Love

हे संकेत मिळाले तर समजून जावे, नाते उरलेय एकतर्फी

Vaidehi Raje  |  May 10, 2022
signs of one sided relationship

परफेक्ट जगात आणि आदर्श स्थितीमध्ये मैत्री आणि रोमँटिक नातेसंबंधांमध्ये एक नैसर्गिक देवाणघेवाण असते. कधी तुम्ही समोरच्या व्यक्तीसाठी काही करता तर कधी तुमच्यासाठी ती व्यक्ती काही करते. नात्यातला समतोल असा निरोगी असेल तर ते नाते टिकून राहते. परंतु नातेसंबंधांतला समतोल कधी बिनसतो  आणि केवळ एकच व्यक्ती जर सतत नात्यासाठी कष्ट करत राहिली तर तेव्हा ते नाते एकतर्फी होते. यामुळे त्या व्यक्तीला मानसिक त्रास होऊ शकतो. 

एकतर्फी नाते म्हणजे काय?

समतोल नात्यात एक स्थिरता असते. दोन्हीही पार्टनर्स एकमेकांसाठी झटतात. एकमेकांची काळजी घेतात, एकमेकांच्या गरजा समजून घेतात. पण एकतर्फी नात्यात हे सगळे केवळ एकच व्यक्ती करते. नात्यासाठी जे करावे लागेल ते सगळे कष्ट, त्याग, समजून घेणे हे सगळे एकाच व्यक्तीच्या अंगावर पडते आणि नात्याची जबाबदारी देखील एकच व्यक्ती निभावते. पण हे करता करता ती व्यक्ती एका क्षणी थकते. जर त्या व्यक्तीने या एकतर्फी नात्याची जबाबदारी एकट्यानेच उचलणे सुरु ठेवले तर ते नाते टिकते. पण जर त्या व्यक्तीची सहनशक्ती संपली तर मात्र ते नाते संपुष्टात येते कारण त्या व्यक्तीला त्या एकतर्फी नात्यामुळे थकवा जाणवतो. त्या व्यक्तीला असे वाटते की त्याचे त्याच्या पार्टनरशी असलेले नाते हे वास्तविक आणि अर्थपूर्ण राहिलेले नाही. त्यांचा पार्टनर त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कोणत्याही गोष्टीचा त्याग करत नाही. अशा एकतर्फी नातेसंबंधातील तणावाचे शारीरिक आणि भावनिक दुष्परिणाम होऊ शकतात. 

Signs That The Relationship Is One Sided

अनेकवेळा असे घडते जेव्हा नात्यात आपण सर्वतोपरी प्रयत्न करत असतो, पण समोरची व्यक्ती तेवढा प्रयत्न करत नसते. अशा परिस्थितीत निराशा, असुरक्षितता आणि गरजा वाढतात. ही परिस्थिती त्या व्यक्तीसाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप थकवणारी बनते जी हे नाते टिकवण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावते. अशा परिस्थितीत, हे महत्वाचे आहे की तुम्ही ती चिन्हे वेळीच ओळखवी जे सूचित करतात की तुमचे नाते आता एकतर्फी आहे आणि प्रेम करणारे केवळ तुम्हीच आहात.

गरजेच्या वेळी जोडीदाराची अनुपस्थिती

तुम्हाला जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा तुमचा पार्टनर तुम्हाला शारीरिक व मानसिक आधार देण्यास उपस्थित असतो का? जर बहुतेक वेळा तुमचे उत्तर नाही असेल तर ते असेच दर्शविते की त्यांना तुमची तितकी काळजी नाही जितकी तुम्ही त्यांची काळजी घेत आहात. नात्यात एकमेकांची काळजी आणि उपस्थिती दोन्ही बाजूंनी समान असली पाहिजे.जर तुम्हाला प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी तुमच्या जोडीदाराशिवाय जावे लागत असेल आणि तुम्हाला त्यांच्या गैरहजेरीचे कारण सांगावे लागत असेल, तर या नात्यात तुम्ही त्यांच्या चुका आणि अनुपस्थिती लपवत आहात. विशेष प्रसंगी तुम्हाला एकटे राहावे लागत असेल तर समजून जा तुमच्या पार्टनरचे तुमच्याकडे दुर्लक्ष होते आहे आणि ते नाते एकतर्फी आहे. 

Signs That The Relationship Is One Sided

जोडीदाराशी संवाद कमी होणे  

जर तुम्ही तुमच्या सर्व समस्यांचे कारण स्वत:ला मानायला सुरुवात केली असेल आणि प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी , चुकीसाठी माफी मागायला लागलात, तर तुम्ही स्वतःला सर्व तणावाचा बळी बनवत आहात. कधी-कधी असं होतं की तुमचा पार्टनर तुमच्या रोजच्या आयुष्याबद्दल बोलणं बंद करतो. अशा स्थितीत तुम्ही तुमचे सर्व अपडेट्स आणि समस्या इतर कोणाशी तरी शेअर करता. तसे असल्यास, याचा अर्थ असा की तुमच्या जोडीदाराला तुमच्या दैनंदिन जीवनात रस नाही.

नात्यात जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते, तेव्हा समजून जावे की हे नाते एकतर्फी उरलेले आहे. 

Photo Credit – istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From Love