असं म्हणतात की, प्रत्येकाच्या आयुष्यात यशाचा काळ येतो. कधी तो करिअरच्या सुरूवातीला असतो तर कधी करिअरच्या नंतरच्या टप्प्यावर. मराठीतील गुणी अभिनेत्री स्मिता तांबेच्याबाबतीतही असंच काहीसं घडल्यासारखं दिसतंय. सध्या मराठीतील ही नावाजलेली अभिनेत्री आपल्या कक्षा उंचावत जबरदस्त भरारी घेत आहे. त्याचाच घेतलेला हा आढावा.
कंगना आणि स्मिता घेणार पंगा
कंगना रणौतच्या कबड्डी खेळावर आधारित पंगा या चित्रपटात स्मिताही झळकणार आहे. कंगना या चित्रपटात एका कबड्डी खेळाडूची भूमिका साकारत आहे. जिचं कॉलेजपासून ते अगदी आई होण्यापर्यंतचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटासाठी कंगना सध्या वजन वाढवत आहे. या चित्रपटात कंगना आणि स्मितासोबत अभिनेत्री नीना गुप्ता आणि पंजाबी अभिनेता जस्सी गिल यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन अश्विनी अय्यर तिवारी करत असून हा चित्रपट पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे.
कंगना रणौत कशी साकारणार जयललिता यांची भूमिका
स्मिताच्या करिअरमधील सुवर्णकाळ
सध्या स्मिताच्या करिअरमध्ये खूप चांगले चांगले प्रोजेक्ट्स तिला मिळत आहेत. फक्त मराठीतच नाहीतर बॉलीवूड, मराठी नाटक आणि वेबसीरिज अशी चौफेर तिचीही यशस्वी घौडदौड सुरू आहे.
नुकतंच स्मिताच्या इडियट्स या नाटकाचे 50 प्रयोग झाले. नाटकासोबतच ती सध्या वेबसीरिज आणि हिंदी चित्रपटातही काम करत आहे. स्मिता तांबेही ‘सेक्रेड गेम्स’ या प्रसिद्ध वेबसीरिजच्या दुसऱ्या सिझनमध्ये दिसणार आहे.
त्यासोबतच स्मिताची सध्या ‘माय नेम इज शीला’ ही वेबसीरिज सुरू असून ‘हवा बदले हसू’ या वेबसीरिजमध्येही ती झळकणार आहे. या वेबसीरिजमध्ये ती आरती नावाच्या पीएचडी विद्यार्थीनीची भूमिका साकारत आहे. जी पेट्रोलपंपावर काम करत पर्यावरण शास्त्रात पीएचडी करत असते. ही वेबसीरिज एक सायन्स-थ्रिलर आहे. या वेबसीरिजमध्ये पर्यावरणाच्या मुद्द्यावर भाष्य करण्यात येणार आहे.
स्मिताची सुरूवात
स्मिताने तिच्या करिअरमध्ये आत्तापर्यंत अनेक दमदार भूमिका केल्या आहेत. ज्यामध्ये जोगवा, 72-मैल आणि देऊळसारख्या विविध प्रकारच्या भूमिका तिने साकारल्या आहेत. एवढंच नाहीतर तिने बॉलीवूडमधील सिंघम रिटर्न्स आणि रूख अशा सिनेमातही काम केलं आहे. तर नुकत्याच आलेल्या ‘सावट’ या मराठी थ्रिलर चित्रपटाच्या माध्यमातून तिने निर्मिती क्षेत्रातही पाऊल टाकलं आहे. या चित्रपटाच्या कथेला आणि स्मिताच्या पोलीस ऑफिसरच्या भूमिकेला चांगलाच प्रतिसाद मिळाला.
प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे एक स्त्री असते असं म्हणतात पण स्मिताच्या बाबतीत तिचं लग्न तिच्यासाठी लकी ठरलंय असं म्हणायला हरकत नाही.
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje