कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर प्रतिबंध करण्यासाठी लॉकडाऊन जरी केलं गेलं नाही तरी अनेक सिनेमागृह मात्र काही काळासाठी बंद ठेवण्यात आली. ज्याचा फटका अनेक चित्रपटांच्या प्रदर्शित होण्यावर झाला. कारण एखाद्या चित्रपटासाठी रिलीज डेट मिळवणं म्हणजे एखाद्या निर्मात्यासाठी नक्कीच खूप मोठं आव्हान असतं. त्यात कोरोनामुळे जेव्हा हाती आलेल्या तारखा गमवाव्या लागतात तेव्हा त्याचं दुःख तेच जाणू शकतात. बहुचर्चित आरआरआर चित्रपटाच्या निर्मात्यांनाही या अग्निपरिक्षेतून जावं लागलं. कारण आता या चित्रपटाच्या रिलीज डेटसाठी त्यांना पुन्हा सारी गणितं जमवावी लागत आहेत. सर्व प्रयत्न करून अखेर आता आरआरआरची रिलीज डेट फायनल करण्यात आली आहे.
आयुष्यात प्रेमाचे रंग उधळणार ‘मेरी गो राऊंड’
कधी होणार आरआरआर प्रदर्शित
आरआरआरच्या निर्मात्यांनी नुकतीच हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची तारिख जाहीर केली आहे. सोशल मीडियावर जाहीर केल्याप्रमाणे आता एस एस राजमौलीचा बहुचर्चित आरआरआर 25 मार्चला प्रदर्शित होणार आहे. याआधी हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी आणखी दोन तारखा ठरवण्यात आल्या होत्या. मागच्या आठवड्यापर्यंत 18 मार्च की 28 एप्रिल अशा दोन तारखांबद्दल विचार करण्यात येत होता. मात्र आता निर्मात्यांनी या दोन्ही तारखा नाकारात 25 मार्च ही तारीख चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी लॉक केली आहे.
25 मार्चलाच का होणार आरआरआर प्रदर्शित
होळीच्या शुभमुहूर्तावर 18 मार्चला अक्षय कुमारचा बच्चन पांडे बुक करण्यात आला आहे. त्यानंतर 28 मार्चला अजय देवगणचा रनवे 34 आणि टायगर श्रॉफचा हिरोपंती 2 प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. अशात जर या दोन तारखा आरआरआरसाठी ठरवल्या असत्या तर तर चित्रपटाच्या कमाईवर नक्कीच परिणाम झाला असता. आरआरआर तेलुगूप्रमाणेच हिंदीतही मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित होणार असल्याने निर्मात्यांनी त्यांची गणितं बदलत रिलीज डेटचा पुर्नविचार केल्याचं सांगण्यात येत आहे. आरआरआर हा चित्रपट एक बिज बजेट चित्रपट आहे. शिवाय बाहुबली फेम एस एस राजमौलींनी याचं दिग्दर्शन केलेलं आहे. त्यामुळे या चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित होण्याआधीच याबद्दल लोकांना उत्सुकता होती. आरआरआर हा इंग्रजाच्या काळातील दोन स्वातंत्र्यवीरांची कथा सांगणारा चित्रपट आहे. शिवाय यात साऊथचे कलाकार रामचरण, ज्युनिअर एनटीआर, श्रिया सरन तर आहेतच शिवाय यामध्ये बॉलीवूडच्या अजय देवगण आणि आलिया भट्टचीही मुख्य भूमिका आहे. त्यामुळे हा चित्रपट टॉलीवूड आणि हॉलीवूड दोन्हीकडे सुपरहिट होण्याची शक्यता आहे.
‘ब्रा साईज’ वक्तव्याप्रकरणी श्वेता तिवारीविरोधात गुन्हा दाखल
नागिन 6 मध्ये तेजस्वी प्रकाशची एन्ट्री, बिग बॉस विनर झाल्यामुळे लागली लॉटरी
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje