आरोग्य

पोटाचे आरोग्य सतत बिघडत असेल तर तुम्ही करताय या चुका

Leenal Gawade  |  Dec 6, 2021
पोटाचे आरोग्य बिघडत असेल तर करताय या चुका

 पोटाचे आरोग्य चांगले असेल तर संपूर्ण आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. पण काही जणांच्या पोटाच्या समस्या या 365 दिवस असतात. पोट साफ न होणे, पोटात गडबड होणे,पोट कुसणे, पोटात गॅस होणे अशा काही समस्या खूप जणांना सतत होत असतात. काहीही घरगुती उपाय केले तरी देखील त्यांच्या पोटाच्या समस्या काही केल्या कमी होत नाही. पोटाचे आरोग्य बिघडत असेल तर तुम्ही काहीतरी चुका करताय ते तुम्हाला माहीत असायला हवे. या चुका तुम्ही टाळल्या तर नक्कीच पोटाचे आरोग्य सुधारण्यास तुम्हाला मदत होईल.

फायबरचे प्रमाण किती

 शरीरात उत्तम फायबर असेल तर तुमच्या पोटाचे आरोग्य चांगले राहते. फळ, गहू आणि भाज्या यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. जर फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन झाले तर पोट साफ होण्यासाठी मदत होते. त्यामुळे तुम्ही दिवसभरातून फायबर किती खाता हे देखील माहीत असायला हवे. फायबर योग्यपद्धतीने खाल्ले तर तुम्हाला शौचाला साफ होण्यास मदत होईल. त्यामुळे सगळ्यात आधी तुम्ही फायबरचे प्रमाण तपासा आणि त्यानंतर जर त्याचे प्रमाण कमी असतील तर ते वाढवा.

शौचाला साफ होते का?

 पोटाचे आरोग्य खराब होणे म्हणजे शौचास न होणे. तुम्हाला शौचास साफ होत नसेल तर तुमची ही समस्या सगळ्यात मोठी आहे. सकाळी उठल्यानंतर किंवा नाश्ता केल्यानंतर तुम्हाला इच्छित प्रेशर यायला हवा. जर तुम्हाला प्रेशर आला नाही. तर तुम्हाला शौचास साफ होण्यास नाही. शौचास साफ झाले नाही तर गॅसची समस्या किंवा पोट कुसण्याची समस्या होऊ शकते. त्यामुळे तुम्ही ही गोष्ट देखील तपासा

जंक फुडचा समावेश त्रासदायक

 खूप जणांना जंक फुड खायला खूप जास्त आवडतात. जंक फुड हे पोटात घट्ट जाऊन बसतात. पोटाच्या आतड्यांना चिकटल्यामुळे पोट साफ होण्यास मदत मिळत नाही. जंक फुडमध्ये जास्त करुन मैद्याचा समावेश असतो. मैदा हा तुलनेने चिकट असतो. त्यामुळे तो पोटासाठी चांगला नाही. रोजच्या रोज आहारात जर तुम्हाला जंक फुडचा समावेश करणे टाळता आले तर खूपच चांगले. जर तुम्हाला काही अपरिहार्य कार्यामुळे तुम्हाला जंक फुड खाणे भाग असेल तर तुमचे पाणी पिण्याचे प्रमाण योग्य असायला हवे. त्यामुळे तुमच्या शरीरातून मल: निघून जाण्यास मदत होईल.

अपुरा आहार ही कारणीभूत

खूप जणांना उपाशी राहायची सवय असते. उपवास केला म्हणजे वजन कमी करण्यास मदत मिळते असे वाटते. पण अपुरा आहार हा पोटाचे आरोग्य खराब करण्यासाठी कारणीभूत ठरते. जेवढा अन्नपुरवठा शरीराला आवश्यक असतो तो जर मिळाला नाही तर नक्कीच त्यामुळे पोट साफ होत नाही.  पोट भरले नाही तर रोजच्या रोज पोट साफ होणार नाही. त्यामुळे अपुरा आहार घेण्याची चुकी तुम्ही करत असाल तर नक्कीच तुम्ही योग्य आणि पुरेसा असा आहार घ्या. 

आता पोटाचे आरोग्य बिघडवण्यासाठी या काही गोष्टी कारणीभूत असतील तर त्या चुका आजच टाळा

अधिक वाचा

जेवताना का खाऊ नयेत फळं, जाणून घ्या कारण

घरी बसलेल्या मुलांची वजन वाढू देऊ नका, होतायत हे त्रास

Read More From आरोग्य