पुष्पा चित्रपट आला त्या दिवसापासून ते आजपर्यंत त्याची क्रेझ काही उतरलेली दिसत नाही. या चित्रपटातील रश्मिकाचा डान्स असो की अल्लूचा डायलॉग. या चित्रपटाची मोहिनी अजूनही उतरलेली दिसत नाही. या चित्रपटातील अल्लूचा डायलॉग म्हणजे मै झुकेगा नही साला.. या डायलॉगने तर धम्मालच केली. पण हा डायलॉग म्हणणारा अल्लू मात्र ट्राफिक पोलिसांसमोर झुकलेला आहे. थांबा… यात कमीपणा नाही तर चुकलो तर त्याची शिक्षा व्हायला हवी असा एक चांगला मेसेज यामधून अल्लूने दिलेला आहे. नेमकं अल्लुसोबत काय झालं ते जाणून घेऊया.
अल्लूवर झाली कारवाई
अभिनेता म्हटलं की, त्यात साऊथचे अभिनेते की, त्यांचा ऑरा काहीतरी वेगळाच असतो. त्यांना त्यांच्या राज्यात देवच मानले जाते. अल्लु हा साऊथचा सुपरस्टार आहे. त्याला कोणी ओळखत नाही असे होणारच नाही. पण अल्लूकडून एक चूक झाली आणि त्याचा दंड त्याला भरावा लागला. आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. भारतात कोणत्याही व्हिआयपीला काळ्या काचांची परवानगी नाही. सर्वसामान्याप्रमाणे त्यांना देखील सारखाच नियम आहे. हैदराबाद येथे प्रवास करत असताना अल्लू अर्जुनची गाडी ट्रॅफिक पोलिसांनी अडवली. त्याला काळी फिल्म लावली यासाठी तब्बल ७०० रुपयांचा दंड लावण्यात आला. आता हा दंड काहीच नाही असे तुम्हाला वाटेल. पण आपली चूक आहे हे लक्षात घेत अल्लूने हा दंड भरला. त्यासाठी त्याने कोणतीही लाज बाळगली नाही.
म्हणूनच आहे स्पेशल
अल्लू हा मोठा स्टार आहे. पण तो इतरांप्रमाणे राहतो. त्याला सगळीकडे स्टारडम हवेच असे नाही. तो सर्वसामान्यांप्रमाणे राहणे अधिक पसंत करतो. कितीही कोटीची कमाई चित्रपटाने केली तरी तो त्या चित्रपटानंतर ते सगळे काही विसरुन पुढे जातो आणि त्याचा नेक्स्ट कामाकडे अधिक लक्ष देतो. त्याचा पुष्पा हा चित्रपट पार्ट २ घेऊन लवकरच येणार आहे. त्याच्या तयारीला सुरुवात देखील झाली आहे. त्याला ट्रॅफिक पोलिसांनी पकडले ही बातमी अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने चघळली असली तरी देखील अल्लू त्यावर काहीही बोललेला नाही. त्याचे हेच वागणे त्याच्या फॅनला आवडलेले दिसत आहे.
पुष्पा 2 ची प्रतिक्षा
अल्लु अर्जून वर्षभरात अनेक चित्रपट करतो. त्याचे चित्रपट हे नेहमी खास असतात. त्याचा आलेला पुष्पा चित्रपट देशात नाही तर परदेशातही चांगला गाजला. आता त्याचा दुसरा भाग लवकरच येणार आहे. ज्या ठिकाणी चित्रपट संपला तेथून एक नवी झुंज पाहायला मिळणार आहे. भरपूर ॲक्शन आणि रोमांस असा हा चित्रपट कधी येईल अशी प्रतिक्षा आहे. शिवाय यामध्ये काही अन्य स्टाकास्ट येणार असल्याचे देखील म्हटले जात आहे. समंथासारखाच एक आणखी आयटम साँगचा तडका या चित्रपटाला असणार आहे. पण समंथाच्या जागी कोणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हैदराबाद पोलिसांनी केलेली कारवाई आणि अल्लुचे सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे वागणे तुम्हाला कसे वाटले आम्हाला नक्की कळवा.
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade