बॉलीवूड

आलिया गर्भात असताना सोनी राजदान यांनी सिगरेट फुंकून केला कहर, शेअर केले सिक्रेट

Leenal Gawade  |  Jul 10, 2019
आलिया गर्भात असताना सोनी राजदान यांनी सिगरेट फुंकून केला कहर, शेअर केले सिक्रेट

आलिया भटच्या सौंदर्याचं क्रेडिट तिची आई सोनी राजदान हिला नेहमीच दिलं जातं. आता चित्रपटात काम न करणारी सोनी राजदान एके काळी अभिनेत्री म्हणून ओळखली जात होती. तिच्या एका चित्रपटाची आठवण करुन देत सोनी राजदान यांनी आलियाच्या जन्मावेळचा एक किस्सा सांगितला आहे. आलियाच्या जन्मावेळी त्यांनी चांगल्याच सिगरेटी फुंकल्या आहेत. असे त्यांनी सांगितले.आता या सिगरेट फुंकणे म्हणजे आलियाच्या आईला लागलेले डोहाळे नाही बरं का तर तो किस्सा काय तेच त्यांनी ट्विटमधून सांगितले आहे.

इतक्या वर्षांनी का झाली आठवण?

Instagram

आता पहिला प्रश्न स्वाभाविक आहे की, आलिया भटच्या आईला इतक्या वर्षांनी हे सांगावेसे का वाटले तर याचे कारणही अगदीच खास आहे. सोनी राजदान यांनी एक ट्विट करुन त्या काळी गाजलेल्या ‘गुमराह’ या चित्रपटाची आठवण शेअर केली आहे.या चित्रपटात संजय दत्त आणि श्रीदेवी मुख्य भूमिकेत होते. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खास असल्याचे सोनी राजदान यांनी सांगितले. पण महत्वाचे म्हणजे त्यावेळी आलिया माझ्या पोटात होती हे मला माहीत नव्हते. माझ्या प्रेग्नंसीविषयी मला माहीत नव्हते. त्यामुळे मी माझा रोल साकारताना भरपूर सिगरेट फुंकल्या होत्या हे आज मला जाणवले.

आजही चालते करिश्माच्या डान्सची जादू

त्या कामासाठी झाली होती प्रशंसा

Instagram

सोनी राजदान यांच्यासाठी आनंदाची बाब अशी की, श्रीदेवी आणि संजय दत्त यांच्यासोबत काम तर त्यांना करायला मिळालेच. शिवाय त्यांनी या चित्रपटात साकारलेली भूमिका चांगलीच गाजली त्यांची या भूमिकेसाठी चांगलीच प्रशसा झाली. चित्रपट आणि आलियाची प्रेग्नंसी या दोन्ही गोष्टींचा आनंद असल्याचे त्यांनी यामध्ये म्हटले आहे.

कबीर सिंह करण्यासाठी मीराने केली होती शाहीदची मनधरणी

महेश भट यांचे दिग्दर्शन

Instagram

‘गुमराह’ या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश भट यांनी केले आहे. हा चित्रपट थ्रिलरपटातील होता. 1993 रोजी हा चित्रपट रिलीज झाला होता. त्या काळातील हा एक सुपर-डुपर हिट चित्रपट होता. या चित्रपटाने त्याकाळात 54 कोटींहून अधिक गल्ला जमवला होता. त्यामुळे महेश भट यांच्या चित्रपटातील यादीमध्ये असलेल्या या चित्रपटाचे आवर्जून नाव घेतले जाते. त्यांनी डिरेक्ट केलेला हा उत्तम  चित्रपट असल्याचे म्हटले जाते. एका मुलीला ड्रग्जच्या आरोपाखाली परदेशात अटक केली जाते. त्यानंतर नेमकं काय काय घडतं हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. 

महेश- सोनी यांच्या लव्ह अफेअरची चर्चा

महेश भट आणि सोनी राजदान यांच्या प्रेमाची चर्चा खूप होती. त्यांनी त्यांच्या या प्रेमप्रकरणाच्या खूप वर्षानंतर 1986 साली लग्न केलं. आलिया ही सोनी राजदानची पहिली मुलगी असून शाहीन भट ही धाकटी मुलगी आहे.

या friendship डे ला द्या तुमच्या मित्रमैत्रिणींना हे खास गिफ्ट

सोनी राजदानने केले आलियाच्या आईचे काम

Instagram

 सोनी राजदान यांनी ‘मंडी’, ‘आहिस्ता आहिस्ता’ ,‘साथी’, ‘सच लाँग जर्नी’, ‘खामोश’, ‘त्रिकाल’ या चित्रपटात काम केले आहे. आलियाच्या सुपर हिट ‘राजी’ या चित्रपटात आलियाच्या आईची भूमिका सोनी राजदान यांनी केली होती.

आलिया दिसणार ब्रम्हास्त्रमध्ये

आलिया सध्या तिच्या आगामी चित्रपट ब्रम्हास्रमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात ती पहिल्यांदा रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. या चित्रपटाची उत्सुकता फक्त या जोडीला पडद्यावर एकत्र पाहण्याची आहे. बाकी ऑफ स्क्रिनही हे दोघे डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.

Read More From बॉलीवूड