Acne

वेडिंग सीझनमध्ये बॅकलेस ब्लाऊज किंवा चोळी घालण्याआधी घ्या ही काळजी

Aaditi Datar  |  Nov 17, 2019
वेडिंग सीझनमध्ये बॅकलेस ब्लाऊज किंवा चोळी घालण्याआधी घ्या ही काळजी

लग्नाच्या सिझन (Wedding Season) ला आता सुरूवात झाली आहे. आता जवळचं किंवा मैत्रिणीचं लग्न आहे म्हटल्यावर हौस मौज आलीच. मग यानिमित्ताने लेहंगा- चोली किंवा स्टाईलिश बॅकओपन गाऊन किंवा बॅकलेस ब्लाऊज घातला जातो. सध्या बॅकलेस ब्लाऊज (Backless Blouse) आणि डीप बॅक डिझाईन्सही खूप ट्रेंडमध्ये आहेत. जर तुमचंच लग्न असेल तर ही फॅशन करण्याआधी तुम्हाला तशी तयारीही आधी करावी लागेल. फक्त बॅक पोलिशिंग करून चालणार नाही. कारण फोटोशूट म्हटल्यावर तुम्हाला त्वचेची विशेष काळजी (Skin Care) घ्यावी लागेल.

बॅकलेस फॅशन करण्याआधी (Backless Fashion)

जसा लग्नामध्ये चेहरा सुंदर दिसावा म्हणून आपण काळजी घेतो त्याचप्रमाणे बॅकलेस फॅशनसाठी पाठीची त्वचा सुंदर आणि चमकदार दिसायला हवी. यामुळे तुम्ही निवडलेला गाऊन किंवा लेहंगा चोली तुमच्यावर एकदम परफेक्ट दिसतील. चला पाहूया यासाठी काही स्किनकेअर टिप्स.

  1. गरम पाणी टाळा – कोमट किंवा थोडं गरम पाणी हे शरीरासाठी चांगलं असतं. पण जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्यास ते तुमच्या त्वचेला कोरडं करतं. एवढंच नाहीतर शरीरातून नैसर्गिक तेलही उत्सर्जित होतं आणि खाज यायला सुरूवात होते. त्यामुळे कोमट पाण्यानेच आंघोळ करा.  
  2. बॉडी वॉश बदला – जर तुमच्या पाठीवर सतत पिंपल्स येत असतील तर हे बॅकलेस फॅशनसाठी अजिबातच सूटेबल नाही. त्यामुळे लवकरात लवकर तुमचा बॉडी वॉश बदला. हवं असल्यास तुम्ही नॅचरल घटक असलेल्या बॉडी वॉशचा वापर करू शकता. ज्यामुळे तुम्हाला पिंपल्सच्या समस्येपासून सुटका मिळेल. शक्य असल्यास तुम्ही घरगुती उटण्याचाही वापर करू शकता. जे खूपच उत्तम आहे त्वचेच्या काळजीसाठी. 
  3. डेड स्किनपासून सुटका – पाठीकडे आपलं या निमित्तानेच लक्ष जातं. त्यामुळे जर तुम्हाला पाठीवरील डेड स्किनपासून सुटका हवी असेल तर आठवड्यातून 2 ते 3 वेळा, त्वचेच्या अनुरूप स्क्रब करा. यामुळे त्वचेला येणारी खाज आणि डेड स्किनपासून सुटका मिळेल आणि त्वचा होईल चमकदार. 
  4. त्वचेला करा हायड्रेट – हे सर्व मुद्दे लक्षात घेता तुमची स्किन हायड्रेट करणंही महत्त्वाचं आहे. त्यासाठी योग्य प्रमाणात पाणी प्या, सॅलड आणि हिरव्या पालेभाज्या जास्तीत जास्त आहारात सामील करा. कारण जेव्हा गोष्ट बॅकलेस ड्रेसेसची असते तेव्हा तुमची त्वचा हायड्रेट राहणं गरजेचं आहे. ज्यामुळे जेव्हा तुम्ही बॅकलेस ड्रेस घालाल तेव्हा तुमची त्वचाही ग्लो करेल. 
  5. हायजीनही आहे महत्वाचं – वरील उपायांसोबतच हायजीनही तेवढंच महत्वाचं आहे. जसं तुमचे कपडे स्वच्छ असण्यासोबतच तुमच्या पलंगावरील चादरही स्वच्छ असणं गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्ही बेडवर झोपता तेव्हा चादरीवरील बॅक्टेरियाचा तुमच्या त्वचेशी संबंध येतो. ज्यामुळे तुम्हाला खाज आणि रॅशेजचा त्रास होऊ शकतो.

निरोगी आरोग्याचं रहस्य, सकाळी रिकाम्या पोटी खा ‘हे’ पौष्टिक पदार्थ

लक्षात घ्या वरील टिप्स फक्त लग्नाआधीच नाहीतर रोजच फॉलो केल्यातर तुमची त्वचा नेहमीच सुंदर आणि चमकदार दिसेल. त्यामुळे आता या टिप्स फक्त फंक्शनपुरत्या फॉलो करायच्या की, रोज हे तुम्ही ठरवा. 

लग्नाचा सिझन एन्जॉय करा आणि सुंदर दिसा.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या क्लिक करा.

You Might Like These:

ब्लड ग्रुपनुसार डाएट फॉलो केल्यास आरोग्याला होतील फायदे

लग्नासाठी हारांचे सुंदर डिझाईन्स (Varmala Designs In Marathi)

Read More From Acne