सुवर्ण इतिहासाची माहिती देणारी – रॉकेट बॉईज

याविषयी बोलताना, सिद्धार्थ रॉय कपूर म्हणतात, “सध्या विविध OTT प्लॅटफॉर्म्सवर खूप वैविध्यपूर्ण चित्रपट व मालिका बनवल्या जात आहेत. अशा वेळी दर्शकांचे लक्ष आणि उत्साह आपल्या कलाकृतीकडे वेधून घेणे ही माझ्यासाठी खूप विशेष बाब आहे. आरण्यक ही आमची पहिली मालिका होती आणि या मालिकेला भारतातीलच नव्हे तर जगभरात पसरलेल्या भारतीयांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे तो रॉय कपूर फिल्म्समध्ये आम्हा सर्वांसाठीच खूप उत्साहवर्धक आहे. तसेच रॉकेट बॉईजने आपल्या देशातील प्रेक्षकांना देशभक्तीचा आणखी एक अँगल दिला आहे. Rocket Boys या मालिकेने आपल्याला, आज आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशाचा पाया रचण्यासाठी आधुनिक भारताच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अथक परिश्रमांची आठवण करून दिली; हा विचार करून मला खूप आनंद होतोय.”

अधिक वाचा – आयुषमान खुराणाने जागतिक रेडिओ दिनाच्या निमित्ताने दिला जुन्या आठवणींना उजाळा

आरण्यक OTT वर हिट

रॉय कपूर फिल्म्सची पहिली वेब सिरीज ‘आरण्यक’ प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली.  लेखक चारुदत्त आचार्य, शो रनर रोहन सिप्पी, दिग्दर्शक विनय वायकुल,  रवीना टंडन, परमब्रत चट्टोपाध्याय आणि आशुतोष राणा यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे या मालिकेचे अनेक प्रेक्षकांनी बिन्ज वॉचिंग केले. मालिका लाँच झाल्याच्या 48 तासांच्या आत, 13 देशांमधील नेटफ्लिक्सवरील टॉप 10 शोमध्ये आणि नेटफ्लिक्स भारत, बांग्लादेश आणि पाकिस्तानवर  आरण्यक’ हा प्रथम क्रमांकाचा शो होता. ‘स्क्विड गेम’ आणि ‘मनी हेस्ट’ सारख्या इतर ब्लॉकबस्टर नॉन-इंग्लिश शोसह Netflix वर जागतिक टॉप 10 च्या यादीत आरण्यकने आठवे स्थान मिळवले. 

महान शास्त्रज्ञ  होमी भाभा व विक्रम साराभाईंना आदरांजली

Sony Liv ची ‘Rocket Boys’ ही भारतातील पहिली मालिका आहे ज्यात दोन आदरणीय भारतीय शास्त्रज्ञांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रवासाचे चित्रण केले आहे. OTT प्लॅटफॉर्मवरच्या नियमित प्रेक्षकांच्या व्यतिरिक्त या मालिकेने वैज्ञानिक समुदायातील दर्शकांना तसेच शैक्षणिक क्षेत्रातील नामांकित व्यक्तींनाही आकर्षित केले आहे. ही मालिका भारतातील दोन महान शास्त्रज्ञ होमी भाभा आणि विक्रम साराभाई यांचा प्रवास दाखवते. त्यांनी किती कष्ट करून आधुनिक भारताचा पाया रचला याची आपल्याला कल्पना येते. जिम सरभ आणि इश्वाक सिंग यांनी या दोन शास्त्रज्ञांची भूमिका केली आहे. ही मालिका उत्तम बनवण्यामागे अभय पन्नू यांचे उत्कृष्ट दिग्दर्शन, निखिल अडवाणींची निर्मिती आणि संपूर्ण टीमची मेहनत आहे.  

भारतात होऊन गेलेल्या या दोन महान शास्त्रज्ञांविषयी माहिती देणारी ही मालिका सर्वच लहानथोरांनी बघायला हवी. 

अधिक वाचा – रणबीर आणि आलियाचं आधीच झालं आहे लग्न, आलिया भटने दिली कबुली

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा  MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन