बॉलीवूड

व्हाइट बिकिनी टॉप आणि न्यूड मेकअप, सोनाक्षी सिन्हाच्या दिलखेचक अदा

Trupti Paradkar  |  Jul 25, 2022
व्हाइट बिकिनी टॉप आणि न्यूड मेकअप, सोनाक्षी सिन्हाच्या दिलखेचक अदा

बॉलीवूडची दंबग गर्ल सोनाक्षी सिन्हा तिच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल दोन्ही गोष्टींसाठी नेहमी चर्चेत असते. सध्या सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इकबालच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. अशी चर्चा आहे की सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इकबाल एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले असून लवकरच ते लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. दोघांच्या लग्नाचा बार कधी उडणार हे मात्र अजून जाहीर करण्यात आलेलं नाही. मात्र त्यामुळे सोनाक्षी सिन्हाच्या प्रत्येक पोस्टवर चाहते नजर ठेवून आहेत. सोनाक्षीने नुकत्याच पोस्ट केलेल्या एका जुन्या फोटोवरही चाहत्यांनी लाइक्स आणि कंमेट्सचा वर्षाव केला आहे. तिचा मालदिव्ज वेकेशनवरील हा बोल्ड लुक चाहत्यांना भलताच आवडला असून सध्या तो खूप व्हायरल होताना दिसत आहे.

सोनाक्षी सिन्हाचा बोल्ड लुक

सोनाक्षी सिन्हा काही दिवसांपूर्वीच मालदिव्ज वेकेशनवरून परतली आहे. मालदिव्ज हे सध्या प्रत्येक सेलिब्रेटीसाठी हॉट ट्रॅव्हल डेस्टिनेशन म्हणून ओळखलं जातं. मात्र आता अनेक दिवसांनंतर सोनाक्षीने तिचा एक वेकेशन लुक इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. या फोटोत सोनाक्षीने बिकिनी परिधान केलेली आहे. व्हाईट रंगाचा बिकिनी टॉप, निळसर शेड असलेला श्रग आणि न्यूड मेकअप असलेल्या या तिच्या फोटोवर लाइक्स आणि कंमेट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. अडीच लाखांपेक्षा जास्त लाईक्स या फोटोवर असून, एका युझरने तिला ‘सो क्यूट सोना’ अशी कंमेट दिली आहे तर अनेकांनी तिला इमोजीमध्ये कंमेट्स दिल्या आहेत. 

सोनाक्षीचे आगामी प्रोजेक्ट

सोनाक्षी सिन्हाने ‘भुज’मध्ये शेवटचं काम केलं होतं. त्यानंतर ती कोणत्याही चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आलेली नाही. लवकरच ती जहीर इकबालसह एका म्युझिक अल्बममधून झळकणार आहे. जहीरसोबत असलेल्या नात्यामुळे हा म्युझिक अल्बम नक्कीच प्रेक्षकांना आवडण्याची शक्यता आहे. सोनाक्षीने अजूनही जहीरसोबत असलेलं नातं जगजाहीर केलेलं नाही. पण ऑफिशिअल नसलं तरी चाहत्यांना या नात्याचा सुगावा कधीच लागलेला आहे. कारण बऱ्याचदा सोनाक्षी आणि जहीर एकत्र दिसून येतात. त्यांचे हावभाव आणि नजरा त्यांचं नातं चाहत्यांपासून लपवून ठेवू शकत नाहीत. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From बॉलीवूड