आरोग्य

या संकेतावरून ओळखा तुम्हाला पुरेशा झोपेची आहे गरज

Trupti Paradkar  |  Aug 9, 2022
या संकेतावरून ओळखा तुम्हाला पुरेशा झोपेची आहे गरज

निरोगी राहण्यासाठी प्रत्येक माणसाने दररोज कमीत कमी सहा ते सात तास शांत झोप घेणं गरजेचं आहे. शिवाय शांत झोप घेतली तर दिवसभर तुम्ही उत्साही आणि फ्रेश दिसता. पण आजकाल धकाधकीच्या जीवनशैलीत अनेकांना पुरेशी झोप मिळत नाही. रात्री उशीरापर्यंत काम केल्यावर पुन्हा सकाळी कामासाठी लवकर उठावे लागते. सहाजिकच अपुऱ्या झोपेचे परिणाम तुमच्या शरीरावर दिसू लागतात. हे संकेत तुम्हाला झोपेची गरज आहे असं सांगत असतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं तर त्यांचे गंभीर परिणाम आरोग्यावर होऊ शकतात. यासाठी वेळीच तुमची झोप पूर्ण होत आहे का याकडे लक्ष द्या. यासोबतच वाचा झोप येण्यासाठी काय करावे, जाणून घ्या घरगुती उपाय | Zop Yenyasathi Upay, कोणत्या बाजूला झोपावं, झोपण्याची योग्य पद्धत (Sleeping Direction In Marathi),

या संकेतावरून ओळखा तुम्हाला आहे जास्त झोपेची गरज 

जर तुमची झोप पूर्ण झाली नसेल तर तुमचे शरीर काही संकेत देत तुम्हाला याची जाणीव करत असतं. म्हणून वेळीच ओळखा हे संकेत

अलार्म शिवाय जाग न येणं

माणसाच्या शरीराचे एक नैसर्गिक चक्र असते. ज्यामुळे तुम्ही एखादी गोष्ट दररोज ज्या वेळी करता ती त्यावेळीच तुमच्याकडून केली जाते. जसं की तुमच्या झोपेची वेळ झाली की तुम्हाला जांभई यायला सुरूवात होते. शिवाय सकाळी अर्लाम वाजला नाही तरी तुम्हाला योग्य वेळी जाग येते. पण जर तुमची झोप पूर्ण होत नसेल तर सकाळी उठण्यासाठी तुम्हाला नेहमी अर्लामची गरज लागते. तुम्ही अर्लामशिवाय उठूच शकत नाही. एवढंच नाही बऱ्याचदा अशी माणसं अर्लाम वाजल्यावर नकळत तो बंद करून पुन्हा झोपी जातात. तुमच्या बाबतीत असं होत असेल तर तुम्हाला आणखी जास्त झोपेची गरज आहे.

झोपेत कामं करणं

रात्रीची झोप पूर्ण झाली नाही की दिवसभर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर जाणवत राहतो. अपुऱ्या झोपेमुळे तुम्हाला दिवसभर थकल्यासारखं आणि कंटाळवाणं वाटत असतं. ज्या लोकांची झोप नेहमीच पूर्ण होत नाही ती माणसं दिवसभर झोपेतच बरीचशी कामं करत असतात. अशामुळे त्यांच्या कामात चुका होतात. प्रवासात झोप आल्यास दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे वेळीच सावध व्हा.

दिवसभर चहा,कॉफी पिणे अथवा धुम्रपान करणे 

झोप पूर्ण न झाल्यामुळे दिवसभर अशा लोकांना थकवा आणि निरूत्साह जाणवतो. मग काम करताना हा थकवा घालवण्यासाठी अशी माणसं सतत चहा,कॉफी घेणे अथवा धुम्रपान करणे अशा सवयी लावून घेतात. उत्तेजित करणारी पेयं आणि व्यसने सतत केल्यामुळे त्याचा दुष्परिणाम शरीराला भोगावा लागतो. म्हणूनच तुम्हाला अशा वाईट सवयी लागल्या असतील तर त्या वेळीच सोडा आणि झोपेचे योग्य व्यवस्थापन करा.

सतत आजारी पडणे

झोप पूर्ण झाली नाही की त्याचे परिणाम तुमच्या शरीरावर दिसू लागतात. अपुऱ्या झोपेमुळे तुमची प्रतिकार शक्ती कमजोर होते. याचाच परिणाम म्हणजे तुम्ही सतत आजारी पडता. वारंवार ताप, सर्दी, खोकला अथवा साथीच्या आजारपणांमुळे तुमच्या शरीराला थकवा येतोच. शिवाय याचा परिणाम तुमच्या जीवनशैली आणि कामावरही होतो. यासाठी जर तुम्ही वारंवार आजारी पडत असाल तर आधी तुमच्या झोपेचं व्यवस्थापन करा. तसंच वाचा सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय | Cold And Cough Home Remedies In Marathi

सतत चिडचिड होणे

शांत आणि निवांत झोप लागली की तुमचा पुढचा दिवस चांगला जातो. कारण झोपेमुळे शरीराला आराम मिळतोच पण मनही शांत होतं. पण जर तुमची झोपच अपुरी झालेली असेल तर तुम्हाला दिवसभर अस्वस्थ वाटत राहते. कामात चुका होतात, अनेक गोष्टी तुम्ही विसरून जाता.  ज्यामुळे तुमचा मूड बिघडतो आणि सतत चिडचिड होत राहते. या लक्षणांचा संबध तुमच्या अपुऱ्या झोपेशी असल्यामुळे पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm आले आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From आरोग्य