मनोरंजन

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हे चित्रपट होणार प्रदर्शित, गोदावरी चित्रपटाचा समावेश

Trupti Paradkar  |  May 13, 2022
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हे चित्रपट होणार प्रदर्शित, गोदावरी चित्रपटाचा समावेश

कान्स फिल्म फेस्टिव्हलकडे जगभरातील चित्रपट चाहत्यांचे लक्ष लागलेले असते. यंदा होणारा कान्स महोत्सव भारतासाठीदेखील खास आहे. कारण भारत  स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत असतानाच, कान्स फिल्म फेस्टिव्हललाही यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या कान्स महोत्सवमध्ये भारताच्या काही चित्रपटांचे प्रदर्शन केले जाणार आहे. एवढंच नाही तर यंदा भारताला कान्समध्ये कंट्री ऑफ ऑनरचा सन्मान मिळणार आहे. कान्सच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादा देश कंट्री ऑफ ऑनर असणार आहे. कान्स महोत्सव यंदा 17 मे ते 28 मे 2022 पर्यंत असणार आहे. भारताचे सहा चित्रपट यामध्ये प्रदर्शित केले जाणार आहेत. ज्यामध्ये मराठीतील गोदावरी चित्रपटाचाही समावेश आहे.

कसा असेल यंदा कान्स महोत्सव

कान्स महोत्सवमध्ये यंदा पहिल्यांदाच कंट्री ऑफ ऑनरची परंपरा सुरू होणार आहे आणि पहिल्याच वर्षी यामध्ये भारताला हा सन्मान मिळणार आहे. नेहमीप्रमाणे या महोत्सवात बॉलीवूडच्या मोठमोठ्या कलाकारांची रेड कार्पेट एन्ट्री पाहायला मिळेल. शिवाय यासोबतच भारतातील पाच चित्रपटांचा वर्ल्ड प्रिमिअर या महोत्सवात होणार आहे. ज्यामध्ये हिंदीतील अल्फा बीटा गामा, मिशिंगमधील बूम्बा राइड, मल्याळम ट्री फुल ऑफ पॅरेंट्स, हिंदीतील रॉकेट्री – दी नांबी इफेक्ट, हिंदी आणि मराठीतील धुई आणि मराठीतील गोदावरीचा समावेश आहे. केद्रिय माहिती आणि प्रसारण मंत्रायलाने यंदाच्या 75 व्या कान्स महोत्सवात सादर केल्या जाणाऱ्या या चित्रपटांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. 

काय आहे गोदावरी 

गोदावरी हा चित्रपट हा महाराष्ट्रातील गोदावरी नदीकाठी राहणाऱ्या एका सामान्य माणसाची कथा सांगणारा आहे. गोदावरीमध्ये अभिनेता जितेंद्र जोशीची मुख्य भूमिका आहे. यासोबतच नीना कुलकर्णी, गौरी नलावडे, सखी गोखले, प्रियदर्शन जाधव, संजय मोने अशा दिग्दज कलाकारांच्या भूमिका यात आहेत. आमच्या कुटुंबाची गोष्ट पाहा तुमच्या कुटुंबासोबत असं सांगत या चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर प्रदर्शित करण्यात आलं होतं. ब्लू ड्रॉप्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स यांनी गोदावरी चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. मराठी चित्रपटाला कान्स महोत्सवात स्थान मिळाल्यामुळे चाहते नक्कीच खूप खुश झाले आहेत. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन