मनोरंजन

टीव्ही पुन्हा कधीही दिसणार नाही सूर्यवंशम चित्रपट, वाचा कारण

Leenal Gawade  |  Jun 14, 2022
सूर्यवंशम चित्रपट होणार बंद

 कधी टीव्ही लागला आणि तुम्ही अमिताभ बच्चन(Amitabh Bachachan) यांचा ‘सूर्यवंशम’ (Sooryavansham) चित्रपट लागलेला पाहिला आहे. तोच तोच चित्रपट पाहून तुम्हालाही कंटाळा आला आहे का?  तर ही बातमी तुमच्यासाठी खास असणार आहे कारण आता या पुढे तुम्हाला हा चित्रपट वारंवार पाहता येणार नाही. आता तो पुन्हा लागणार नाही. याचे कारण ऐकाल तर तुम्हाला थोडे समाधान नक्कीच मिळेल. गेल्या कित्येक वर्षांपासून सूर्यवंशम हा चित्रपट का लागत होता यामागेही काही कारणं होती. आता या जागी काही नवे चित्रपट दाखवले जाणार आहे असे कळत आहे.

सूर्यवंशमची जागा घेणार 10 चित्रपट

सेट मॅक्स या चॅनलवर सदान कदा लावल्यावर सूर्यवंशम हा चित्रपट लागलेला असतो. हा चित्रपट इतका वेळा लागतो की, खूप जणांना या चित्रपटाचा अगदी कंटाळा आला होता. पण हा चित्रपट लगेच बंद होणार नाही. याला थोडा अवकाश आहे कारण 2024-25 या वर्षामध्ये हे कॉन्ट्रॅक्ट संपणार आहे असे कळत आहे. या चित्रपटाची जागा आता 10 चित्रपट घेणार आहोत. या चित्रपटांची यादी देखील आता जाहीर करण्यात आली आहे. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार  सूर्यवंशमची पोकळी भरुन काढण्यासाठी  विवाह, टायगर: द वंडर कार, बागबान,जानी दुश्मन,आबरा का डाबरा, मैरी जंग द वन मॅन आर्मी, हम साथ साथ है, गदर एक प्रेम कहानी, लोफर, खलनायक हे चित्रपट योग्य असल्याचे म्हटले आहे. आता या जागी कोणते चित्रपट येतील हे चॅनलकडून लवकरच कळेल. 

सूर्यवंशमचे घेतले राईट्स

अमिताभ बच्चन यांचा सूर्यवंशम हा चित्रपट 1999 साली रिलीज झाला होता. या चित्रपटाचा टीव्हीचा प्रिमिअर शो हा सेट मॅक्स या चॅनेलवर प्रसारित झाला होता. हे चॅनल त्यादरम्यान नवीन होते. हा चित्रपट टीव्हीला लागणार म्हणून हे चॅनल अनेकांनी लावले. त्यामुळे या चॅनलला खूप चांगले दिवस आले. या चॅनलचा टीआरपी वाढला होता. त्यामुळे या चॅनलने या चित्रपटाचे राईट्स घेतले. त्यामुळेच हा चित्रपट या चॅनेलवर सतत लावला जात होता. पण आता या चॅनेलसोबत असलेली सूर्यवंशमचे कॉन्ट्रॅक्ट संपणार आहे. त्यामुळेच आता हा चित्रपट पुढे लागणार नाही असे सांगितले जात आहे. 

रिमेक चित्रपट आहे सूर्यवंशम

जर तुम्ही साऊथच्या चित्रपटांचे चाहते असाल तर तुम्हाला हे माहीतच असेल की, सूर्यवंशम हा चित्रपट तामिळ चित्रपटाचा रिमेक आहे. यामध्ये अमिताभ बच्चन यांनी वडील- मुलगा अशा दोन्ही भूमिका साकारल्या आहेत. असे सांगितले जाते की, या चित्रपटासाठी मुलाची भूमिका साकारायला अभिषेक बच्चनची निवड करण्यात आली होती. पण नंतर या भूमिका अभिषेक बच्चन यांनीच साकारल्या. या चित्रपटात दोन अभिनेत्री असून त्यातील एकाला आवाज रेखा यांनी दिला आहे. हा चित्रपट त्या काळात 7 कोटीत बनली होती. या चित्रपटाने फार कमाई केली नाही. पण तिने सगळी कसर ही टीव्हीवर भरुन काढली. युट्युब आणि टीव्हीवरुन या चित्रपटाने कोटीच्या घरात कमाई केली आहे. 

पण आता हा चित्रपट काही वर्षानंतर बंद होणार आहे 

Read More From मनोरंजन