मनोरंजन

गायिका सावनी रविंद्र असा करणार 2020 चा सांगितीक शेवट

Leenal Gawade  |  Dec 9, 2020
गायिका सावनी रविंद्र असा करणार 2020 चा सांगितीक शेवट

2020 हे वर्ष आलं कसं आणि गेलं कसं? कळलंच नाही. हे वर्ष सगळ्यांना कोरोनामुळे लक्षात राहील. अनेक चढ- उतार पाहताना आता नव्या वर्षाची पहाट ही चांगली असावी अशी इच्छा आपल्या सगळ्यांचीच आहे. पण सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी गायिका सावनी रविंद्र एक नवं गाणं घेऊन आपल्या भेटीला येणार आहे. म्हणजे या वर्षाने आपल्याला कितीही झुलवलं असलं तरी त्याला निरोप हा चांगल्या पद्धतीनेच द्यायला असे सावनीचे देखील मत आहे. म्हणूनच ती या वर्षाचा शेवट सांगितीक करणार आहे. या खास दिवसासाठी ती कोणतं गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतेय त्याविषयी जाणून घेऊया.

Bigg Boss 14: राहुल परतण्याची चर्चा,प्रेक्षकांमुळे मेकर्सना घ्यावा लागला निर्णय

सुरेल मेजवानी

यंदा अनेकांना 31 म्हणजे 2020 चा शेवट घरीच साजरा करावा लागणार आहे. लॉकडाऊनचे अनेक नियम शिथील करण्यात आले तरी देखील मनमोकळेपणाने आजही कोणत्या कार्यक्रमाला अनेकांना जाता येत नाही. म्हणून घर बसल्या एका मॅशअप गाण्याचा आनंद गायिका सावनी रविंद्र देणार आहे.या नव्या मॅशअपच्या कामाला तिने सुरुवात केली आहे. पण अद्याप ते कशापद्धतीने सादर केले जाईल हे अजूनही गुलदस्त्यात आहे.  पण डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ती हे गाणं तिच्या युट्युबवर रिलीज करणार आहे. त्यामुळे संगीत प्रेमींनी थोडी कळ सोसायला काहीच हरकत नाही. तिच्या या नव्या मॅशअपमुळे 2021 चा पहिला दिवस मस्त एनर्जीने भरलेला असेल यात काहीही शंका नाही. 

दीपिका पादुकोणच्या स्मितहास्याला मिळाला आंतरराष्ट्रीय सन्मान

नुकतेच केले होते ग्लॅमरस फोटोशूट

सावनी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन सतत अॅक्टिव्ह असते. तिच्या फॅन्ससाठी ती काहीना काही पोस्ट करत असते. पण यंदा ग्लॅमरस फोटोशूट करत तिने तिची एक वेगळी बाजून प्रेक्षकांसमोर आणली.तिच्या या ग्लॅमरस फोटोची लोकांची तारीफही केली. तुम्ही तिचे हे ग्लॅमरस फोटोशूट पाहिले नसेल तर आताच ते पाहा. कारण यामध्ये तुम्हाला एक वेगळी सावनी नक्कीच दिसेल.

विविध भाषांमध्ये सादरीकरण

कलाकाराची ओळख ही तो किंवा ती कोणत्या भाषेत काम करत आहे यातून घडत नाही. तर त्याच्या सादरीकरणातून घडते. सावनी रविंद्रने वेगवेगळ्या भाषांमधून काम केलेले आहे. सावनीने मराठीसह, हिंदी, तमिळ गुजराती, बंगाली, कोंकणी अश्या विविध भाषेत अनेक गाणी गायली आहेत. त्यामुळे तिचे भारतातचं नव्हे तर जगभर चाहते आहेत. शिवाय तिने इंस्टाग्रामवर 250 k फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे सोशल मिडीयावर तिच्या चाहत्यांनी तिचं भरभरून कौतुक केलं आहे. 

मनोरंजनाची खुमासदार फोडणी म्हणजे ‘बायकोला हवं तरी काय?’

सावनी ही POPxo साठी नेहमीच तिच्या सुरेल आवाजाची भेट देत असते. तिने आतापर्यंत तिच्या गाण्याची झलक असलेले व्हिडिओ आमच्यासोबत शेअर केले आहेत. तिच्या चाहत्या वर्गाने तिच्या प्रत्येक नव्या प्रोजेक्टचे अगदी तोंडभरुन कौतुक केले आहे आणि आम्ही सुद्धा. 

आता सावनीचे हे गाणं तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्ही थोडी वाट पाहा.

 

Read More From मनोरंजन