मनोरंजन

जागतिक कन्या दिनाच्या निमित्ताने ऐका ही सुंदर गाणी

Aaditi Datar  |  Sep 25, 2021
song-on-daughters-in-marathi

यंदा जागतिक कन्या दिनाच्या निमित्ताने सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या रविवारी खास सेलिब्रेशन करण्यात येईल. प्रत्येक आईबाप आपल्या लेकीसाठी हा दिवस नक्कीच साजरा करतील. या दिवशी खास जागतिक कन्या दिनाच्या शुभेच्छा दिल्या जातात. भारतामध्ये मुलगी होणं खूप खास मानलं जात आणि यामुळे वर्षातला हा एक दिवस मुलींच्या नावे करण्यात आला आहे. पण आपल्याकडे आजही काही भागात मुलगी नको अशी धारणा आहे. तिच बदलण्याच्या हेतूने या दिवसाची सुरूवात झाली.

जागतिक कन्या दिनाच्या निमित्ताने तुमच्यासाठी खास बॉलीवूडमधील लेकींवरील काही खास गाण्यांची लिस्ट आम्ही खाली शेअर करत आहोत. बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक चित्रपट आले आहेत, जे मुली आणि लेकींवर आधारित आहेत. ज्यामध्ये खास मुलींवरील गाणीही आहेत. त्यामुळे खास कन्या दिवसाच्या निमित्ताने तुम्हाला ही गाणी आपल्या लाडक्या लेकीबरोबर ऐकता येतील आणि हा दिवस साजरा करता येईल.

मेरे घर आई एक नन्ही परी

मेरे घर आई एक नन्ही परी हे यशराजच्या कभी-कभी चित्रपटातील गाणं आहे. जर तुम्ही 90 किंवा त्याच्या आधीच्या दशकातील असाल तर तुम्हाला हे गाणं नक्कीच माहीत असेल. जर तुम्हाला लेक असेल तर तुम्ही हे गाणं तिला एकदा तरी नक्कीच ऐकवलं असेल. मेरे घर आई एक नन्ही परी हे गाणं लता मंगेशकर यांनी गायलं आहे आणि हे गाणं लिहीलं आहे साहिर लुधियानवी यांनी.

चांदनिया लोरी लोरी

चांदनिया लोरी लोरी हे गाणं 2012 मध्ये रिलीज झालेल्या राउडी राठोड या चित्रपटातील आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा हे प्रमुख भूमिकेत होते आणि हा चित्रपट सुपरहिट झाला होता. हे गाणं श्रेया घोशाल ने गायलं असून या गाण्याला संगीत दिलं होतं साजिद वाजिद यांनी.

चांदनी रे झूम

चांदनी रे झूम हे नोकर चित्रपटातलं गाणं आहे. जे दिवंगत अभिनेते आणि गायक किशोर कुमार यांनी गायलं आहे. हा चित्रपट 1979 साली रिलीज झाला होता. या चित्रपटात जया बच्चन यांची प्रमुख भूमिका होती.

बाबा की रानी हूं

बाबा की रानी हूं हे गाणं अलका याज्ञिक यांनी गायलं आहे. आपको पहले भी कही देखा है या चित्रपटातलं हे गाणं आहे. या चित्रपटातील मुख्य भूमिकेत प्रियांशु चॅटर्जी आणि साक्षी शिवानंद ही जोडी झळकली होती. बाबा की रानी हूं या गाण्याचे बोल लिहीले होते रंजन राज यांनी. हे गाणं खरंच खूप भावूक करणार आहे.

पापा की परी

पापा की परी हे गाणं राजश्री निर्मित मैं प्रेम की दिवानी हूं या चित्रपटातलं आहे. जे गायलं होतं सुनिधी चौहान या गायिकेने. हे गाणं अभिनेत्री करीना कपूर हिच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. या चित्रपटात करीना कपूरसोबत रानी मुखर्जी आणि हृतिक रोशन यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

बेटीयां

2002 साली रिलीज झालेल्या ना तुम जानों ना हम चित्रपटातलं बेटीयां हे गाणं फारच प्रसिद्ध झालं होतं. हे गाणं गायलं होतं गायिका जसविंदर नरूला हिने. या चित्रपटात मुख्य भूमिकेत हृतिक रोशन, सैफ अली खान आणि ईशा देओल होते.

सपनों के घर की

हे गाणं 1991 साली रिलीज झालेल्या डॅडी या चित्रपटातील आहे. हा चित्रपट मिशेल मिलर ने दिग्दर्शित केला होता.

दिलबरो

2018 मध्ये रिलीज झालेला राजी या गाजलेल्या चित्रपटातलं हे प्रसिद्ध झालेलं गाणं आहे. हे गाणं आलिया भट वर चित्रित करण्यात आलं होतं. हे गाणं गायलं होतं हर्षदीप कौर ने. जे फॅन्सना खूपच आवडलं. या चित्रपटात आलियासोबत विकी कौशल हा अभिनेताही प्रमुख भूमिकेत होता.

Read More From मनोरंजन