DIY लाईफ हॅक्स

आयुष्याच्या कठीण काळात असा राखा संयम, नक्कीच बदलेल काळ

Trupti Paradkar  |  Aug 24, 2021
strategies to increase your patience

चांगले वाईट प्रंसग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. मात्र त्यावर मात करत जीवनात पुन्हा यशस्वी होण्यासाठी संयम राखण्याची गरज असते. जो शांतपणे परिस्थितीला तोंड देतो तो लवकर संकटातून बाहेर पडतो. मात्र आजकाल संयम ही गोष्ट जणू दुरापास्त झाली आहे. प्रत्येकाला सर्व काही झटपट हवं असतं. पण असं आग्रही असणाऱ्याला यश तर मिळत नाहीच उलट त्याच्या पाठी संकटाचा ससेमिराच लागतो. यासाठी जाणून घ्या कसा राखावा संयम

थोडी वाट पाहा –

धैर्य आणि संयम राखण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे शांत राहणे आणि वाट पाहणे. वेट अॅंड वॉच हे वाक्य तुम्ही नेहमी ऐकलं असेल पण कधी कधी आयु्ष्यात ते अनुभवण्याची वेळही येते. असं म्हणतात जी माणसं वाट पाहतात त्यांच्या वाट्याला शेवटी चांगलंच येतं. थोडी कळ काढाल तर काही तरी चांगलं मिळेल. वाट पाहण्यामुळे जर तुमचा फायदाच होणार आहे तर वाट पाहण्यात काय गैर आहे. शिवाय यातून तुमचा संयम नक्कीच वाढेल. आनंदी जीवन जगण्यासाठी या ’10’ गोष्टी अवश्य करा

कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विचार करा –

आयुष्यात सतत कोणता ना कोणता निर्णय प्रत्येकाला घ्यावा लागतो. कधी हे निर्णय अगदी छोटे असतात तर कधी खूप मोठे… निर्णय छोटा असो वा मोठा तो घेताना थोडं थांबा त्याचा भविष्यात काय परिणाम होईल याचा नीट विचार करा आणि मग योग्य तो निर्णय घ्या. कारण या प्रत्येक निर्णयाचा परिणाम तुमच्या भविष्यावर होणार आहे. असा दूरदृष्टी विचार कराल तर तुम्ही नक्कीच संयमी राहाल.आनंदी राहण्यासाठी डोक्यातील ‘डिलीट’ बटणाचा करा वापर

कान द्या –

कान द्या हे ऐकून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल. पण हो कान द्या म्हणजे नेहमी समोरची व्यक्ती काय सांगत आहे हे लक्षपूर्वक ऐका. असं केल्यामुळे तुमचे गैरसमज कमी होतील आणि मनात चुकीचे विचार येणार नाहीत. लोकांना तुमच्याबद्दल काय वाटतं याचा अंदाज तुम्हाला नीट ऐकल्यामुळे येईल. त्यामुळे समोरची व्यक्ती मग ती छोटी असो वा मोठी तिचं पूर्ण बोलणं ऐकल्याशिवाय तुम्ही प्रतिक्रिया देऊ नका.दीर्घायुषी व्हायचं असेल तर आताच स्वतःला लावा ‘या’ चांगल्या सवयी

प्रतिक्रिया नको प्रतिसाद द्या –

सध्या लोकांना कोणाचं काही ऐकायला वेळच नसतो. त्यामुळे समोरची व्यक्ती काय आणि कोणत्या उद्देशाने आपल्याशी बोलत आहे हेच कुणी पाहत नाही. अर्धवट ऐकून पटकन प्रतिक्रिया दिली जाते. मात्र जर तुम्हाला संयम वाढवायचा असेल तर आधी समोरच्या व्यक्तीचा उद्देश समजून घ्या. त्यानंतर प्रतिक्रिया देण्याऐवजी त्या व्यक्तीला प्रतिसाद द्या. ज्यामुळे तुमचे घर, ऑफिस, नातेवाईक अशी  सर्व नाती आनंदी होतील.

श्वासावर नियंत्रण मिळवा –

मन आणि शरीर यांचं अतूट नातं आहे. तुम्ही जे विचार करता त्याचे परिणाम शरीरावर होतात आणि तुम्ही जसे वागता त्यानुसार तुमच्या मनावर परिणाम होतात. यासाठी मन शांत निवांत होईल याची काळजी घ्या. श्वासावर नियंत्रण ठेवून, प्राणायाम, योगासने, मेडिटेशन करून तुम्ही तुमचे मन शांत करू शकता. तुमचे मन जितके शांत होईल तितका तुमचा संयम वाढत जाईल. 

Read More From DIY लाईफ हॅक्स