मनोरंजन

गायक मिका सिंगसाठी होणार स्वयंवर, कोण होईल मिकाची दुल्हनिया

Leenal Gawade  |  Jun 23, 2022
मिका करतोय स्वयंवर

टीव्हीवर वेगवेगळे रिॲलिटी शो पाहायला तुम्हाला नक्कीच आवडत असेल तर आता आणखी एक रिॲलिटी शो तुमच्या भेटीला येणार आहे. आता प्रसिद्ध गायक मिका सिंग (Mika Singh) हा आपल्यासाठी जोडीदाराच्या शोधात आहे. त्याचा हा खास रिॲलिटी शो ‘स्वयंवर : मिका दी वोटी’ या नावाने सुरु झाली असून यामध्ये मिकाला त्याची जोडीदार मिळणार आहे. या आधी राखी का स्वंयवर, राहुल की दुल्हनिया असे काही स्वयंवर आपण पाहिले आहेत. त्यामध्ये काय असते ते देखील पाहिले आहे. असे असताना आता या नव्या शोमधून मिका खरंच आपली बायको निवडणार आहे की हा फक्त एक शो पुरता मनोरंजनाचा भाग असणार आहे हे लवकरच कळेल.

मिकाला मिळेल का जोडीदार

खास मिकाचा जोडीदार शोधण्यासाठी हा शो आयोजित करण्यास आला आहे. मिकासाठी खास 12 मुलींची निवड झाली असून वेगवेगळ्या प्रोफेशनमधील या मुली आहेत. आतापर्यंत यामध्ये 8 चेहरे दाखवण्यात आले आहेत. अजून 4 चेहऱ्यांची ओळख होणे बाकी आहे. पण सध्या जे प्रोमो दाखवले जात आहेत. त्यामध्ये मिकाच्या प्रेमात अनेक जणी आहेत असेच दिसत आहे. मिकाला सरप्राईज देण्यासाठी अनेकांनी वेगवेगळ्या गोष्टी केलेल्या दिसत आहेत. यामध्ये वेगवेगळे ट्विस्ट आणून याला अधिक रंजक बनवण्याचे काम हा नवा शो करणार आहे हे नक्की! या शोचे सूत्रसंचालन शान करताना दिसत असून आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी यामध्ये गेस्ट व्हिझिटर म्हणून येणार आहेत.

मिकाच्या स्वयंवरचा घाट

मिका सिंगचे करिअर हे नेहमीच टॉपवर राहिलेले आहे. त्याने उत्तमोत्तम गाणी गायली आहेत. पण रिलेशनशीपच्या बाबतीत मात्र तो कायमच खाली राहिला आहे. त्याच्या आयुष्याशी निगडीत अनेक कॉन्ट्राव्हर्सीज जोडलेल्या आहेत. राखी सावंतला घेतलेले किसयामुळेही तो खूपच जास्त प्रकाशझोतात आला. मिका सिंग हा सध्या 45 वर्षांचा असून त्याने रिलेशनशीप व्यतिरिक्त कोणाशीही नाते जोडलेले नाही.  त्यामुळे आता या शो नंतर त्याला त्याचा जोडीदार मिळण्याची अपेक्षा आहे.

लहान वयाच्या मुली

मिका सिंगचे वय पाहता. त्याला आलेल्या मुली या देखील आजुबाजूच्या वयाच्या असणे फारच गरजेच्या होत्या. पण मिकासाठी आलेल्या या मुली वयाने खूपच लहान आहेत. वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या या मुली एखाद्या मॉडेलशिवाय काही कमी नाहीत. पण वयाने लहान मुली का? असा प्रश्न अनेकांनी केला आहे. एखादा रिॲलिटी शो खरा असतोच असे सांगता येत नाही. कारण या आधी झालेले कोणतेही स्वयंवर टिकलेले नाही.  राहुलने ज्या डिंपीशी लग्न केले तिच्यासोबत गैरवर्तन केल्यामुळे तिने त्याला सोडून दिले.  राखीने देखील स्वयंवरसाठी ज्याला निवडले त्या इलेशला सोडून दिले. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या स्वयंवरामधून मनोरंजनाशिवाय काहीही साध्य झालेले नाही. त्यामुळे आता या सीझनकडून काय अपेक्षा करायची असा प्रश्न आहे. 

दरम्यान एक रिॲलिटी शो म्हणून हा नवा कोरा शो पाहण्यास काहीच हरकत नाही. 

Read More From मनोरंजन